ही लेखणी टोकदार वाटते.....
तुझे नाव लिहायला घेतल्यावर
आल्हाद लिहितो तुझे नाव मी
नको ना ओरखडा नाजुकतेवर
अभय-
अगदी जिवलग व्यक्तींच्या जास्ती पण जवळ जाऊ नये
झूम करून पाहिले की चित्रातले दोष पण ठळक होतात
अभय.....-
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चौऱ्यांशी लक्ष योनी मुक्तीसाठी आतुर
साऱ्या जन्मात झाला रामनामाचा विसर
अंतकाळी आठवता कोण येईल सत्वर
केले कर्म करते येणाऱ्या जन्मावर असर
कर्माच्या सिद्धांताचा कधी पडू नये विसर
मोक्ष साधण्या नको फक्त पूजापाठ जागर
हवा वृत्तीमध्ये बदल आणि सात्विक वावर
अभय...
-
किलबिल किलबिल पक्षी बोलती
दुडूदुडू दुडूदुडू घरभर फिरती
आज्जी आजोबा सुखाने पाहती
एक चिऊ काऊंचा घास भरवती
किलबिल किलबिल पक्षी बोलती
बोबडे बोबडे बोल कानी पडती
साखरेचं पोत पाठीवर मिरविती
घरभर गोकुळ सारे आनंददती
किलबिल किलबिल पक्षी बोलती
हळूहळू हळूहळू शाळेमध्ये रमती
डौलात तारुण्यावर मांड ठोकती
आपल्याच स्वप्नांसाठी कष्ट करती
किलबिल किलबिल पक्षी बोलती
लहानाचे मोठे किती पटकन होती
पंखात बळाने आकाशी झेपावती
पुन्हा घरटी एकाकी रिकामी होती
अभय.......
-
कळा ह्या लागल्या जीवा पण साकारतो आहे अमूल्य ठेवा
गाजलेल्या गाण्यावर लिहावे हा सतीश सरांचा उपक्रम नवा
अवघड एक अट त्यात सहभाग चारोळी स्वरूपात नसावा
काम नसे हे सोपे डोक्याला ताण त्यासाठी द्यायलाच हवा
नोहे ऐकल्याचा हा खेळ चला पटापट तुम्ही सारे सामील व्हा
दणक्यात उपक्रम होईल साजरा एकेक करत बनेल कारवा
अभय
-
कशी करू स्वागता,ह्या नाठाळ आठवणींचे
मन हळवे,मोरपिस ते अनुभवल्या भावनांचे
क्षण रुजले क्षण सजले क्षण रंगले संगतीचे
आभास होते श्वास झाले निमित्त भेटण्याचे
कसे वावरू कसे सावरु आभास आठवणींचे
गहिवर मनी कातर वाणी बावरल्या नयनांचे
कशी करू स्वागता आता मी माझ्याच मनाचे
कसे म्हणू माझे मन,तुजला अर्पित जन्मजन्माचे
अभय
-
कठीण कठीण कठीण किती
लाईक आणि कॉमेंट येणे बाई
लिहून पोस्ट होत नाही तोवर
लाईक कॉमेंट मोजायची घाई
कठीण कठीण कठीण किती
व्याकरण किती क्लिष्ठ हे बाई
कोणी काढले हे यमक वृत्त छंद
व्याकरण शुद्धच का हवी रुबाई
कठीण कठीण कठीण किती
का नियम पाळून लिहायचे बाई
मोडकं तोडकं माझं हे लिहिणं
आपण गोड मानून घ्यावं ओ जी
अभय.....
-
उगवला चंद्र पुनवेचा संपला भार केसांचा
मोकळे आकाशी डोई थेट किरण सूर्याचा
लाऊन विग डौलात मिरवतो मान केसांचा
बघणारे निरखती म्हणती हा विग टकल्याचा
कशाला हौस करावा अट्टाहास मिरवण्याचा
रहावे चमकत जरी थोडा त्रास मान निसर्गाचा
अभय....
कोणाशी हे वास्तव जुळल्यास निव्वळ योगायोग समजावा 🤣🤣🤣-
अंतरीच्या वेदना मांडल्या जेव्हा
वाहव्वा किती छान लिहिले म्हणाले
मांडलेले अंतरीचे भाव ज्यांच्यासाठी
ते मार्गावरील सर्व लाईन्स व्यस्त म्हणाले
अभय.....-
आली ठुमकत नार लचकत लिहिते कविता ही लेखणी
कधी समेवर कधी तालावर छंदवृत्तावर चालते लेखणी
तिचा डौल न्यारा तिची चाल भारी सोबतीला साजणी
रंगे विनोदात मांडे दुःख शब्दात कधी परखड लेखणी
नवनव्या विषयांचा नित्य सुकाळ असे हो वाय क्यू वरी
कधी पाऊस लाईक कॉमेंटचा कधी हवा होते दुष्काळी
हंगाम हा गाण्यांचा विषय आवडीचा तुम्ही घ्या लेखणी
संपन्न प्रयत्न हो माझा करतो सादर तुम्हा चार ओळी
अभय.....-