कृष्णमेघ
सावळ्या मेघांनी
व्यापिले गगन
बासरीचे सूर
छेडितो पवन
भावसरींनी गं
चिंब झाले मन
श्रावण महिना
करी माहेराची
आठवण...
-
साज आहे गीत गंध
कवितेत मी धुंद धुंद
धुंद गंध गोड मकरंद
ब्रह्म कमळ
उमलली निशेची सखी साजणी
गंधाळली रजनी माझ्या अंगणी
श्र्वेतांबरी सुगंधी ब्रह्म रूपिणी
साजरी शर्वरी मोही नभांगणी
साजरी शर्वरी मोही नभांगणी
आली चंद्रकला पैठणी नेसूनी
माहेश्वरी सत्यानंद स्वरूपिणी
सर्व सौभाग्य वर्धिनी कुमुदिनी
सर्व सौभाग्य वर्धिनी कुमुदिनी
ब्रह्मांडातली पवित्र नारायणी
शिवास अर्पूनी ही ब्रह्म हिमानी
लिन मी होते कृपानिधी चरणी
लिन मी होते कृपानिधी चरणी
शांभवी सुंदरी भव्य कमलिनी
क्षणिक हे जीवन तुज अर्पूनी
झाले नतमस्तक तुज चरणी-
आई
प्रतिकृती देवाची
आभाळाची माया आई
ज्ञान दिप ज्योत प्रेमाची
आई
वात्सल्य मूर्ती
आई मंदिराचा कळस
जणू अंगणातील पवित्र तुळस
आई
माझी माऊली
वटवृक्षापरी तिची सावली
जगण्याची दिशा तू दावली
-
माॅं की ममता सुखदायी हैं
सागर से ज्यादा उसमें गहराई हैं
प्रेम, दया की मूरत है माॅं...
-
सैनिक
तू भारत मातेचा सुपुत्र
तूच आमची शान
तुझ्या निर्भीड वृत्तीचा
आम्हांस अभिमान...
जीवन-मरणाच्या
खेळांमध्ये
तुझ्या कर्तृत्वाने
सुरक्षित ठेवतो आम्हांस
तुझ्या नि:स्वार्थ कार्याचा
आम्हांस अभिमान...
तुझ्यातल्या देश प्रेमाला
शत शत नमन!! 🙏
जय हिंद जय भारत🇮🇳🙏-
निळ्या आभाळी
निळी नवलाई
निळ्या पर्वतरांगा
क्षितीजी नवलाई
निळ्या सागरा
प्रतिबिंब पाही
आभाळ मायेची
ही करूणाई
सावळ्याची रे
ही पुण्याई-
शांत अंधेरी रात
सुंदर शांत रात...
निल गगन में
मनभावन चाॅंद
टिमटिम करते सितारें
मन को शीतलता देते हैं....
जादूभरी सुंदर रात
सितारों को जगाती हैं
हम तक ले आती हैं
शांत सुंदर रात...
यादो में सिमटी हैं
भावो की बहती
सरिता हैं
रात एक कविता हैं...
-
पहलगाम
शस्त्र हाती घे
शास्त्र संग असू दे
स्व रक्षण्या तू
गर्व असू दे
धर्म हिंदुत्वाचा तू
युद्ध कर तू
धर्म रक्षण्या
निष्काम कर्म कर
कर्म कर तू
उपदेश देई
कृष्ण अर्जुनास तू
युद्ध कर तू
-