शेतकरी
शेतकरी राबतो रात्र भर जागतो
तेव्हा कुठं जाऊन शेतात माल पिकतो,
नाही रात्र नाही दिवस
शेतकरी राब राब राबतो
वरून मरण्याची पाळी
सरकार उलट
शेतकऱ्यावरच आणतो,
सुखं नाही त्याला
थोड धान्याला मोलच
द्या कि हो,
शेतकऱ्यांची मेहनत थोडी
देश भर गाजवा की हो,
शेती नाही पीके माल
तर त्यांना काढावे लागे कर्ज
आणि तोच शेतकरी आत्महत्या करतो,
आणि लिहून ठेवतो अर्ज,
आता तरी सरकार यावी भाना
नाहीतर शेतात कोण पिकविन दाना.....-
खेतों का पानी अब आखों में आ गया हैं,
मेरे गाँव का किसान अब शहर में आ गया हैं।
-
पायाखालची वाट,
करून रात अन् पहाट
उगवून हे सोने
माती मोल होऊन जाते,
शेवटी आत्महत्येची वाट समोर रहाते
झालेला असतो कर्जबाजारी,
का दुसरा पर्याय येत नाही समोरी
भागवाया ती तहान,
माती ही गहान
पाऊस हा पडेना,
उत्तर काही सुटेना
उलगडत जाते हे कोडे,
मन उदास होते थोडे
त्यात दोष आहे आपला,
वाचवू या निसर्गाला
आपल्या शेतकरी मित्राला.
-
आभायाची छाया अन धरती मातेची माया
दमन्या हाकता हाकता होती देहाचा कोयसा
अश्रूंचा हा पाऊस अंगणी माझ्या पडतो
तरीबी माझ्या पिकाच सोन तुझ्या पदरी पाडतो
इझीसन गेलं सार सपान लेकरांच
डोयात तरीबी आस देवाचिया किरपाची-
शेतकऱ्याची कथा
जव्हा जल्म माझा झाला छोट्याश्या खेड्यामंदि
गरिबीन साथ धरीली साऱ्या जीवनासाठी
काळ्या माती संग माझ नात तव्हा जोडल
पाऊसाची वाट डोयी तव्हाच जडल
ऊन वाऱ्याशी खेळण तव्हा मला समजल
हाती कुऱ्हाड धरली खुरपणी करण्यास
तिफण गोफण धरताना बालपण हरपल
कपाळी मातीचा मरोट या धरती मातेचा
पीक शेतातल माझ धन माझ्या काळजाच
भुकेलेला चुल्हा कधी उपाशीच झोपतो
जान नाही तरी त्याला ज्याच्यासाठीच मरतो
अशी कशी रे देवा तुझी आम्हावर छाया
दुरडी माझी मोकळी कव्हा येणार तुला दया-
! दुष्काळ !
रान भेगाळलं आस पावसाची लागली
मुक्या त्या चातकाला तहान पाण्याची लागली,
भेग जमिनीपरी तळपायाला पडली
माझा बाप शेतकरी कोरड घशाला पडली..
तापलेली जमिन आज ओसाड सोडली
तीला पाहुन बापाच्या मनाला चिरच पडली,
किती किती घाम बापाने गाळला शेतात
चिज नाही झालं तरी कंबर मोडली..
दोन येळची भाकर आज एकदाच तुटली
घरट्यातल्या पाखरांची आज भुकच सुटली,
जीव बापाचा इथ आज झाला कासाविस
का रं देवा शेतक-याची तु आसच सोडली..
मनामधी उन्हाची कशी चिताच पेटली
तळपायाची आग वर माथ्यावर लागली,
आज माझी लेक आलीय लगनाला
कशी पावसानी माझी व्यथाच पाहिली..
✍🏻 दिपक सव्वासे.-
भगदाड होता छताला मोठा,
झाडाच्या पानान झाकत होतो छताला,
पाऊस आला की जपत होतो बायको अन मुलांना,
पैसा किती जरी कमावलं,
तरी पुरेसा होत नव्हतं माझ्या संसाराला,
कसा-बसा दिस काढीत होतो,
सावरून या रात्रीच्या अंधाराला,
याच आशेत तेवत होतो की,
आज न उद्या दिवस उजडेल थोडासा माझ्याही वाट्याला..
पोरांच्या शिक्षणासाठी दिस भर राबत होतो,
शेतातल्या काळ्या मातीला,
चार-पाच महिन्यानंतर पीक-पिकून येत होता,
अन उत्पन्न थोडासा लागत होता माझ्या हाताला,
थोडा उत्पन्न पोरांच्या वाट्याला, तर थोडा घराच्या संसाराला
दिसाचे वर्ष असेच चालले होते एक-एक करून,
आता वय आणि शरीर गेला होता झिजून,
पोर आता मोठी झाली होती घर माझं उभारतील,
"बाप" या नात्याने आस थोडी ठेवली होती,
(थोड्या काळानंतर)
पोर आता नोकरीला लागली होती,
घर नव्याने बांधायला काढली होती,
पाहून सारा कारभार डोळ्यातून वाहत होत पाणी,
पण तितकाच आनंद देखील होता माझ्या मनी,
अथक माझ्या परिश्रमाचा फळ आता मला मिळणार होत,
भगदाड माझ्या छताचा आज बुजणार होता....
भगदाड माझ्या छताचा आज बुजणार होता...-
स्वतः च्या रक्ताच पाणी करुन
संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या
जगाच्या या पोशिंद्याला
शतशः नमन..।🙏🙏-
पेरणीचे दिवस येता
मेघांचं आगमन झालं,
विजांच्या आवाज पडता
आभाळाने साज घातलं
भूमातेच्या पोटी आता
तीपण रुतू लागली,
थेंबा सारखे मातीमंदि
बियानं रुजू लागली
धरणी माय कंप करत
बियांना कोंब फुटले,
नाजूक हिरवेगार टोक
प्रकाशाकडे सुटले
भूमातेची तहान भागली
पावसाच्या झऱ्यानं,
काळी माती नटू लागली
हिरव्या साडीनं
जसजसा काळ गेला
तशी पीकं मोठी झाली,
पोसावलं पिकं त्याला
सोनेरी दाणे सुटली
कात्रण करुनी जोमाने
त्याची मळणी सुद्धा झाली,
वाऱ्याच्या स्पर्शाने
दाणे राशीं राशीने भरली-