vaishnavi mule   (वैष्णवी)
14 Followers · 11 Following

स्वरचीत😊
काढलेली सवंड, जोपासलेली आवड...💫
Follow instagram @kavicheman
Joined 11 June 2020


स्वरचीत😊
काढलेली सवंड, जोपासलेली आवड...💫
Follow instagram @kavicheman
Joined 11 June 2020
9 FEB 2023 AT 19:29

एका हाकेवर लेकराच्या
ती धावत पळत येते
सोंग ढोंग बाळाची
सगळे आवडीने पुरवते,
चांगले वाईट त्याचे
सारे ती ओळखते,
तिच्या एका स्पर्शाने
मन त्याचे स्थिरावते,
आईच्या कुशीत बाळाला
सारे सुख मिळते...

-


9 FEB 2023 AT 16:45

आपल्या दोघांमधील नात
Chocolate सारखं असाव,
मि रुसाव तु हसवाव अन्
गोडवा नेहमी जपुन ठेवाव...

-


8 FEB 2023 AT 1:53

आहो साता जन्माच वचन
अस नाहिचं द्यायच तुम्हाला,
कारण सात जन्माच गणित
काही माहितचं नाही मला,
मात्र जन्मोजन्मी माझ्या आयुष्यात
देवाकडे मागितल आहे तुम्हाला....

-


5 JAN 2023 AT 19:58

कोण म्हणत आईला,
लेक जवळची वाटते...
सासूला मात्र सून,
आयुष्यभर जवळ लागते...
परक्याच धन बोलून,
लेकीला टोकत राहते...
हिचं सासु सूनेला,
घरची लक्ष्मी मानते...
बोलायला गेलं तर सासू,
ती मात्र एक आईचं असते...

-


4 NOV 2021 AT 23:35

लावूनी दीप प्रकाशले,
तुलशी वृंदावन,
नाहीसा झाला अंधःकार,
तेजोमय झाले नभांगन।

-


19 OCT 2021 AT 10:09

कोजागिरीच्या चंद्राला नवल आज वाटले,
त्याचेच प्रतिबिंब त्याला अंगणी माझ्या दिसले।
कौतुकाने प्रश्न त्याने केला,शितलता आहे का ?
तेवढी माझ्याशी तुलना करायला।
रात्री येशील तेव्हा प्रसाद घे,
मग हाताची गोडी आणि
स्वभावातली शितलता कळेल तुला।
-श्री. रमेश मुळे...

-


8 JUL 2021 AT 17:57

शृंगार करून रूप माझं बाई
बघ दिसतं कस नक्षत्रावानी,
हातातील कंकणांना ही शोभा आली
जेव्हा मेहंदी रंगली तुझ्या नावाची,
विड्याच्या पानावानी...

-


6 JUL 2021 AT 16:36

कपाळावरती चंद्रकोर मी सख्या
तुझ्याचं नावाने रेखते,
तुझ्या तेजस्वी रूपाचा चंद्र बनून
जणू ती माझ्या भाळी चमकते...

-


27 APR 2021 AT 23:08

चंद्र-चांदण्या असतील
त्या क्षणांच्या साक्षीला...
तुझ्या माझ्या नव्याने
फुलणाऱ्या नात्याला...
कायम असेल माझी
साथ तुझ्या प्रेमाला...
जशी असते नेहमी
चंद्राची शीतल रात्रीला...

-


4 APR 2021 AT 23:16

नसशील शेजारी तू माझ्या,
चाहूल मात्र तुझीचं असते...
जरी रमले मी आठवणीत,
ती आठवण हि तुझीचं निघते...

-


Fetching vaishnavi mule Quotes