तुझ्या सोबतीने गंधाळलेली स्वप्ने
उभारी देतात मज जीवनाला
कायम अशीच सोबत रहा
अंतरीची आर्जवे आळवती तुला
रंजना हंबर्डे-
अलवार मनाला स्पर्शून काव्यात उतरतात.."
अर्धीच रात्र वेडी अन्
उरी भावनांचा कल्लोळ
भावनांची उकल करतांना
गहिवरून जाते कवितेतील ओळ...
रंजना हंबर्डे
-
एक सुबह ऐसी भी हो
जो सपनों के जैसी हो
जिंदगी से रूबरू हो के
थक गया हूं अब मैं
एक सुबह ऐसी हो जो
खुबसूरत कहानी जैसी हो
दिल में ढेर सारे अरमान
दबे हुए हैं कई अरसो से
पुरे हो जाए एक एक करके
एक सुबह ऐसी खुशनुमा हो
जो वास्तव जैसी हो ।
रंजना हंबर्डे-
पंचाक्षरी:
किती झुरावे वेडी ही प्रीत
तुला स्मरावे तू मनमित
मौनात सारे समजून घे
आयुष्य वहावे..१ माझे हे गीत..४
पाऊस येतो स्वप्न पाहिले
मनी दाटतो तुला वाहिले
आठवणींचा अधुरे स्वप्न
ठेवा गाठतो.. २ का रे राहिले..५
नको आभास
तुझा तो ध्यास
खूप छळते
तुझी रे आस..३
- रंजना हंबर्डे.✍️
०७/०६/१९
-
झिजते ती चंदनापरी
अन् सुगंध दरवळतो
मुलांच्या जीवनी
अशी कशी आई तू
त्यागाची गं मूर्ती
काडी काडी जमा करून
पिल्लांसाठी खोपा ती विनते
इवल्याश्या चोचीने घास भरवते..
सर्व प्राणीमात्रात महती तुझी थोर
वात्सल्याचा झरा वाहतो तुझ्यात आई
मोठ्या मनाने माफ लेकरांना ती करते
त्यांना घडवण्यासाठी उभे आयुष्य वाहते
तुझ्या विना आई वाटे घरदार सूने
नको सोडून जाऊ कधीही मला
तुझ्या प्रेमाची ऊब आई फार गोड वाटे
तुझ्याच कुशीत गं स्वर्ग सुख वाटते..
- रंजना हंबर्डे.✍️
-
आतला आवाज
एक विश्वासाची थाप
आतला आवाज
दिशाहीन झाल्यावर योग्य मार्गाकडे वाटचाल
करणारे होकायंत्र..
आतला आवाज
आत्मविश्वासाची साक्ष
आतला आवाज
कायस्वरूपी एक साथ
आतला आवाज
एक आपलेच आगळे वेगळे जग..
आतला आवाज
कुणीही सोबत नसतांना मिळणारे बळ..
आतला आवाज
मनातले सर्वकाही जाणणारा
कधी हसवणारा तर कधी रडवणारा
श्रावणातला खट्याळ गार वारा..
गुजमनीचे जाणणारा एक सहारा..
- रंजना हंबर्डे.✍️-
किस बात पर ख़फ़ा हो...
वो दूर जाने के तरीके ढूंढ़ ते रहे
और हम उनके पास जाने की कोशिश करते रहे।
अब दिल थक गया तुम्हारी राह देख़ते देख़ते
चलो तुम्हारी कोशिश आसान कर देते हैं
तुम्हारे रास्ते से हम ही हट जाते हैं
बस एक बात बता दो,
किस बात पे ख़फ़ा हो ?..
- आर.हंबर्डे.✍️
-
आप ख़ूबसूरत हैं
आप ख़ूबसूरत हैं
ओस की बूंद कि तरह..
खिलखिलाते कमल की तरह |
- R.Hambarde.✍️
-
पुस्तकाच्या प्रत्येक पाना पानात
आठवणींच्या फुलांचा गंध आहे
तोडू पाहतोस जो बंध तो तर
युगायुगांचा ऋणानुबंध आहे...
रंजना हंबर्डे-
आसमान भी आज
गुलाबी रंगों से छलकने लगा
प्यार के गहरे रंग में
सारा जहां रंगने लगा ।
रंजना हंबर्डे
-