रब ने मेरी क्या किस्मत बनाई।
जो इतनी cute प्यार करने वाली..
सासु माँ को पाई।.......दिशा😍
-
बातें करती थी वो महिलाओं की आजादी की
खुद सास बनी तो घुंघट की वकालत करने लगी— % &-
करुनतेच्या अंबराखाली सामावून घेतले सर्वांना,
तुमचे हास्य पुरेसे मनाची मळभ हटवायला,
गृहलक्ष्मी तुम्ही पवित्र तुमचे पाऊल,
अखंड तुमचा आधार सागर अन अतुल..!!
अवघ्या कुटुंबाची जननी तुम्ही,
संसार वाकळ अवनी तुम्ही,
रामचंद्रांच्या जीवनाचं मांगल्य तुम्ही,
घरासाठी घरातील औदार्य तुम्ही..!!
स्त्रीचं आयुष्य म्हणजे दोन प्रहरांचं नाटक,
संसारासाठी झिजणे कितीही येता प्रसंग बिकट,
लेकरांना अंथरता मायेचा पदर,
जाणवला नाही कधी फरक सासर-माहेर..!!
थोर ते माय-बाप होऊन सावली तयांची,
अंधःकार दूर करणारी जीवनज्योत सर्वांची,
असावा कायम तुमच्या आशीर्वादाचा हात,
देवासम तुमचे स्थान आहे आमच्या हृदयात..!!-
लेक म्हणणारी 'ती' माहेरी संस्काराच्या ओलाव्यात भिजते,
तेव्हा कर्तव्यदक्षतेची तुळस सासरच्या अंगणात रुजते,
तिच्या जीवन रुपी वृक्षाचे मूळ जरी अगं, आई! असले तरी,
पुढे संसार रुपी आयुष्याचा आधार अहो, आई! असते..!!-
कोण म्हणत आईला,
लेक जवळची वाटते...
सासूला मात्र सून,
आयुष्यभर जवळ लागते...
परक्याच धन बोलून,
लेकीला टोकत राहते...
हिचं सासु सूनेला,
घरची लक्ष्मी मानते...
बोलायला गेलं तर सासू,
ती मात्र एक आईचं असते...-