आई आणि मराठी माय याच फक्त माझ्या हृदयाचा ठाव घेतात.
-
कविकट्टा प्रमुख
रान फुल साहित्य व्यासपीठ अध्यक्षा
आदर्श शिक्ष... read more
आज आहे चिऊताईच्या बाळाचे बारसे
नटून थटून आले चार ससे
मनी माऊ ने केला वरण भात
उंदीर मामा ने लाटल्या पोळ्या सात
कावळ्याने तळले मिरची भजे
खारुताई ने चिरले सॅलड ताजे
माकडाने बनवले चिंचेचे सूप
पिऊन सारे खुश खूप
मैना राणीने सजवला पाळणा
साळुंखी आत्या कुर्र करांना
दिमाखात रंगले चिंटूचे बारसे
पोट भर जेवून पळाले ससे |
-
हातात पावा
राधा करते धावा |
गोविंदा रे गोपाला |
पायी पैंजण
वाजती छुम छुम
गोविंदा रे गोपाला |
लोण्याचा गोळा
गवळणीचा मेळा
गोविंदा रे गोपाला |
कुरळे केस
शोभे मोर पीस
गोविंदा रे गोपाला |
नटखट लीला
यशोदेचा लल्ला
गोविंदा रे गोपाला |
जन्माष्टमी रंगला मेळा
दही हंडी सण आगळा
गोविंदा रे गोपाला |
-
कोळीदादा
सांग ना कोळी दादा
कसे बांधले घर??
नाही त्याला पाया
नाही एकही पिलर
सांग ना कोळी दादा
कसा चढतो भर भर
आठ आठ पायांनी
कसे काढतो जोर???
सांग ना कोळी दादा
कसे उघडतोस दार
तुला पाहून कीटक
होती पसार
सांग ना कोळीदादा
एक सारख्या कश्या खिडक्या
चुकत नाहीत का कधी
तुझ्या चौदाखड्या???
सांग ना कोळीदादा
कसे घालतोआठ आठ शूज
मस्त सोफ्यावर बसून
बघतो का न्युज????
-
काम देव आज खजिल झाला
कोपऱ्यात तोंड लपवून धूमसून रडू लागला |
कुठून बुद्धी सुचली याला पुरषार्थ दिला????
नीच कृत्य करण्या आधीच का नाही मेला???
3वर्षांची चिमुरडी पाहून नराधम जागा झाला
खरंच याला भुलोकात आणून मीअपराध केला |
दादा म्हणून चिमुरडी ने विश्वास टाकला
तिला कुठे माहित विश्वास पानिपतातच मेला |
काम देव आज खजिल झाला........
कोपऱ्यात तोंड लपवून धूमसून रडू लागला........
-
झाडावर भरली
पक्ष्यांची शाळा।
पोपट मैना
झाले गोळा।
ऐटीत बसले
कावळे गुरुजी।
शिकवू लागले
ताजी भाजी।
कडू कारले
टोमेटो लाल।
पौष्टिक बीटचे
गुलाबी गाल।
गर्द हिरवी
लवंगी मिरची।
काटेरी वांग्याची
छान छान खुर्ची।
उंच मारली
शेवगा उडी।
चिऊच्या हातात
मेथीची जुडी।
मंजुळ स्वरात
गाते गाणी।
कोकिळा आणि
मैना राणी ।
ताज्या भाज्यांची
केली भेळ।
फस्त करून
संपवला खेळ।
-
चिव चिव चिमणी
भरू लागली पाणी।
वाटेत भेटली
मैना राणी।।
गप्पा रंगल्या
छान छान।
हरपुन् गेले
वेळे चे भान।।
घाई घाईत
गाठले घर।
कामे उरकली
भर भर।
जेवण केले
पोट भर
सोफ्यावर बसून
दिली ढेकर।
-
Live life by your own way
Block those people, moment that disturb you.-