विटेवरी उभा मग्न..
सावळा माझा विठू ।
जनाचा पांडुरंग तू..
आता लागला मला दिसू ।।
चंद्रभागेवर जमती..
भक्त मंडळी छान ।
त्यांच्यामध्ये राहुनी मग..
करसी तू ध्यान ।।
नाही कुठलाच आम्हास लोभ..
आणि नको कोणता मानपान ।
बघुनी तुज नयनी होई..
आम्हास समाधान ।।
तुझ्या आशीर्वादाची छाया..
असुदे सदैव आमच्यावरी ।
आणखी काही नको रे विठू राया..
आमचा माथा राहो सदैव तुझ्या चरणावरी ।।
विठ्ठल.. विठ्ठल.. नामाचा..
मुखासी करीतो आम्ही जप ।
विठू माउली तू..
अमुचा आई बाप ।।
(Shubham Deokar)-
अभंगे माऊली.....
रुप विठ्ठलाचे, ध्यान विठ्ठलाचे
मनी वसविले चित्र विठू माऊलीचे।।१।।
आत्मा पांडुरंग, काया पांडुरंग
वदनी घोळवितो माऊलीचे अभंग।।२।।
चंद्रभागे तीरी, भिवरे तीरी
युगान युगे ऊभा माझा पंढरीचा हरी।।३।।
कर कटेवरी, ऊभा विटेवरी
पुंडलिका भेटी माझा पांडुरंग श्रीहरी।।४।।
गाथा वाचविली, पोथी वाचविली
तुकारामासाठी इंद्रायणी आठविली।।५।।
भक्तांच्या भेटी, संतांच्या भेटी
जात्यावरी भरडतो जनाबाईच्या ताटी।।६।।
माया भक्तालागी, छाया भक्तालागी
दु:खी पामरांच्या संसारी सहभागी।।७।।
वैकुंठाचा हरी, पंढरीचा हरी।
चंद्रभागे तीरी वसविली तिर्थ नगरी।।८।।
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी
चंद्रभागेच्या तीरी श्रीहरी विठ्ठलाची काशी।।९।।
श्री. गजानन परब(बाबूजी), सिंधुदुर्ग.-
विठ्ठला तूझी ओढ....
विठ्ठला तू माझी माऊली रे
विठ्ठला तू भक्तांची सावली रे।।
विठ्ठला केवळ तुझी ओढ रे
जळीस्थळी तूझाच शोध रे।।
आर्तता तूला काय सांगू रे
भावार्थ तूझ्याच नामाचा रे।।
टाळ-म्रुदंगी तूझाच नाद रे
अभंगवाणी तूझ्याच नामी रे।।
कर तुझे दोन्ही कटेवरी रे
पुंडलिके ऊभा विटेवरी रे।।
आषाढी वारी तुझ्या चरणीं रे
चंद्रभागी तिर्थ तुझ्या पायीं रे।।
वारकरी वारी तुझ्या पंढरी रे
कळस दर्शन माझ्या माहेरी रे।।
श्री. गजानन परब(बाबूजी), सिंधुदुर्ग.
-
विठूमाऊली तू माऊली जगाची,
माय बाप तू आम्हा सर्वांची...
एकादशीला झाले तुझे दर्शन दारी,
तुझ्या भक्तीत रंगली पंढरी सारी...🙏-
तुझ्या माझ्या नात्यात चल होऊ असे दंग
जसे विठूच्या भजनात तल्लीन टाळ नि मृदंग-
राम कृष्ण हरी मंत्र उच्चारू लागलो
हरी भजनात तल्लीन झालो
माया, ममता, प्रेमाने भरून गेलो
आम्ही दास प्रभुचे झालो ll१ll
विठ्ठल विठ्ठल गाऊ लागलो
नित्य वारी करू लागलो
चराचरात तुझेच रूप पाहू लागलो
आम्ही दास प्रभुचे झालो ll२ll
संतांच्या मेळ्यात रमू लागलो
वाट मुक्तीची चालु लागलो
हृदयात गोविंद साठवू लागलो
आम्ही दास प्रभुचे झालो ll३ll-
मनाचिया गाभारात | नाम तुझे घेता
अंतःकरणी माझीया | लागे ओढ तुझी
साक्षात प्रगटली | ती तेजोमय मूर्ती।
पाहुनि तुझे ते रुप माउली | धन्य मी जाहले या जन्मी-
मेरी हर सोच में है तू
हरी के हर नाम में तू
भक्ति की शक्ति भी तू
भक्ततो का विश्वास भी तू
तू जनार्दन तू ही वेद माया
तू ही श्याम तू ही हरी का साया
-
||विठ्ठला ||
कोणी म्हणे विठ्ठला...
कोणी म्हणे विठुराया...
कोणी म्हणे पांडुरंग...
कोणी म्हणे विठु सावला कुंभार...
भगवान विष्णु आणि श्री कृष्णा ची आवतार तुझी
पण आमच्यासाठी तुच आई आणि तुच बाप...
विठु माऊली तु माऊली जगाची...
आषाढी एकादशीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा...-
वैकुंठीच्या रायाचा आषाढी दिवस
विठ्ठल सख्याच्या नामाचा गजर ।
वारकरी आतुर पांडुरंग भेटीस
टाळ-मृदुंगाच्या तालात फेर धरी ।।
चंद्रभागेच्या तिरी विठूचा वास
वारीचा मेळा चालला नादात ।
भक्तांच्या मनी सावळ्याचा ध्यास
नामाचा गजर रंगला भक्तीत ।।
भेटले वारकरी मायबापास
धन्य धन्य झाले वारकरी संत ।
सोहळा रंगला पंढरपूर पुण्यभूमीस
भक्तीचा रंग उसळे पंढरीत ।।
-