ताल मृदुंगाच्या गजरात निघाली आषाढीची वारी
माय बाप तू आम्हा सर्वांची
विठू माऊली.. तू माऊली जगाची
एकादशीच्या दिवशी आले सर्व चंद्रभागेच्या तीरी
टाळ घोषात पोहोचली वारी, पाहतो
भक्तीत रंगली पंढरी सारी
पाहुनी सारी भक्ती पंढरी प्रसन्न झाली
मात्र साऱ्या जगाचा भार घेऊनी आज ही..
विठोबा उभा विटेवरी
🍁🍁🍁-
वारी
तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं
भक्तजन आले तुझ्या दरबारी
ज्ञानोबा-तुकाराम गात
काय तो तुझा तो भक्तीमय सोहळा
नयनी लाभे तो आनंदमय जिव्हाळा
डोंगरदऱ्या ओलांडती, नाही त्याचा कंटाळा
वारकरी तृप्त होऊन जाता
पाहता तुझ्या अंगणी सोहळा
टाळ, मृदुंग मुखी हरिनामाचा घोष
जात,पात, धर्म नाही राहत इथे हा दोष
पाऊल पाऊल चालते पंढरीची वाटेवर
हृदयात विठ्ठल ,ओठी नाम जपावर
चंद्रभागेच्या किनाऱ्यावर उभा तो विठोबा
हात कमरेवर ठेऊनी
पाहे आपल्या लाडक्या भक्तांना
ही वारी फक्त यात्रा नाही
ही ओळख आत्म्याची,वाट भक्तीची
आणि भेट परमात्म्याची🙏-
पांडुरंग
भाळी चंदनाचा टिळा
तुळशी माळ गळा,
नित्य आम्हा लागला
पांडुरंगाचाच लळा...-
बस इस क़दर ख़ुदा बंदे से फिर बड़ा हो गया..
बंदे ने गुस्से में उसे पत्थर दे मारा,
वो मुस्कुराया और उस पत्थर पर खड़ा हो गया !
#करन हैदराबादी-
वारी तुझी चुकली
अन् खंत वाटु लागली।
आपसुकच रं देवा डोळ्यातुनी
चंद्रभागा वाहु लागली।।
तुझ्याकडं येण्याची कवाडं
नियतीनं सारी बंद केली।
मनमंदिरातल्या भक्तीच्या ओढीनं
जणु घरीच पंढरी दावली।।-
मुझे इश्क़ है तुझसे, बस तुझे यकीन नही है मेरी बातों पर।
समझ आएगा तुझे उस दिन, जब मैं चला जाऊंगा तुझे छोड़ कर।।-
विठ्ठल हा आपल्या अंतरीं आहे
देव्हाऱ्यात चोरून त्यास कोण पाहें ||
कोणी पुंडलिक तर कोणी मुक्ता जाहली
कोणी पापे करुन मोक्ष स्वप्ने पाहिली||
-
वारी
वारी पंढरीची
वैष्णवांचा मेळा,
मुखी हरी नाम
भाळी चंदन टिळा...
-
नाही थकणार
काया प्रवासाला ।
आपुली विठाई थांबली आहे
अपुल्या स्वागताला ।।
मुखी हरिनाम विठू
संतांचा झाला ।
आता जयघोष
फक्त विठ्ठला विठ्ठला ।।
-Ron Akole
-