भारतभूमीत जन्मलेल्या बुध्दाला,
इथं फोडल जात, मिटवल जात, रंगरंगोटीनी सनातनी बनवलं जात... शोकांतिका......
जगाने बुद्ध स्विकारला,
पण ज्या भूमीत तो जन्मलाय,
त्याच देशात तो नाकारला जातोय.... कारण त्याने.......
त्याच्या तत्वज्ञानाने....
मनुवाद, भांडली व्यवस्था, शोषण, सरंजामदारी हाणून पाडली जाते... म्हणूनच येथील प्रतिगामी, मनुवादी व्यवस्था, सरकारला उच्चभ्रू घटकांना, भांडवलदारांना..
परिवर्तनवादी, विद्रोही बुद्ध नकोय.... पण शेवटी सत्य बुद्धच आहे.....
@सागर-
बुद्ध जीवन्त आहे, बा भिमाने लिहलेल्या घटनेत,
आहेच जीवन्त बुद्ध....
अशोकाने भिरकवलेल्या "धम्मचक्रात".... बुद्ध जीवन्त आहेच....
पेटलेल्या वस्तीतील आम्रपाली, नालंदा, सिद्धार्थ गौतम बुद्ध, पद्मपाणी, आनंद बुद्ध विहारात...
आहेच तो जीवन्त.....
आमच्या @समानताने उभा टाकेल्या त्रिवार वंदनेत....
@सागर-
ते भितात अर्थात मनुवादी, प्रस्थापित सरकार, बाबासाहेब दगडांच्या पुतळ्यांनातून बाहेर पडून मूलमंत्र देतील शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...
म्हणून ते बा भीमाचे पुतळेच तोडून, फोडून, चपल्यांच्या हारांनी विटंबना करतात,
पण येणारी पिढी नाहीच थांबणार,
ते विद्रोह करतीलच बा भीमाचा, विद्रोही, क्रांतीकारी बुद्धांचा एक अंश होऊन..
हो ना समानता❤️-
समानता फक्त नावच नाही तर,
क्रांतीकारी, विद्रोही बुध्दाने राजेशाही फाट्यावर मारून प्रस्थापित केलेली समनाता,
तीच समानता बा भीमाने पाच हजार वर्षांपूर्वीची सरमांजदारी, जातीवादी, वर्णव्यवस्थेचा विस्फोट करून,
ह्या बुद्धांच्या जम्बुदिपात अर्थात ह्या भारतात पेरलेली "समानता".......
#हीच आमची समानता❤️❤️❤️-