आज हरवली नाती
करपली माणुसकीची काठी
शब्दाने शब्द वाढले
अंतर मनात साठले
न जाने कसे .....-
राग जरी
आला माझा
भांड रे मनसोक्त
मनात सगळं ठेवून
हरवू नको कुठे माझ्यासाठी
तुझ्या ओठावरचं हास्य .......-
वचन दिले आज त्याने
सांजवेळी भेटण्याचे
आनंद गगनात मावेना
किती किती बोलायचे.
-
आजकाल मला तो भेटणार
या happiness पेक्षा
तो पुन्हा दुर जाणार याचीच
भीती सतावत असते...-
पावसाच्या सरी सारख
डोळ्यातले अश्रु काही थांबताच नाहीत
काळजाच्या वेदना व्यक्त सुद्धा करता येत नाहीत
हात सोडलास अर्ध्या वाटेवर
मागे वळून पाहिल सुद्धा नाहीस
तुटत होता जीव तरीही
हृदय तुझे पाघळले सुद्धा नाही
साठलेले भाव मनातले
शब्दांनी सुद्धा त्यांची पाठ फिरवली
तुझ्या आठवणींच्या प्रत्येक क्षणाला
कायमची पुसून टाकली-
आठवणींचे क्षण मनामध्ये साठवणं
समोर तुजं ठेऊन पुन्हा पुन्हा आठवणं|
तु येताच जीवनात आयुष्यचं सावरणं
जस शिंपल्यातील दव मोत्यामध्ये बदलणं|
कोण कधी जाणे संपेल हा एकटेपणा
सुखाची सर घेऊन तु आयुष्यात येशील पुन्हा|
दुरावलेली मन ही परत एकदा मिळावी
हृदयाची तार आपली पुन्हा एकदा जुळावी|
देवा तुझ्याकडे हीच मनोकामना
तुटलेल्या मनाचे घाव देवू नकोस कुणा..!!!
-
जाऊ दे ना दूर
वाढेल मनाची हुर हूर
विचारांचं माजेल काहूर
पण हृदयातून तर जाऊ नाही शकणार ना भुर...-
तगमग ही दुराव्याची,
होईल सारी दूर...
जेव्हा चांदणीला भेटाया,
येईल पौर्णिमेच्या चंद्राचा नूर...-