QUOTES ON #चारोळी

#चारोळी quotes

Trending | Latest
24 SEP 2020 AT 16:49

उन्हात तापून झाली काळी तिची प्रतिमा
देती आम्हांस छाया सोसूनी चटके स्वतः
खेळते ती उन्हाशी दूर सारूनी तिच्या व्यथा
चारोळीत मांडते मी अशी या सावल्यांची कथा...

-


17 SEP 2018 AT 9:14

नात्याचा गुंता झाला की एकमेकांशी भांडू
सुटला गैरसमज की पुन्हा नवा डाव मांडू

-


6 JUL 2020 AT 17:34

हे आयुष्य आहे, इथे भावनांना आवरून घे
फसवेगिरीच्या जगात एकटं राहायला शिकून घे
स्वप्नांच्या पाठीमागे पळताना कंबर तू कसून घे
या वाटेत चढ उतार येतील स्वतःला सावरून घे

-


29 JUN 2020 AT 15:36

उरल्या ना कोणत्याच भावना
उरल्या त्या फक्त तू दिलेल्या वेदना
उरली ना हिम्मत विश्वास करायची पुन्हा
तुझ्यावर प्रेम केलं हाच ठरला वाटतं माझा गुन्हा

-


7 NOV 2020 AT 9:47

समोरून जाता
मला दिसे ती परी ..
तिला बघून भान ना उरे
माझे माझ्या वरी ..

-


18 NOV 2020 AT 11:05

तिला बघताच..,
बहरते हे वेड मन.
राहे न माझा मी..,
मग घेते ती मोहून मन

-


9 NOV 2020 AT 23:20

इथे इतका अंधार आहे..
कदाचित आज काजव्यांना बंदी असावी..

ठेच लागत होती.. जागोजागी मशालींची
कदाचित उद्या सूर्याला सुट्टी असावी..

-


28 SEP 2020 AT 16:29

शब्दांचा हा अजबच आहे खेळ....!
बांधतो आपल्या मनाचे तो मेळ ....!!
समोर येताच ती होते निशब्द..तर,
एकाला नाही कळत भावनांचे ताळमेळ ....!!

-


10 JUN 2019 AT 10:56

का कुणाच्या येण्याची
आशा अशी लागावी
तुटलेल्या नात्याची
सल किती सोसावी..
- रंजना हंबर्डे.✍️

-


17 MAY 2021 AT 13:45

-