हर बार औरों के लिए
अपनी ख़ुशी कुर्बान करना ज़रूरी नहीं |
किसीकी हसी के लिए
खुदको रुलाना जरूरी नहीं |
हर बार रिश्तों की डोर को
पकड़े रखना जरूरी नहीं |
हर बार खुदको तकलीफ़ देने वालों से
रिश्ता निभाना जरूरी नहीं |
खुद मर्यादा मैं रहकर
औरोंको अपनी मर्यादा तोड़ते देखना जरूरी नहीं |
-
शब्दांची गरज भासत नाही
तुझे डोळेच माझ्याशी खूप काही बोलतात
तुझ्या पापण्यांच्या मागील लपलेली
गुपित सारी खोलतात-
खर सांगू प्रेम ही गोष्ट माझ्या साठी बनलीच नाही
मी सत्याच्या जगात कधी रमलीच नाही
माझं स्वप्नानांच जग खूप भारी आहे
तिथे मला आणि त्यांना स्थान आहे
कल्पणेच जरी असले तरी ते माझं होत
तिथे हसन, रुसण, रडणं , भाडण सगळ होत
तिथे त्यांची आणि माझी सारखी भेट असते
एकमेकांना गोष्टी सांगत वेळ सरते
खूपदा तर मी एकटीच बोलत राहते
त्यांची नजर तर एकटक माझ्याकडे पहाते
प्रत्येक्षात तशी भेट नाही आमची
पण कल्पनेची सोबत आमची
त्यांना तर माझं नाव गाव ही ठाऊक नाही
आणि मला आता त्यांच्या शिवाय कुणी दिसत नाही
माझ्या साठी तर ते माझं पूर्ण विश्वच बनलेत
पण त्यांच्या जगात माझं एक अंश पण नाही
माझ्या प्रत्येक आठवणीत ते आहेत
पण त्यांच्या साध्या ओठावर माझं नाव ही नाही
-
तू आसमानाचा मुक्ततारा
मी भूमीवरील अलड फुल
कधी कोण जाणे कशी झाली
प्रेमाची ही सुंदर भुल ✨
-
माझ्या प्रत्येक कवितेत
तुला तुझी खूण दिसेल
मी तुझ्यावर किती तुटून प्रेम केलंय
हे तुला पटेल-
न प्रेम न मैत्री
नात्याला आमच्या नाव ही नाही
मैत्रीच्या पुढे असून ही
ते प्रेम नाही ✨
-
येते मनात सारे काही सोडून द्यावे,
स्वप्नातली सत्यात उतरून यावे
डोळे उघडता समोर तू दिसावे
तुझा तू माझी मी न राहता एक होऊनी जावे
खूपदा वाटतं मनातलं तुझ्यासमोर मांडावं
भांडण का होईना तुझ्या सोबत बोलावं
नको ते प्रश्न नको त्या शंका नको ती धास्ती मनी
काय होईल ते होईल, पण सांग कोणी सोडवावी
कोडी माझ्या मनातली
राग रुसवा क्षणिक असतं माझा
सांग बरं मला मनवणं कर्तव्य नाही का तुझं
जीव घाबरा घुबरा होतो माझा तू जवळ नसताना
सांग बरं कोण दुसरा हवा मला तू सोबत असताना
प्रीती माझी कळत नाही का तुला
सांगितलं शिवाय काय वळत नाही का तुला
किती जिवाचा आटापिटा करावा तुला कळण्यासाठी
शेवटी तुझा तू माझी मी च असणार एकमेकांसाठी-
हलकेच मला तुझी याद आली
विसरलेल्या क्षणांना हलकेच जाग आली
का माहित या मनात का तुझीच बात आली
स्वप्नातही मला तुझीच साद आली
कोण जाणे ओठांवर गाणे कुठून येते
सुकलेल्या वेलीला बहर कोण देते
भेटूनी तुला अनेक वर्ष झाली
आयुष्याच्या पुस्तकाची पाणी जूनी झाली
तू असण्याचा भास मला होतो
तुला मी नकळत मिठीत घेतो
तू भेटशी नव्याने की आस मनात आहे
तुला भेटण्याचा ध्यास मनात आहे-
वो कहते रहे हमें उनसे मोहब्बत नहीं,
पर वो क्या जाने हमारा हाल-ए-दिल ।-