देशाचे स्वातंत्र्य।राहो अबाधित।
ध्वज फडकत।राहो सदा।।
स्वातंत्र्य, समता।न्याय व बंधुता।
राहो ती एकता।अखंडित।।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
©Manisha Malusare
-
भारतभूमी आमची माता
गाऊ तिचे गुणगान
भारत देश महान
आमचा भारत देश महान llधृ ll
उंच हिमालय शिरावरती
शुभ्र गंगा वाहे वरती
सुजलाम सुफलाम भारत माता
गाऊ तिचे गुणगान ll1ll
भारत भूमी स्वतंत्र करण्या
लढली सारी आमची जनता
देशासाठी जवानांनी त्या
दिले की हो बलिदान ll2ll
विविध धर्म अन विविध पंथ
विविध जाती अन विविध भाषा
तरीही सारे मिळून गाती
भारत भू चे गान ll3ll
©Manisha Malusare-
प्रगतीची पाऊले, पडतात जेंव्हा पुढे
नक्कीच सुरू होतात, मागे आढे वेढे।।
प्रामाणिक पणाला ,आहे का महत्व
त्याचेच नेहमी का, पाहिले जाते सत्व?।।
दुसऱ्याची प्रगती ,का खुपली जावी
त्याच्याच वाटेत मग, आड काठी व्हावी।।
का व्हावी आमची, मनं अशी कोती
दुसऱ्याच्या आनंदाचे, वेचावे मोती।।
तुम्ही व्हा ग्लोबल, आम्हाला अभिमान
का आमचीही ,उंचावू नये मान।।
का देऊ नये, आम्ही खंबीर पाठिंबा
उगाच का व्हावा, मार्गात खोळंबा।।
खेकडा प्रवृत्ती, जर होईल कमी
तरच देशाच्या ,प्रगतीची हमी।।
तुम्ही व्हा मोठे, आम्ही ही होऊ
कळत नाही आम्ही असे,गीत कधी गाऊ।।
©Manisha Malusare
-
ती फुगता गोल टम्म,
मम गाली आले हसू....
क्षणभर माझ्यामधली,
सुगरण लागली दिसू...
अलगद तिजला घेऊन,
ठेवली मी ताटामध्ये....
मिटक्या मारत मग ती,
गेली पोटामध्ये....
खाणारी मग तिजला,
भलतीच तृप्त होई...
मी आनंदाने पुन्हा,
दुसरी लाटत राही...
तुज लाटण्याचे काम,
आजन्म माझे असते...
त्यामागील ते कष्ट,
कोणास ना दिसते.....
©Manisha Malusare
-
घड्याळाची , वाजते खणखण
लवकर ऊठ ,म्हणते मन
पांघरून काढता,बोचरी थंडी
पुन्हा घेतो, अंगावर बंडी
कसला व्यायाम, अन कसलं काय?
साखरझोपेत ,हरवून जाय...
घड्याळ काटे, पळवत राही....
उठायला मग, उशीर होई..
ताडकन जेंव्हा,जाग येई
डिगभर कामांना, होते घाई
©Manisha Malusare
-
तीळ अन गुळाची, खूप खा वडी।
आमच्याबद्दल मनात, नका धरू अढी।।
तिळाप्रमाणे तुमचे, स्नेह असेच राहो ।
गुळासारखा गोडवा, ओठावर वाहो।।
यशाचे पतंग, उंच भरारी घेवो।
प्रगतीस तुमच्या, अथांग आकाश राहो।।
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Manisha Malusare
-
स्वराज्य आपले रक्षण्यास, पुत्र जीने घडविला
मानाचा हा मुजरा माझा, त्या जिजाऊ मातेला
शहाजी राजांची, पत्नी शोभे खंबीर
स्वराज ते उभारण्या,शिवरायांना दिला धीर
राम अन कृष्णाच्या, सांगितल्या त्यांनी गोष्टी
शिवरायांना घडवण्यास,रात्रंदिन त्या कष्टी
ढाल अन तलवार, हीच दिली खेळणी
स्वराज्याच्या सेवेसाठी, घडविला पुत्र गुणी
सोन्याचा तो नांगर, उजाड रानी फिरविला
न्यायाचा मार्ग त्यांनी, समाजास दाखविला
जुलूम अन अन्यायास, केले कठोर शासन
पर स्त्रीचा करा आदर, हीच दिली शिकवण
©Manisha Malusare
-
अनाथांची माय ,गेली आज दूर
लागे हुरहूर मना, लागे हुरहुर....।।
जन्मल्यापासून ,भोगले दुःख
अनाथांच्यासाठी जीने ,वेचीयले सूख...।।
संसाराला झाली, कायम पारखी...
जगवली जीने ,लेकरे पोरकी...।।
ठसठशीत कुंकू, डोक्यावर पदर
अनाथांच्या साठी ,मायेची नजर..।।
स्मशानास जीने, मानले घर
प्रेताच्या अग्नीवर, भाजली भाकर..।।
मुखामध्ये होती, जणू सरस्वती
आज झाली रीती, आज झाली रीती..।।
अनाथ लेकरं, झालीत पोरकी
माई तुम्ही गेल्या, आज स्वर्ग लोकी...।।😢
©Manisha Malusare
-
सावित्री..सावित्री.. तुझ्याचमुळे स्त्री..
आज पायावर उभी।।
स्त्री शिक्षणाचा ,घेतला ध्यास
भोगला किती,वनवास।।१।।
स्रियांसाठी, काढिली शाळा
शिक्षणाचा, फुलवला मळा।।२।।
विधवांसाठी ,धावून आली।
त्यांची तू ,कैवारी झाली।।३।।
पुण्यात येता, प्लेगची साथ
मदतीचा तू ,दिलास हात।।४।।
फिटेल कधी ,तुझे हे ऋण।।
मागे ठेवली आठवण।।५।।
©Manisha Malusare
-
आदरणीय सावित्रीबाईंना, करूया नमस्कार
त्यांच्यामुळेच मिळाला, स्त्री शिक्षणाचा अधिकार
मुलींसाठी शिक्षणाची, खुली केली दारे
स्त्रियांचे आयुष्य, बदलून गेले सारे
जोतिबांची घेऊन प्रेरणा,उभारली पहिली शाळा
स्त्रियांच्या उन्नतीचा,केला मार्ग मोकळा
शेण, दगड समाजविरोध,किती सोसला त्रास
स्त्रियांच्या उद्धारासाठी,भोगला वनवास
पंखामध्ये दिले बळ,घेण्या उंच भरारी
स्वतःच्या पायावर उभी,अभिमानाने आज नारी
पहिली स्त्री शिक्षिका, मिळविला त्यांनी मान
अशा या क्रांतीज्योतीचा,आम्हा आहे अभिमान..
© Manisha Malusare
-