समानता फक्त नावच नाही तर,
क्रांतीकारी, विद्रोही बुध्दाने राजेशाही फाट्यावर मारून प्रस्थापित केलेली समनाता,
तीच समानता बा भीमाने पाच हजार वर्षांपूर्वीची सरमांजदारी, जातीवादी, वर्णव्यवस्थेचा विस्फोट करून,
ह्या बुद्धांच्या जम्बुदिपात अर्थात ह्या भारतात पेरलेली "समानता".......
#हीच आमची समानता❤️❤️❤️-
तुमची दिवाळी आमची दिवाळी पण आहे ना किती,निराळी
तुमच्या घरी रंगबिरंगी वस्त्रांचा साज
फाटका पेहराव घर रिकामं आमचं आज.
तुमच्या घरी पक्वांचा खमंग वास,
भुखेने कोंडला घरी आमच्या अपुरा श्वास
लक्ख प्रकाशाने उजळेल तुमचं घर
अंधकाराने व्यपला सर्वस्व आमचं भरोसा फक्त नशिबावर
क्षण आनंदचा येई घेऊन उधळण आयुष्यात तुमच्या
रिकाम्या झोळ्या निरागस स्वप्न फक्त उरले डोळ्यात,आमच्या.
तुमची दिवाळी आमची बघा ना आहे किती निराळी
तुमच्या दारी रांगोळी आमच्या घरी भुकेने व्याकूळ,किंचाळी
सुखाची उधळण तुमच्या दारी
दरिद्रत्येची पहाट आमच्या घरी.
-
काही लोक विचारतात...
"मराठी" ने आम्हाला दिले काय...?
"मराठी" ने दिले आम्हाला "छत्रपती शिवराय"
"ज्यांनी" "मराठी" "अस्मिता" जागवली"
"मराठी" "स्वराज्याची" "मुहर्त-मेढ" रोवली
"मराठी" "साम्राज्याची" घडी बसवली
आणि तयार केले "रयतेचं-स्वराज्य" "महाकाय"
असे थोर, "महापराक्रमी" "छत्रपती शिवराय"...!!!
-
आमची मुंबई...
वाह री मुंबई तेरे कितनें दीवानें
मौत से खेलकर जो गये हैं कमानें
रेल ही ले लो...
कौन पता कब क्या हो आगे..
तुम ज़िन्दगी में भागो और ज़िन्दगी तुझसे भागे..!-
आमची लाडकी प्रतु
निरागस चेहर्याची,हळव्या मनाची ,नटखट स्वभावाची
स्मितहास्य जनु तिच्या चेहऱ्यावर कोरलेल
समजदार तर एवढी जनु माझी आई च आहे ती
अथांग पसरलेल्या सागरासारखी प्रेमळ
रुसवे फुगवे जनु तिच्या नाकावरच,
रागवलो जरा की लगेच डोळ्यातुन नद्यांचा उगम
सूर्याच्या सावली सारखी सतत सोबत राहुन
सुखदुःखाच्या गाडीचे चाक चालवणारी ती माझी बहीण
मैत्री कसी जपावी, जनु तीच्या रक्तातच भिनलेली
कधीच दुसर्यांना त्रास न होऊ देणारी आमची लाडकी प्रतु
हलक्याफुलक्या काळजाची,
छोट्या छोट्या गोष्टीने लगेच भांबावून जावुन हुंदके देऊन
रागात बोलणारी ती आमची प्रतु
-
जग आमच्या मैत्रीवर नाही आहे sure,
पण आमचं नात सगळ्यात pure,
ही मैत्री करते bad condition ला पण cure,
ही मैत्री काम करते जणू ती medicine of fever.
जगा वेगळी ही मैत्री आमची...
सगळयांना वाटते ही नाही कामाची,
पण आम्हाला काही करण नाही याच्याशी,
भांडणं आमचे छोटे मोठे आमच्याशी.
कधी रागवलं, भांडलं म्हणून संपलंं नाही आमच नात,
ही वाट जरी असली काटेरी पण आहे सोबत तुझा साथ.
ही मैत्री problemचं solution जे tensionला पण करते मात.
ही मैत्री आहे awesome आणी थोडी न्यारी,
Problemsमध्ये हात नाही सोडत आमची यारी,
Friendsची help करण्यासाठी नेहमी असते आमची तयारी.
— % &-
बालपणी शाळेतील किती गंमती जमती
रिकाम्या या वेळात ,मनात जमा होती
वर्गामध्ये असायचा, तेंव्हा एक मॉनिटर
बोललं जर का कोणी, नाव लिहायचा कागदावर
सरांकडून मग, प्रसाद मिळायचा हाती।।१।।
शाळेमध्ये असायचा, PT चा तो तास
सारेजण त्याची, वाट पहायचे खास
येता तास ,सारे धावत, मैदान गाठती।।२।।
वर्गामध्ये संपायची, पेनमधील शाई
मैत्रीणीस म्हणायचो, उसने ५ठिपके देई
ध्यान देऊन ते ठिपके, कसे मोजत जाती।।३।।
गृहपाठ अन निबंधावर, होता तेंव्हा जोर
नसेल जर पूर्ण तर, जीवास असायचा घोर
काही बहाद्दर खोटं सांगून, शाळेस दांडी देती।।४।।
१५ऑगस्ट,२६जानेवारी, सण असे मोठा
कपड्याला इस्त्रीसाठी, कोळसा अन लोटा
शाळेच्या गणवेशातील रूपे, गोजिरी दिसती।।५।।
आजच्या सारखी मुले-मुली, तेंव्हा बोलत नसे
मुलांचा की मुलींचा पहिला, चुरस अशी असे
नंबर साठी दिन रात अभ्यास करत जाती।।६।।
गावापासून शाळा आमची, तशी दूर होती
पावसाळ्यात शाळेत जाण्या,व्हायची फजिती
चिखलमध्ये पाय घसरून, घसरगुंडी होती।।७।।
©Manisha Malusare-