...
-
वारी
तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं
भक्तजन आले तुझ्या दरबारी
ज्ञानोबा-तुकाराम गात
काय तो तुझा तो भक्तीमय सोहळा
नयनी लाभे तो आनंदमय जिव्हाळा
डोंगरदऱ्या ओलांडती, नाही त्याचा कंटाळा
वारकरी तृप्त होऊन जाता
पाहता तुझ्या अंगणी सोहळा
टाळ, मृदुंग मुखी हरिनामाचा घोष
जात,पात, धर्म नाही राहत इथे हा दोष
पाऊल पाऊल चालते पंढरीची वाटेवर
हृदयात विठ्ठल ,ओठी नाम जपावर
चंद्रभागेच्या किनाऱ्यावर उभा तो विठोबा
हात कमरेवर ठेऊनी
पाहे आपल्या लाडक्या भक्तांना
ही वारी फक्त यात्रा नाही
ही ओळख आत्म्याची,वाट भक्तीची
आणि भेट परमात्म्याची🙏-
विठ्ठला तू अठ्ठावीस युग उभा
आषाढी महिना आला तर म्हणे
हजारो संतांची भरते तुझ्या दरबारी सभा
काय वर्णू मी तुला
पंढरीचा राजा म्हणूनच उमगला रे मला
पांडुरंग, विठ्ठल, विठोबा किती
नाव आहेत रे तुलां
पण आहे तू तर सगळ्यांचाच रखवाला
डोई तुझ्या पुंडलिक पहावा
कारण जिथे माता पित्याची सेवा
तिथे मात्र तुझा वास असावा❤-
हाताची बोटे
माणूस सहज म्हणून जातं हाताला सगळी बोटे सारखी नसतात याचा अर्थ असा की प्रत्येक जण योग्य असतं असं नाही पण याचा अर्थ मला वेगळा वाटतो..,निसर्गाने मनुष्याला निर्माण करताना या हाताच्या बोटांमधील अंतर आणि बोटे यात सर्व काही सांगितला आहे ... 🤔
करंगळी म्हणजे आपला जन्म, करंगळी आणि त्याच्या शेजारचे बोट यातील अंतर म्हणजे बालपणीपासून ते तरुणपणाचा प्रवास आणि त्याच बोटापासून ते मधल्या बोटातील अंतर म्हणजे यशस्वी होण्याचा प्रवास अर्थात स्वावलंबी..,मधल्या बोटाच्या पुढचे बोट या बोटांतील अंतराचा प्रवास म्हणजे आपले कर्तव्य,....आणि अंगठा व त्या शेजारील बोटातील अंतर म्हणजे आपल्या कर्तव्यावर आणि कर्मावर ठरणारा म्हतारपणीचा तो प्रवास आणि शेवटचा अंगठा म्हणजे तो मृत्यू जो की अटळ आहे.....
Just imagine and relate with our life❤-
ऑनलाइन आणि ऑफलाइन
भटकत गेला भटकत गेला समाज
ऑनलाइन ऑफलाइनचा जमाना आला आज
सोशल मीडियामध्ये लागले बुडायला
म्हणून काहीजण जेलमध्ये लागले पाय खुडायला
याचं कारण आहे फक्त हव्यास
एका टिक पासून सुरू
झाला हा प्रवास
दोन टिका होण्याची वाट
पाहू लागले खास
त्या निळ्या कधी होतायत
याची लावून बसले आस
झाल्या निळ्या, पाहिले स्वप्न
आणि निघून गेले घरातनं..
काहीजण तर लग्नापर्यंत पोहोचले
दृष्ट कर्मी तुरुंगातही गेले
तर काही स्मशानामध्ये संपले
मॅरीड ,सुसाईड ,जेल हेच आहे का जीवन ?
तर व्हाट्सअप ,इंस्टाग्राम ,फेसबुक
हे आहेत कलियुगातील रावण
संपवा हे रावण तेव्हा भूमी होईल पावन-
वेळ
थांब ना थोडं
किती पळतोस रे तु ...
आताच कुठे चालायला लागले मी
हे ऐकून काट्यांच्या मनी हास्य आले
आणि त्यांच्याच रंगात रंगुनी गेले
मध्येच बोले सेकंद काटा
दिसतील तुम्हांला हजारो वाटा
त्यातही फुटतील हजारो फाटा
आणि उसळतील सुखदुःखाच्या लाटा
तेव्हा मिनीट काटा बोले
कलयुगात नाही कोणाचा कोणाला मेळ
म्हणून वाया घालवू नका
ही सुंदर अशी वेळ
उमटले शब्द पोटी
आणि हळूच आले ओटी
म्हणून बोले तास काटा
एकदा आठवा रतन टाटा
आणि यशाचं शिखर गाठां
तीन काट्यांच ते घड्याळ
असतं खूप तडयाळ
म्हणून क्षणा क्षणाला
होत असतात खेळ
म्हणून महत्त्वाची असते ती वेळ ⏰-
बळीराजा
नाही कशाची तमा ना भीती
रात्र असो वा दिवस ,
कामातून नाही त्याची मुक्ती
प्रामाणिक कष्ट हीच त्याची भक्ती
ऊन सावली पचवायचं
असतं त्याच्याकडे बळ
पण प्रत्येक वेळीस मिळत
नाही त्याला त्याच्या कष्टाचं फळ
कुठेतरी त्याचा होतच असतो खेळ
तो तर जगाचा पोशिंदाना
तरी त्यालाच कमीपणा हो ना
कागदावर तो तर जगाचा पिता
पण खर इथं असते
राजकारण्यांचीच सत्ता ...
जेव्हा सुखावते ही प्रजा
तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभा असतो बळीराजा❤-
चमचमत्या चांदण्याच्या तारी
बासरी वाजवतो कृष्ण मुरारी
बासरीची धुन न्यारी
ऐकूनीया धून मन घेई आकाशात भरारी....❤-