सावरणं आणि आवरणं वेळीच असावं….!
सारखचं सांडत गेलं की मुरत नाही,
मग ते पाणी असो किंवा अश्रू…
सारखेच वाहत असतील तर त्या अश्रूना काही किंमत उरत नाही.
अश्रू आणि वेदनांचा धुमाकूळ हा वेगळाच असतो…
वेदना ह्या एक मागे एक तत्पर येत असतात त्या
आपल्यातील क्षमतांची वाढ करण्यासाठी
मात्र लक्षात असावं की वेदनांना शेवट असतो…
आपल्या वेदना जेव्हा त्यांची परिसीमा पार करतात
तेव्हाच आपण आपल्या क्षमतांचे उच्च शिखर गाठत असतो…!
आपलं परिस्थितीला भिडण्याचं धाडस असं दांडग होत जातं…!
याचा अर्थ कधी वेळी खचणं, निराश होणं चुकीचं आहे असंही नाही
मात्र सावरणं आणि आवरणं वेळीच असावं…!-
@the_thinking_treet3
Expressing is just reflecting yourself in your best high... read more
संयम….!
स्वतः, स्वतः बरोबर केलेला संघर्ष म्हणजे संयम..!
जनावराच्या पाशवी शक्तीची क्षमता असलेले मानवी
अंगभूत विकार
आणि
त्या प्रत्येक विकारावरती, “स्व” वरील विश्वास ढळू न देता
संयतपणे दिलेला लढा म्हणजे संयम..!
जिथे मानसिक संयम ढासळतो तिथे संयम कामी येत नाही ..
अनेक महत्वाकांक्षी परिणत साध्य झालेल्या घटनेच्या मागे
अथक परिश्रम असतात… असे असले तरी ह्या अथक
परिश्रमाची शृंखला तुटू न देण्याची मुळ प्रेरणा ही संयम असते….!
खरा संघर्ष हा कधीच बाह्य नसतो
चाललेले हे युद्ध स्वतः चे आणि स्वतः बरोबरच असते
संयम ह्या अविरत युद्ध रथाचा कृष्ण-सारथी ठरला
तर अगणित महायुद्ध सहजसाध्य होऊन जातील…!-
संतुलन
निसर्गाच्या प्रत्येक निर्मितीमागे दडून असलेले गुपित म्हणजे “संतुलन”
आवश्यक तेवढ्या वेळेमध्ये, तत्वांमध्ये, कोणत्याही प्रकारची कृत्रिमता
टाळून नियंत्याने साध्य केलेल्या निर्मितीला आपण साक्ष असतो.
संतुलनामध्येच निर्मिती, सुस्वरूप, आणि पराकोटीची उच्चता दडलेली आहे.
असंतुलन हे कोणत्याही प्रकारच्या विनाशाला आणि अव्यवस्थेला जन्म देते.
आपले नित्य जीवनामध्ये आव्हान हे संतुलन कसे साधावे हेच आहे.
हे संतुलन मग अध्यात्मिक, बौद्धिक, वैचारिक, मानसिक किंवा शारीरिक
असे असेल किंवा मग भौतिक जीवनामधील प्रत्येक व्यवहाराचे असेल.
संतुलन हा आरोग्यमयी, सुसंपन्न जीवनाचा मूळ धर्म तसेच पाया आहे.-
स्पष्टता॰॰॰॰!
तुमची जीवनाबाबतची स्पष्टता तुम्हाला तुमची कथा
आणि त्या कथेमधील उपकथा यांची वीण मजबूत
ठेवण्यास मदत करतील. आल्फ्रेड ॲडलरने सांगितल्याप्रमाणे,
आपण स्वत: ला प्रयत्न करण्यापासून स्वतःला दूर ठेवतो.
आपण स्वतः ला कमीपणाच्या किंवा नेयुनगंडाच्या मानसिकतेमध्ये
गुंतवून घेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
शिवाय, अर्थाची सखोल जाण अनुभवायलाही कोणतीही
आर्थिक किंमत मोजावी लागत नाहीत, त्यासाठी हवी असते
ती फक्त दूरदृष्टी.
आपल्याला फक्त एक जीवनदृष्टी विकसित करायची आहे
आणि नंतर स्वप्ने बघून ती सत्यात उतरवायची आहेत.-
कन्फेशन…
प्राप्त परिस्थितीला प्रांजळपणे स्विकारणे,
आणि कोणताही हेतू मनात न ठेवता
ती व्यक्त करणं, इतकं सोपं असतं कन्फेशन..
जे मन कोणत्याही भयाने ग्रस्त नाही,
कोणताही कींतू ज्या मनाला स्पर्श करत नाही,
नकारात्मकतेचा बारीकसाही लवलेश नसणारे मनचं
कन्फेशन देवू शकते…
मनावरती आलेलं साशंकतेचं मळभ,
अनावश्यकपणे उभ राहीलेलं अनिश्चिततेचं दडपण
मनातलं द्वंद्व, द्वेष, नकारात्मकता, अशा भावना
क्षणार्धात नाहीशा करण्याची क्षमता एका
कन्फेशन मध्ये आहे…
कन्फेशन ही फक्त एक कबुली नसुन,
स्वतःच स्वतःला नव्याने स्विकारण्यासारखं आहे..
शेवटी स्वतःला नव्याने ओळखणं महत्वाचं..
॥येशु॥-
स्वधर्म…
माणसाचे वैभव त्याच्या जवळच्या वस्तूंच्या
आणि सुख-सुविधांच्या प्रचुरतेत नसून, त्याच्या
गुणांतच त्याचा खरा गौरव आहे. काही मागायचे
नाही आणि काहीही नको आहे,
ही किती सुंदर अवस्था आहे.
दिवसभर कष्ट करावेत, स्वधर्म निभवावा आणि
या स्वधर्मातून जे काही मिळेल, ते स्वधर्मातच
खर्च करावे. जे उरेल ते आपल्यासाठी!
असे जीवन किती साधे, सरळ असते. पण
तेच जगणे, आपल्याला अवघड होऊन जाते,
नाही…?
मानवाने निर्मिलेले भेद हे त्याचे वेगळेपण
सिद्ध करण्यासाठीची सोय आहे आणि
हा व्यर्थच आटापिटा आहे..
मार्क्सही हेच म्हणतो :
'माणसाचे वैभव त्याच्याजवळील संपत्तीत नसून,
त्याच्या गुणसंपदेत आहे.'-
मुक्काम….
संध्याकाळची कातरवेळ, अशा सांजवेळी,
गाय जशी संथ, शांतपणे गोठ्याकडे परतते,
अगदी सहजपणे !
तिची संथ पावलं आणि तिच्या गळ्यातला घंटानांद!
तसे आपल्यालाही प्रत्येक दिवसाच्या सायंकाळी...
आपल्या आयुष्याकडे परतता आलं पाहिजे!
आयुष्याकडे खऱ्या अर्थाने परतणं,
आणि पुन्हा नव्या जाणिवेनं नव्या दिवसाच्य
यात्रेला निघणं, परत प्रत्येक मुक्कामाला
आपल्याच हृदयाशी विसावणं!
खरंच, प्रत्येक दिवसाला असं मिटवत,
पुन्हा उलगडूनही पाहता आलं पाहिजे.
एखाद दिवशी तुम्ही तुमची सारी धावपळ सोडून,
आटापिटा सोडून, कामना सोडून आपल्या
घरी माघारी परतून बघा!
आपल्या घरी निश्चिंतपणे आरामात,
एका कृतज्ञेत बसून तर पहा! मग तुमच्या
लक्षात येइल की, खरा आनंद, खरी शांतता
तुमच्याच अंतर्यामी आहे. खरं तर,
शांतता बिघडविणारे आपणच असतो.-
स्व…ऽ
केवढा विनय, केवढी नम्रता !
जे मन खरे विनम्र असतं, ते निरागसही असतं.
निरागस मनच कुठल्याही प्रश्नाबाबत शोध
घेऊ शकतं. निरागस मनच मुक्तीसाठी समर्थ असतं!
इतकंच नाही तर, निरागस मनच खरं सृजनशील असतं!
केवळ असंच मन नव्यानं शिकू शकतं.
अखेरीस, आत्मशोध घेणं हा आपल्या जगण्याचा
पाया आहे. स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्या.
अखेरीस महत्त्वाची असते ती अंतर्यात्रा!
जाणायचे ते स्वत: लाच!
माझ्या अंतर्यामी काळोख असला,
तर इतर काही जाणण्याचं मोल शून्य आहे.
अवतीभोवती दिवाळी असली आणि माझ्या
उरात काळोख असला
तर त्या दिवाळीचा काय फायदा?
या जगात सर्वात मोठं दुःख आहे आणि ते म्हणजे
स्वतःला अनोळखी बनणं!
आपल्याला स्वतःचीच ओळख नाहीये.-
स्विकार्यता…
कोणतीही घटना, परिस्थिती, विचार यांना
आपण जोपर्यंत स्विकार्यता देत नाही तोपर्यंत
ते आपले होत नाहीत.
ही स्विकार्यता मानसीक असते, हळू-हळू तिचे
भौतिक स्विकार्यतेमध्ये रुपांतर होते. भौतिक
स्विकार्यतेपेक्षा मानसिक स्विकार्यता प्रगल्भ असते;
ती कोणत्याही घटनेची पार्श्वभुमी तयार करत असते.
स्विकार्यतेच्या मनोभुमीवरच भौतिकतेचे बीज
अंकुरीत होतात.
अस्विकार्यता असली तर ती सकारात्मकतेच्या
भावनेतून हवी अन्यथा ती कलहाकडे नेहते.
अर्ध-स्विकार्यता द्वंद्व उत्पन्न करते तर प्राप्त
परिस्थितीस स्विकार्यता चीर-शांती, समाधान,
आणि तृप्तता प्रदान करते.-
संयम...!
संयम म्हणजे एखाद्याच्या विश्वासाची
परिसीमाच. अगणित विरोधाभासामध्ये
विपरीत स्थितीमध्ये निस्सिम पणे एका
अनामिक नियंत्याच्या योजनेवरती
निढळ श्रद्धा असणे म्हणजेच संयम होय.
अनिश्चिततेमध्ये हाच संयम आशेचा
दीप-स्तंभ तेवत ठेवतो. हा संयमच
आहे की जो माणसाच्या आशेला
विश्वासाची सांगड घालून देतो आणि
स्थैर्यापर्यंत नेत असतो.
कर्तव्य पूर्ती केव्हाही सरळ आणि
एकांगी नसतेच मुळी. कार्यामध्ये येणाऱ्या
विसंगतीचे संधीमध्ये रूपांतर करण्याची
क्षमता संयमामध्येच आहे.
सय्यमांते स्थैर्य् अस्तीः-