QUOTES ON #VITTHAL_RUKMINI

#vitthal_rukmini quotes

Trending | Latest
12 JUL 2019 AT 17:59

मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या
पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली
!! पुंडलिक वरदे हारि विठ्ठल !!
!! श्री ज्ञानदेव तुकाराम !!
!! पंढरीनाथ महाराज की जय !!

-


22 JUL 2018 AT 23:31

अवघ्या देहाची कशी जाहली पंढरी
आत्मा माझा तुच विठ्ठल-रखुमाई

-


15 JUL 2021 AT 16:04

Shri Rukmini maharani is Hari's Aatmika.
She is Hari vakshsthal nivasini.
Krishna describes her as salt
without which his family is
A tasteless dish.
Mahalakshmi herself- she has no equal to her
In beauty and qualities.
She was blessed as Kalyani by Balram dau.
Still in Jagannath Puri lord's food is cooked in her kitchen.
The festival of Hera Panchami and Niladri bije
in Rath Yatra are displays of affection of her and lord for each other.
Imagine how much Krishna ji loves her
That one letter
made him anxious
To come and
take her along
as wife.

-


1 JUL 2020 AT 14:34

||विठ्ठला ||

कोणी म्हणे विठ्ठला...
कोणी म्हणे विठुराया...
कोणी म्हणे पांडुरंग...
कोणी म्हणे विठु सावला कुंभार...
भगवान विष्णु आणि श्री कृष्णा ची आवतार तुझी
पण आमच्यासाठी तुच आई आणि तुच बाप...
विठु माऊली तु माऊली जगाची...
आषाढी एकादशीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा...

-


28 AUG 2019 AT 1:55

माणसांमध्ये ही देव असतो ते तुम्हाला बघितलं की उमजते...!!
तुमची भक्तांवरची अतोनात माया काळजात ही घर बनवते...!!

विठ्ठल रखुमाई चे रूप बघता मन ही अगदी तृप्त होते...!!
कधी प्रेम म्हणजे काय वाटलं की याचेही उत्तर आपोआप मिळून ही जाते..!!

माऊली या रुपी तुम्ही हसता बोलता आम्हां लोकांना दिसता...!!
देव खरंच आहे हे तुम्ही विठ्ठल रूप घेतल्यावरती या डोळ्यांचे पारणे फिटवता...!!

भूवरी अंतरी तुझे रूप हे ऐकताच हृदयाचाही ठोका चुकतो...!!
भाग्य आमचे चांगले म्हणुनी तुमच्या रुपात साक्षात माऊली आम्हाला भेटतो...!!

देव आम्हां सगळ्यांशी आपोआप एकरूप होऊनी जातो...!!
फक्त ती हाक आपण मनापासून मारली की देव ही आपल्या हाकेला प्रतिसाद देतो...!!

पुंडलिका भेटी माऊली हसतो खेळतो आणि मनमुराद सेवेचा आस्वाद ही घेतो...!!
तितकीच मनापासून श्रध्दा असली की या युगात ही देव तुम्हा आम्हाला भेटू शकतो...!!

-


1 JUL 2020 AT 14:40

सुनी-सुनी लागे रे पांडुरंगा
जणू आज तुझी पंढरी...
तुझ्या दर्शनाच्या वाटेकडे
आस लाऊन बसला होता रे वारकरी...
टाळ मृदुंगाचा तो गजर
भक्ती-गिते रखूमाई अन्‌ सावळा हरी...
तुझे स्मित ते रूप भरले रे या उरी...
तुझ्या नावाचा जयघोष
दुमदुमू दे रे या गगणी...
नको तुझ्याकडून सोन्या चांदीच दान
फक्त तुझा सहवास राहू दे या मनी...
एकची मागणे रे रखूमाईच्या संगा
जगावर आलेलं हे संकट तार रे पांडुरंगा...

-


1 JUL 2020 AT 10:43

हात कटावरी पाय विटेवरी...
ठेवुनी उभा युगी युगी...
शेतकऱ्याच्या शिळ्या भाकरीत तुझी गोडी...
शेतमाउली जशी तुझी अन रुख्मिणीची जोडी...
काळ्या मायेच्या साथीला राहूदे तुझी साउली..
माझ्या घामाच्या कष्टातच माझी विठू माऊली...
पाण्याच्या दांड वाहतो शेतात जशी वाहते चंद्रभागा...
भोळ्या नंदी ची घंटी देते जशी साथ तुझ्या अभंगा...

-


1 JUL 2020 AT 11:05

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम ॥

ज्याला जन्म नाही, जो रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्राम-धाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जीवनाच्या सर्व अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्म रूप पांडुरंगास मी भजतो

The one who is not born, who is the life force of Rukmini, the ultimate resting-place for the devotees and the pure Kaivalya, the awakening, the dream and the sensation. Who is beyond the three stages of life.
One who is forever cheerful, who takes away the misery of the people, Who is a form of Parbrahma himself, I worship the Lord Panduranga.

-


28 JUN 2020 AT 14:56

यंदाची वारी मानुन घे राया
प्रसंग बाका ओढविला ॥
टाळ, चिपळी, मृदंग सारे विसावले
संकिर्तनाचा काला निवविला ॥
वैष्णवांचा मेळा काकुळतीस आला
एकटाच विठू वाळवंटी उभविला ॥

मिटव रे राया सारी चिंता, भ्रांत
लागलिसे आस भेटिची ।
घेवूनी पताका, कळस गठीन
होवू दे सुकर वाट एकदाची ॥

-


10 JUL 2022 AT 11:31

हे विठ्ठला ....🙏
आम्हां वरी राहू दे कृपादृष्टी सदा तुमची...
योग घडू दे तूझ्या दर्शनाचा...

नाम तुझे घेऊन ओठांवरी...
लागू दे कर्म तया सत्कर्मी...

माऊली माऊली गजर कानावरी...
सर्व चिंतामुक्त वेळ लागे बेधुंद मनाला...
पावलांना न सुचे काही...
मत्रमुग्ध होऊन एक तालावर नाचू लागती हे वारकरी....
शेकडो वारकरी भक्ताच्या हट्टास कृपा करण्यास तू ये आषाढी एकादशीला पंढरी...
हात जोडून नमन माझ्या विठ्ठलास🙏🙏
नेहमी असू दे आशीर्वाद आम्हावरी...
!!जय हरी विठ्ठल!!

-