अनुभव माझा खूप आहे
दिलेलं आजवर आयुष्यानं खूप आहे...
सुख दुःख असेल सम समान
समाधानात मात्र मी खूप आहे...
आत्मविश्वास मला असा गवसलाय
अशक्य असणारं ही शक्य खूप आहे...
तो नित्य पाठीशी चालतोय माझ्या
स्वामीं समर्थांचा वरदहस्त खूप आहे...
निराशेचा स्पर्श होतं नाही कधी
आतून सकारात्मक प्रतिसाद खूप आहे...-
अनुभव माझा नाही फार
पण लेखणीस माझ्या आहे धार
जरा जास्तच आहे लेखणीचा लळा
तिनंच फुलवलाय हा आयुष्याचा मळा
नको वाटते आता अजिबात दुर जाणे
भरून पावलेय आता नाही काही उणे
आयुष्य आता तुझ्या सहवासात जावे
लेखणी तुच संगिनी बनून पुढील जन्मी यावे
श्रीपद्मा
-
अनुभव माझा
माझा आरसा
मी वेगळा नाही
त्याहून जरासा
ओबडधोबडच
आहे तो जरासा
कष्टात रापलेला
शीणला बराचसा
कसोटीवर मात्र
खरा उतरलेला
शून्यातून भरारी
आकाशी घेतलेला
अभय.....
-
अनुभव माझा शिकवण देतो
जे येईल जीवनी त्याचे स्वागत करावे...
दुःखी न होता आनंदीच रहावे
सुख अंती मिळणारच आहे...
आत्मविश्वास कधी न ढळू द्यावा
ईश्वराचा आशिर्वाद नित्य असावा...
खऱ्याने वागताना न कधी घाबरावे
सत्यमेव जयते हेच खरे आहे...
आरती नार्वेकर...
-
कुणी काहीही म्हणो, आपण कितीही नाकारले तरीपण
पैशाशिवाय सन्मान आणि प्रतिष्ठा नाही..
(अनुभव घ्यायचा असेल तर घरगुती आणि सामाजिक/स्थानिक कार्यक्रमांमध्ये याचा अनुभव येईल)
#अनुभवमाझा-