धन्य देवा तुझ्या चरणी वाहिलेल्या
सोनचाफ्यात मन हा माझा गुंतला...
धन्य देवा तुझ्या चरणी लाभलेल्या
काव्यसुमनात शब्द माझा गुंफला...
मोह माया द्वेष मत्सर
रोज नव्या सिद्धांताचा इथे कुचला...
देहाचा या पालापाचोळा करून
पायदळी तुडवितो जो तो स्वाभिमानाला...
तालिबानीयांनी बांधियला चंग
माणुसकीचा हाहाकार इथे माजला...
शस्त्राची धार मानेवर ठेवून
बळजबरीचा संसार इथे थाटला...
पाहून हे रूप विश्वातले
तडे गेले विश्वासाला...
तूच सांभाळ देवा आता
नितीमूल्यांच्या तुझ्या गाभाऱ्याला...
सांग तुझ्या त्या सोनचाफ्याला
सुगंध अंतरी देहात विरघळायला...
नसानसात मिसळुन
वेदना पेशीतील वेचायला...
धन्य देवा तुझ्या चरणी..........
~Madhuri P. Warwatkar-
गंध अत्तराचां, मनी दरवळलां..!
देवा चरणी, अलगदं वाहिलां..!
चराचरांत परिमळं भिनलां..!
गंधाळलेला वारा हळुवारं पसरलां..!
नाजूकं पाकळी, रंग सोनेरी..!
मनातं ठसला खोलं अंतरी..!-
सोनचाफा परी प्रित तुझी प्रिया,,,,,
अशीच बहरू या जीवनी,,,
सुगंध लाभो सोनचाफ्याचा या
माझ्या जीवनी,,,,
प्रितीचा चाफा तुझ्या कधी न सुकू
माझ्या ह्रदयी ,,,,
तु असन अवती ,भोवती त्या
सोनचाफ्या सारख दरवळन
टाकत मोहून माझ्या मनी,,,-
या मनीचा चंद्र तू मी चांदणी झालेच ना
स्पर्श होता रेशमी तो मी सख्या लाजलेच ना!
©शब्द_कृष्णार्पण
-
स्वर्न कांती,देह मखमली
दरवळ जसा लपला पानोपानी,
ओला वारा वाहक जणू
श्र्वसामधे परिमळ आनी....
केवड्याची रानी फुलले पितांबर
पाहता मोह होई अनावर
मादक रुपड तिला ही भुरळ पाडी
तिच्या रेशमी केसात माळून प्रीत उलगडी..-
।।श्री।।
सांजवेळी पाकळी मी होऊनी मिटणार आहे
चांदण्यांचा स्पर्श होता चंद्रही हसणार आहे.-
खिशास म्हणे सोनं परवडत नाही हल्ली,
डोळे बंद करून,तळहातावर तो सोनचाफा ठेवतो..!-
सोनचाफ्याच्या वर्षावाने जेव्हा आंगण दरवळत तेव्हा मला ही वाटतं सोनचाफा होऊन जीवनभरआप्तेष्टांच्या साठी दरवळत राहावं
-