गोष्ट छोटीशीच असायची पण सांगण्याची विशेष अशी शैली आजोबांकडे होती जिथं गोष्ट संपली तरी अजुन पुढे काय झालं हा माझा बालिश प्रश्न नेहमी आजोबांना असायचा.
आजोबाच्या खांद्यावर बसून गाव फिरण्यात जी मज्जा असायची ती आता महागड्या गाड्यांमध्ये बसून कधीच नाही भेटु शकत,गावाकडची गावराण अस्सल मराठी बोली आजोबांच्या आवडीची,आजोबांच काम मी कधी डोळ्याने बघितलं नाही पण ते सांगायचे जिथे मी काम करायचो तिथे घोडागाडी असायची मी ती घेऊन खुप दूरपर्यंत प्रवास करायचो लहानपणी ते ऐकायला खुप भारी वाटायचं
आजोबा नेहमी सांगायचे “सत्याची वाट जरी गरिबीची आणी कष्टाची असली तरी कधीही सोडायची नाही”आजोबांचे ते अनुभवी बोल मी कधीही विसरु शकत नाही Miss you Aajoba....-
आजोबा
नातवाचा पहिला मित्र
आईवडिलांचा जीव की प्राण
न व्यक्त करताही हृदयात प्रेमाची खाण...!
नातवंडाबरोबर बालपणात रमुण जाई
त्यांना शेवटचा मित्र बनवून घेई
जरी न लाभता सहवास जास्त
जीव मात्र नेहमी एकमेकांत अटकुन राही...!-
आजोबा
काठी टेकत काठी टेकत चालती आजोबा
पांढऱ्या पांढऱ्या मिश्यांचा डोले झुबका
डोईवर डोले तोऱ्यात फेट्याचा तुरा
जवळ येऊन बोला कमी ऐकू येते जरा
गोल गोल भिंगाचा चष्मा डोळ्यावरी
दातांनी घेतली रजा पण हवी पान सुपारी
केसानीही करून घेतला पांढरा शुभ्र रंग
चालताना बघा कसे थर थरे अंग
गप्पा गोष्टी गाण्यांची रोजच मेजवानी
वाटे ऐकत रहावे आजोबांची प्रेमळ वाणी
अंगरख्याच्या खिश्यातून हाती देती गंमत
आजोबा तुमच्या शिवाय नाही आम्हा करमत
श्रीमती देशमुख अनिता
-
आ - आयुष्यभर कष्ट करून मुलांना नातवांनच संगोपन करतो
जो - जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळ्यांना एकत्र बांधुन ठेवतो
बा-बालपण हे म्हातारपणाच दूसर रूप असत जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जात..
.. आजोबा..-
पिळदार मिशांचा बाबा
अजूनही स्मरतो रुबाब...
खिडकीशी येरझरा घाले
चाफ्यात रुजलेला आठवणींचा किताब...-
अस अवेळी जाणं 'बाबा' ...
मला काही परवडणारं नाहीये,,
माहीत आहे तुम्हालासुद्धा...
एकट्याला तिकडे करमणार नाहीये....-
प्रिय आजोबा,
मला तुमची खूप आठवण येते.जेव्हा पण मी कोणाच्या आजोबांबद्दल ऐकते तेव्हा मला तुमची खूप आठवण येते. मी तुम्हाला पाहिलं नाही, पण जेव्हा पण मी तुमचा फोटो बघते मला असं वाटत की मी तुम्हाला भेटले, तुमच्याशी बोलले.लहानपणापासून तुमच्या बद्दल आजी, पप्पा आणि बाकीच्यां कडून खूप ऐकलय अस वाटत मी तुम्हाला जवळून ओळखते. जेव्हा पण मला एकट वाटत किंवा रडायला येत; तेव्हा मी तुमच्या फोटो समोर येवून बसते,तुमच्याशी बोलते .मला खूप बरं वाटत.मी माझा मित्रमैत्रिणींना पण सांगितलंय की माझे आजोबा माझे best friend आहेत.तुम्हाला माहिती आहे तुमच्याशी बोलून मला माझा सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतात. आजोबा मला तुमची फार आठवण येते.I Love You And I Miss You❤️-
५-२-१९३६ ते १८-९-२०२० पर्यंतची तुमची कारकिर्द ,
आठवणी जपताना तुमच्या मन होई आर्त॥
कामावरी ठेवली निष्ठा, कुटुंबासाठी खस्ता काढल्या ,
प्रत्येकच नात्यात तुम्ही सा-या जबाबदा-या पार पाडल्या॥
होतात तुम्ही कांद्याचे खूप मोठे व्यापारी,
बुलेट आणि खाकी टोपीची ओळख तुमची न्यारी॥
आपल्या माणसावर होता तुमचा अफाट जीव ,
सत्यवादी तुम्ही ,खोटारडेपणाची केली नाही कीव॥
स्वतःच्या हातांनी भरला आपल्या घराचा पाया ,
घरातून तुमच्या कधी कुणी उपाशी नाही गेला॥
मासवडी,पिठलं भाकरी ,पूरण पोळीची तुम्हाला गोडी ,
निरोपालाही तुटली नाही तुम्हा भावा-भावांची जोडी॥
खरं सांगू का बाबा, जागाच पूरली नसती ,
इतकी माणसं तुमच्या निरोपाला आली असती॥
नसलात बाबा तुम्ही तरी इच्छा तुमची पूर्ण करू ,
तुमच्याप्रमाणेच माणसे प्रेमाने एकत्र जोडून ठेऊ॥-
५-२-१९३६ ते १८-९-२०२० पर्यंतची तुमची कारकिर्द ,
आठवणी जपताना तुमच्या मन होई आर्त॥
कामावरी ठेवली निष्ठा, कुटुंबासाठी खस्ता काढल्या ,
प्रत्येकच नात्यात तुम्ही सा-या जबाबदा-या पार पाडल्या॥
होतात तुम्ही कांद्याचे खूप मोठे व्यापारी,
बुलेट आणि खाकी टोपीची ओळख तुमची न्यारी॥
आपल्या माणसावर होता तुमचा अफाट जीव ,
सत्यवादी तुम्ही ,खोटारडेपणाची केली नाही कीव॥
स्वतःच्या हातांनी भरला आपल्या घराचा पाया ,
घरातून तुमच्या कधी कुणी उपाशी नाही गेला॥
मासवडी,पिठलं भाकरी ,पूरण पोळीची तुम्हाला गोडी ,
निरोपालाही तुटली नाही तुम्हा भावा-भावांची जोडी॥
खरं सांगू का बाबा, जागाच पूरली नसती ,
इतकी माणसं तुमच्या निरोपाला आली असती॥
नसलात बाबा तुम्ही तरी इच्छा तुमची पूर्ण करू ,
तुमच्याप्रमाणेच माणसे प्रेमाने एकत्र जोडून ठेऊ॥-