Kirti Murkute   (Dkirti Murkute.)
21 Followers · 8 Following

Diary _of_me.
#Feminist
#daily writer
#366 days-366 quotes.
Joined 28 July 2020


Diary _of_me.
#Feminist
#daily writer
#366 days-366 quotes.
Joined 28 July 2020
7 JUL 2022 AT 23:29

प्यार जताने का एक सलीखा।हर एक का अपना तरीका॥
कोई कभी कुछ छुपा ना पाए।कोई कुछ कह ना पाए॥
कोई रुठोंको मनाए।कोई मनवाने के लिए रूठ जाए॥
कोई रोज मिलके भी अधुरे।कोई बिना मिले होते पुरे॥
कोई साथ है हर खुशी-गम मे।कोई मस्त-मगन अपने ही धुंद में॥
ईश्क के नहीं कोई सलीखे।पर बया करने के कही तरीके॥

-


6 JUL 2022 AT 22:35

कोरोनाच्या या महामारीने,नाती दफन केली।
खडतर प्रसंगामध्ये,आपले-परके विसरून गेली॥
कधी आपलं म्हणवणारे,ओळख देईनासे झाले।
जीवाच्या भीतीने,ते ही मास्कच्या आड गेले॥
कित्येक लोकांचे,सखे सोयरे निघुन गेले।
पण मरणाच्या भीतीने,कोण कुणाला भेटायला गेले?
शास्त्र पाळणारा प्रत्येकच जण,पळवाट शोधु लागला।
काय माहित कुणाच्या पिंडाला,कुणाचा कावळा शिवला॥
फक्त नावांचीच झाली दाटी,माणसं माणसाला विसरली।
ह्याच्या-त्याच्याकडे बोट दाखवत,माणसातली माणुसकी विरली॥

-


4 JUL 2022 AT 22:50

मैत्रीचा आरसा असतो,अगदी नितळ आणि स्वच्छ।
निखळ आठवणींनी,आयुष्य भरून जातं गच्च॥
मैत्रीच असते,धकाधकीच्या आयुष्यातला विरंगुळा।
वाईट प्रसंग व कडू आठवणींना,जागीच बसतो आळा॥
मैत्रीच्या गुलदस्त्यात,होतो माणुस अगदी निवांत।
फुलं जरी निरनिराळी,तरी त्यामध्येच होतो शांत॥
मैत्रीच्या प्रांताला,नसतात कुठल्या सीमारेषा।
नसल्या रोज भेटी तरी,फक्त आठवणीही पुरेशा॥
आयुष्याच्या कपाटाला,मैत्रीचा कप्पा हा हवा।
जिथे मित्र-मैत्रिणींचा असावा,अनमोल ठेवा॥

-


1 JUL 2022 AT 22:33

चंद्र तर आजही एकटा,चांदण्यांत राहून।
आपण तर माणुस,पाहू गर्दीतून बाहेर येऊन॥
लोकांच्यापेक्षा वेगळे चाललेलं बरं।
स्वतःसाठी उत्तर शोधलं तर स्वतःलाच सापडेल खरं॥
खुळ्यांच्या बाजारात,खुळेच सारे भेटणार।
हरलोच कधी तर,वाट कोण दाखवणार?
प्रवाहासोबत वाहवण्यापेक्षा,प्रवाहाबाहेर निघालेलं चांगलं।
पायंडा पाडण्याच्या नादात,आपण भविष्यंच वेशीला टांगलं॥
आम्ही सोबत राहताना 'मी' चाही विकास महत्त्वाचा।
कारण दुधाची घागर भरताना,प्रत्येकाचाच तांब्या पाण्याचा॥

-


29 JUN 2022 AT 23:12

रोज नवा दिवस,आपल्याला काहीतरी शिकवून जातो।
घडवून स्वतःलाच बदल,असं सारखं सांगत राहतो॥
रोज नवी अडचण,फक्त लढ म्हणते।
हरलास तरी चालेल,फक्त भिड म्हणते॥
संकटांचा असा लोट,म्हणतो पार करून दाखव।
विरलेली तुझी स्वप्ने,नशिबाला भेट म्हणून पाठव॥
अडचणीही थकतील कधी,जिद्द तुझी पाहून।
किती दिवस जगतील त्या,तुझ्या तोंडातला घास खाऊन॥
आव्हानं नवी स्वीकारून,मैदानात तर उतरु।
हत्तीलाही आडवे पाडु,समजेल जो आपल्याला शिंगरू॥

-


28 JUN 2022 AT 23:08

आई जाताना एकटी जाते,पण बाप कधी एकटा जात नाही।
तो आईचं बाईपण,सोबत नेल्याशिवाय राहत नाही॥
घरात खनखनत्या बांगड्यांचे,नाद बंद होतात।
छुमछुमणारे पैंजण,एकाएकीच शांत होतात॥
कुंकवाची कोयरी,भरलेली असुनही अलिप्त राहते।
ओसाड पडलेलं कपाळ,एकटक होऊन पाहते॥
सण-समारंभात,भरजरी साड्या कपाटातच निजतात।
माना-पानात मिरवणाऱ्या,एकजागी खुर्ची धरताना दिसतात॥दागदागिने, यवेण्या-गजरे दुसऱ्यांच्या अंगावरच खुलतात।
साड्यांचे फिकटसे रंग,स्वतःहून आपलेसे होतात॥
बाप जाताना,कधीच एकटा गेलेला पाहिला नाही।
जाताना आईंचं बाईपण,सोबत नेल्याशिवाय राहिला नाही॥

-


27 JUN 2022 AT 22:53

जिंदगी जिना भुल गए,हर बार हम कुछ सोचते रहे।
लोग क्या कहेंगे?बस सोचते ही रह गए॥
दुसरोंके लिए हम,खुद को भुलाकर जिते रहे।
खुदको भुलाकर हम,उसे त्याग का नाम देते गए॥
सबके लिए सब करके,खुद के लिए कुछ करना भूल गए।
परिवार ही थी वजह,हम उसे जिम्मेदारियाँ कहते गए॥
एक दिन शिकायत तुम्हे वक्त से नहीं,खुद से होगी।
जिन्दगी सामने ही थी और हम कहीपर उलझे रहे॥

-


26 JUN 2022 AT 19:56

वह कोई और बात है की,दिल का हाल बया न कर सके।
तकल्लुफ होती तो है दिल को,पर हम आपपर इश्क जाया कर चुके॥
काश दिल भी तो ऐ गुंगा होता,दिल की बात कह ना पाता।
बेहतर होता वही,तभी शायद यु उसे कुचला ना जाता॥
लाल रंग दिखाकर,उसे हम भी कही रोक पाते।
पर कम्बख्त लाल रंग इश्क का,हम कहाँ उसे छुपा पाते???

-


21 JUN 2022 AT 23:35

दमुन भागुन घरी आल्यावर,जेवायला वाढणारा आईचा हात।
शिनलेलो असताना,डोक्यात कुरवाळणारा बायकोचा हात॥
डोळ्यातून अश्रु वाहताना,अल्लद डोळे पुसणारा आईचा हात।
हरलेल्या प्रसंगात खांद्यावर हात ठेवून,लढ म्हणणारा बायकोचा हात॥जिच्या कुशीतुन जग पाहतो,तो आईचा हात।
जिच्या मिठित जगाचा विसर पडतो,तो बायकोचा हात॥
जो बोट धरून तुम्हाला चालायला शिकवतो,तो आईचा हात।
जो तुमच्या मुलांना चालवतो,तो बायकोचा हात॥
जो आयुष्यभर पाठीशी असतो,तो खंबीर आईचा हात।
जो हातात हात घेऊन चालतो,तो दमदार बायकोचा हात॥
फरक नाहीच दोघींमध्ये मुळी,एक तुमचा कान एक आवाज।
दोघींचाही हात हाती असेल,तर नसेल उद्याची बात॥
त्या दोन्ही हातांचा समतोल ठेवून,करावी संसाराला सुरुवात। दोघींच्याही साथीने सुखकर आयुष्य,जगावं तुम्ही आरामात॥

-


16 JUN 2022 AT 22:09

तुमच्या मुलाला काही येत नाही,असं ऐकुन घ्यायचं नाही।
काय करायचं आता,तुम्ही येऊन शिकवता का काही ?
मुलांना कुणी बैल म्हणता,शिंगे त्यांची तपासू नका।
भोक्सेल बरं का कधीही,तुम्ही मात्र सावध राहा !
पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तिन्ही लोकी फडकावा झेंडा।
म्हणुन आपल्या पोरांसाठी,गरज पडेल तिथे भांडा॥
असतात काही परिक्षक,घ्यायला पोरांची तुमच्या परिक्षा।
सडेतोड उत्तरे द्यावीत अशांना,करायचीच कशाला प्रतिक्षा ?
लोकांना असतेच भारी आवड,करण्या आपली पोरं प्रसिद्ध।
दटावून घ्यावा निर्णय,करून त्यांना प्रवेश निशिद्ध॥

-


Fetching Kirti Murkute Quotes