भावना असणं आणि क्षणिक भावनिक होण म्हणजे..
Dettol Liquid Handwash मध्ये..
साबणाचा फेस करणे होय..!
-
एकवेळ स्वभावाने गुड होता आलं नाही..
तरी चालेल... व्यक्तिमत्त्वात गूढ व्हा..
गुड झालं की अपेक्षा वाढतात..
आणि गूढ झालं की, खंत राहत नाही..
कारण लिहिलेले.. सर्वचजण वाचू शकतात.
परंतू व्यक्तिमत्त्वात गूढ असणे
म्हणजे कोरे पान होय.
जिथं न लिहीता हि..
त्यातील परीभाषा जाणकारच समजू शकतो. ©अ^मन✓
-
ओझं असो किंवा मन
शेवटी.. दोन्ही तुम्हालाच पेलणे आहे..
हलके तिथेच व्हा.. जिथं
सुरक्षेची नाही.. विश्वासाची हमी आहे..!!!-
आठवण...
जवळचा व्यक्ती दूर गेला म्हणजे
त्याची आठवण होते.
वर्षा मागे वर्ष सरले म्हणजे
त्याचे स्मरण होते..
आणि जिवंतपणीच..
गर्दीत राहून एकटेपणा जाणवला
म्हणजे स्वतःचेच मरण होते.
वास्तविक पाहता आठवणींचे अनेक स्वरूप आहे.
आठवण वेळेवर आली तर साठवण होते.
आठवण उशिरा आली..
तर विस्मरण होते.-
लायक बनण्यासाठी..
थोडं तरी ना'लायक व्हावचं लागतं..!
कारण कलयुगात शहाण्याला मान: येडपट..
तर मूर्खाचा सन्मान : अपेक्षेपेक्षा दीडपट ...
केला जातो..! © अ^मन ✓
-
वळण रस्त्याचे असो..
वा आयुष्याचे ...
गती सांभाळावी लागते.. नाहीतर...
माती झाल्याशिवाय राहत नाही..
-
सणवार अनेक सुरूच राहतील
'जिद्दी' ची कर यात्रा..
कमजोरीच बनव ताकत तू..
होवू नकोस भित्रा..
अपयशात चं खर यश लपलेलं..
घाबरु नको मित्रा..
जेव्हा वाजेल विजयाचे बिगुल..
गुलाला त निघेल 'अभिनंदना ची जत्रा..!'
-
कहता हुं खुदसे... बेबसी कैसे बया करूं |
तू धीर धर अंतर्मना... जिंकू किंवा हारू ||
बेशक...! सफलता ही मिलेगी तू हो जा शुरू |
कार्य असे घडवा... जणू इतिहासात नाव कोरू ||
©अ^मन
-
एकीकडे मन आणि दुसरीकडे
अपेक्षेच ओझं मग पारड्यात वजन
कोणाचेही वाढो..
संयमाचा तराजू प्रामाणिकपणेच तोलला पाहिजे.
-
स्वानुभव आणि अनुभव यातील फरक म्हणजे काय..?
स्वानुभव म्हणजे :- ICU चे बिल स्वत: चं (ऍडमिट असताना शुद्धीत आल्यावर) भरणे.
आणि
अनुभव म्हणजे :- खोटं रेटून बोलणे (चूक मान्य न करणे. )
... अर्थातच समोरचा तुम्हाला अनुभव देतोय.
म्हणूनच अनुभवापेक्षा स्वानुभव सरस नेहमीच..
©अ^मन.
-