अनेकदा समाजात होणाऱ्या कोणत्याही वादाचे
मूळ कारण म्हणजे आपापसातील "गैरसमज"....-
नात्यातील निरर्थक निर्माण झालेल्या शंकेच कारण, एकमेकांवर दाखवलेला अविश्वास असतो
एकमेकांना न समजून घेता निर्माण झालेला,
गैरसमज तो कधीच गैरसमज नसतो.
-
कधीच कोणाच्या स्वभावाबद्दल एक काही तरी मत
तयार करुन घेऊ नका, कि त्या व्यक्ती चा स्वभाव
असाच आहे किंवा तसाच आहे,..
आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त
तुमच्या बद्दल त्या व्यक्ती चा स्वभाव
चांगला असु शकतो...
जो कदाचित तुम्हाला वाचताच आला नसेल...
-
गैरसमज काय असतो बघा ना ..??
जेव्हा आपण real life अनुभवातून
Social media वर लिहीत असतो., आणि social media friend नाराज होतात,
का ..? तर त्यांना वाटत, हे त्यांच्या साठी लिहीलयं
अरे अस काही नसत मित्रांनो.,
रोज दिवसभरात भेटणारे अनेक लोक असतात, आणि अनुभवही ..
काय वाटत 💯 % true लिहीलयं का हे ...??-
आत्मसंवाद....
असलेल्या विचारांचा,आणलेल्या विचारांचा,
प्रवास....
चुकीच्या संशयाचा,गैरहजर विश्वासाचा।।
झाले सत्य दिसेनासे,
मनी चादर खोट्या अंधाराची।
बिना संवादाचे वाद,
किरणे कुठे अडती विश्वासाची।।
करावा थोडा विचार
बदलून काैल मनाचा,
होईल घट्ट विन नात्याची...,
प्रयत्न असावा...
एक दीर्घ श्वासाचा,थोड़ समजून घेण्याचा।।-
काही लोक स्वतःच गैरसमज करून घेतात, आणि गैरसमज दुसऱ्यालाच कसा झालायं हे सांगत फिरतात., स्वतः केलेल्या चुकांकडे त्यांच लक्ष नसत., दुसऱ्याने चुक लक्षात आणून दिली तर त्याला वाईट ठरवल जात.
पण जो चूक लक्षात आणून देतो., त्याला तुमच्याच चुकीमुळे, त्रास झालेला असतो, आणि हे त्याने दर्शवले म्हणून तो वाईट कसा ..??
#reallifeexperience-
अनेक गोष्टी शिकलो
मिळवल्या पण
नेहमी आणि अभिमानाने
सांगाव तर "एक माणुस"म्हणून...
खुप संघर्ष केला
अजुनही करतोच आहे
काही अपवाद घडले ही
जिथे मी कमी पडलो....
कधी हरलो तर कधी
जिंकूनही हरलो
पण सर्वात महत्वाच
त्यातून खुप काही शिकलो...
आताच कुठ उभा राहतो आहे
स्वत:च अस्तित्व शोधतोय
जिवन अजुन खुप बाकी आहे मित्रांनो
जोवर आहे तोवर फक्त
"शिवरायांचा मावळा"आहे....-
कोणालाही आपल्याला वाईट ठरवायच नसत, कोणासमोरही आपणच कसे जिंकलेलो हे दाखवायच नसत,, कोणापेक्षा ही कुठल्याही बाबतीत आपणच कसे सरस हेही दाखवायच नसत, खरतरं आपल्या मनात काहीही नसत.,
तरीही आपल्याला लोकांच्या गैरसमज, द्वेष, मत्सराच, धनी व्हाव लागतं ..।
#reallifeexperience-
नकारात्मक विचार आणि गैरसमज ..
कोणाविषयीही आपल्या मनात द्वेष नसताना, नकारात्मक विचार नसतानाही, आपण आपल्याच दुनियेत असतानाही,लोक अंदाजावरुन केवळ आपल्याविषयी द्वेषपूर्ण, नकारात्मक विचार
करत असतील आणि तस फैलावत असतील तर काय म्हणावं अशा लोकांना
खरतरं आपल्याला कोणालाही मी कुठल्याही बाबतीत सरस किंवा साळसुदपणाचा आव आणायचाही नसतो, तरीही लोक चुकीचा विचार करतातचं
अंदाज लावून सतत कुठल्याही बाबतीत कुठल्याही व्यक्ती विषयी नकारात्मक च विचार करून गैरसमज करणारे लोक खरतरं मानसिक रोगी ..
समजुतदार लोक कधीही गैरसमज करून
नात्यात वितुष्ट येऊ देत नाही
#reallifeexperience
-
कधी कधी एखादी नवीनच ओळख झालेली व्यक्ती आपल्याला चांगली वाटते., एकदुसर्यांच्या समस्या, अनुभव, विचारांची वगैरे देवाणघेवाण होते., समस्यांमधून बाहेर निघण्यासाठी आपणही अशा व्यक्तीला चांगल्या काही गोष्टी सुचवतो., पण होत काय की, स्वभावाची पूर्ण ओळख झालेली नसते, आपण आपल्या आणि आपल्या ईतर मित्रांच्या स्वभावासारखा ह्या ही, व्यक्ती चा स्वभाव असेल, असं, ग्रुहित धरुन घेतो, पण त्या व्यक्तीचा खुपच वेगळा आहे, हे आपल्या समोर येत, गैरसमज आणि संशयी अशा स्वभावाची ही व्यक्ती आपल्याला वाईट ठरवायला लागते, शब्दांतून आपल्याला वाईट बोलते,आपण कुठलही वाईट शब्दांत प्रत्युत्तर न करता आपली खरी बाजू safe करण्याचा प्रयत्न करतो., तरीही ती व्यक्ती आपल्याला वाईटच समजते, का तर आपण आपली बाजू मांडलेली असते म्हणून ..??
#reallifeexperience-