माझ्या अंगी असलेला आजार जी स्वतःवर घेते आणी
रात्रभर जवळ बसुन ती थर्मोमीटर ही बनते......-
नाकाम झिंदगी की मुक्कमल किताब है हम!
खरंतर शब्दच असतात माणसां... read more
भेटायला नाही आला तरी चालेल पण फोन करत रहा फोनवर बोलल्याने अर्धी भेट होते>>>>>आजी
-
आई म्हातारी झाली तर तीचा हात पकडण्यास तुला आता लाज वाटते आहे पण विसरु नकोस जेव्हा तु लहान होता तेव्हा तीने तुला हाताने घास भरवले होते,जेव्हा तु लहान होतास तेव्हा तिने तुला झोक्यात झोपवले होते जेव्हा तु लहान होतास तेव्हा ती तुला पाठीशी झोपवून उन्हात दुर चालली होती जेव्हा तु लहान होतास .......
-
आजी म्हणायची ....
पाहुण्यांना कधीचं तसं पाठवायचं नाही
कमीत कमी त्यांना चहा तरी विचारायची
मग सगळे मिळून चहाचा आनंद घ्यायचे
खरंतर आजी चहा नाही नाते बनवायची.....— % &-
तुमच्या मनाची सुंदरता जगातला कोणताच आरसा नाही दाखवु शकत आणी खोट म्हणतात लोकं “आयना अक्सर सच बोलता है"पण तो फक्त तुमचं क्षणिक हसणं दाखवतो ते पण कधी कधी खोट्ट असतं तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या,तुमचा कठीण काळ,तुम्ही सोसलेल्या वेदना तो आरसा नाही दाखवु शकत.......
-
गोष्ट छोटीशीच असायची पण सांगण्याची विशेष अशी शैली आजोबांकडे होती जिथं गोष्ट संपली तरी अजुन पुढे काय झालं हा माझा बालिश प्रश्न नेहमी आजोबांना असायचा.
आजोबाच्या खांद्यावर बसून गाव फिरण्यात जी मज्जा असायची ती आता महागड्या गाड्यांमध्ये बसून कधीच नाही भेटु शकत,गावाकडची गावराण अस्सल मराठी बोली आजोबांच्या आवडीची,आजोबांच काम मी कधी डोळ्याने बघितलं नाही पण ते सांगायचे जिथे मी काम करायचो तिथे घोडागाडी असायची मी ती घेऊन खुप दूरपर्यंत प्रवास करायचो लहानपणी ते ऐकायला खुप भारी वाटायचं
आजोबा नेहमी सांगायचे “सत्याची वाट जरी गरिबीची आणी कष्टाची असली तरी कधीही सोडायची नाही”आजोबांचे ते अनुभवी बोल मी कधीही विसरु शकत नाही Miss you Aajoba....-
आयुष्य कसं जगायचं हे निवडायची संधी फार कमी जणांना भेटते,आयुष्य आपल्यावर लादलं गेलेल नसाव,जर आपण आपल्याला न आवडणारं काम आयुष्यभर करत राहीलो तर प्रत्येकाला वैयक्तीक स्वातंत्र्य असतं अस म्हणणं चुकीचं ठरेल !!
-
सूर्य अंगावर घेऊन जगाला सावली देत उभे असणारे हे जीव ऊन पाऊस वारा झेलून जगणं कसं आणी कुणासाठी असावं हे शब्दाविना सांगतात,आणि आम्हाला साधं त्यांच्याविषयी कृतज्ञ रहायला ही सवड नाही आम्हाला फक्त मोठ्या बिल्डींग बांधायच्या आहेत ढगांशी बरोबरी करणाऱ्या पण ज्यासाठी ही ढगं बरसतात ते हे अबोल झाडे आहेत.मानवाने जंगले छाटून खुप प्रगती केली पण खरं तर आपण येणार्या भविष्यातील आपला अंत ओढावून घेतला
आहे हे समजायला आपल्याला थोडासा उशीर लागेल...-
कधी आनंदी तर कधी दुःखी
दोन बाजू नाण्याप्रमाने आयुष्याच्याही
पण जेव्हा संवाद स्वतःशी साधला जातो
दुःखी स्पंदने ही फुलपाखरा परी उडुन जातात...-
देवा कसं चालेल रे असं ? काय समजावं या हळव्या मनाने!
पाऱ्या सारखं बदलणारं नशीब देऊन वेळेच्या हातात दगड ही तुच देतोस.....-