QUOTES ON #वडील

#वडील quotes

Trending | Latest
26 MAY 2020 AT 8:36

वडिलांच्या छायेविना,
सर्वकाही वाटे अपूर्ण...

कोणत्याही धन-संपत्तीने सुद्धा,
न होई कधी ही पोकळी संपूर्ण...

-


15 JUN 2021 AT 23:34

बाप नावाचं छत्र जोपर्यंत डोईवर असतं,
तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत...
परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते,
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते...

-



💞वडील.....💞

लहानपणी चालताना हवा आधार त्यांचा,
तरुणपणी जीवनाशी झगडतांना धीरही त्यांचा।✨

डोळ्यातील अश्रुंनाही आठवण त्यांचीच येते,
सुख-दुःखाच्या सरींमध्ये साथ त्यांचीच असते।✨

लोक खुप म्हणतात तु काहीच कामाचा नाहीस,
पण ते नेहमी म्हणतात,
तुझ्याकडून होणार नाही ,
असे एकही काम या जगातच नाही।✨

लोकांना वाटत असते ,
आपल आयुष्य निवांत,
पण वडीलांनाच ठाऊक असते,
आपल्या काळजाची भ्रांत।✨

करीयरच्या या वाटेवर,
सगळेच हात सोडतात,
पण तेच असतात,
जे आपल्या अपयशातही,
हात घट्ट धरून परत लढायला तयार करतात।✨

यश मिळाल्यावर नसलेली नातेही तयार होतात,
पण वडील एकटेच असतात,
जे शेवटपर्यंत वडीलकीच खरं नात निभावतात।✨

-क्रांती शेलार

-


15 JUN 2021 AT 19:44

मुलगी.....बापाची आई...!

(Read in caption...!)

-


10 DEC 2019 AT 12:07

सैलसर वाटणारी मिठी,
घट्ट हृदयाशी बिलगली होती...
स्पर्शण्याची चाहूल त्यानेही,
मिटल्या पापणीने ओळखली होती..
हुरहूर वाढवणारी भीती,
कुशीत शिरताच निवळली होती..
भेदरलेली हळवी ती चाहूल,
बापाच्या कुशीत विसावली होती...

-


16 JUN 2019 AT 8:33

' मेरे पिता हो तुम '
( संक्षिप्त में पढ़े )

-


27 FEB 2018 AT 12:27

आई या शब्दाचा हृदयाला गोड
स्पर्श देणारी...
वडील या शब्दाचा पूज्यभाव
सांगणारी...
अशी ही आमची मायबोली "मराठी" संस्कृती
लख-लखणारी...
धर्म पंथ जात एक असल्याचा सुंदर
संदेश देणारी...!!!

-


26 APR 2021 AT 23:31

आजकाल खूप एकटं एकटं वाटतय
भल्या मोठ्या गर्दीतही जणू एकांत भासतय
कल्लोळ आहे खूप पण सर्व काही शांत वाटतय
खूप माणसे आहेत सोबत
ओळखीचे आणि अनोळखी
प्रेम करणारे आणि द्वेष करणारे
बरं वाईट मधला फरक जाणणारे
पण तरी त्यांचा सहवास दूर जाणवतोय
माहित नाही मन काय शोधतय
जुन्या आठवणीत कधी रमतय
काहीतरी हातातून निसटलय
याच दुःख काळजात उठतय
म्हणून मन कश्यासाठी तरी झुरतय
आता कस हे मन हलक करायचं
कोणाजवळ मनाचं कवाड उघडायचं
बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचयं
माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर
तरी मन आज कुणाचा तरी आधार मागतयं

-


20 SEP 2019 AT 4:54


विषय -ऋण आईवडिलांचे

दुग्ध घोटाचा थेंब निथळता, आभाळभर मायेने विणला आहे.
उसळसणारा डोंब भुकेचा, प्रत्येक घोटागणीस शमला आहे.

लागणारा प्रत्येक दुःखाचा डोहाळा,कष्ट करून आईने शमवला आहे.
गर्भगळीत करणाऱ्या नजरांना भेदत,प्रत्येक हट्ट आपला पुरवला आहे.

उसवनीला लागणारी भावकीची चादर,समजुतीच्या धाग्यांनी जपली आहे.
बालपणातील प्रत्येक झोप सुखाची,त्यांच्या जागरणामुळेच भेटली आहे.

अर्धी कच्ची इज्जतीची भाकर,इमानदारीच्या अग्नीत भाजली आहे.
समाजाच्या प्रत्येक चटक्यांना सोसत,जपण्यास ती तुझ्याकडे सोपली आहे.

गर्भ आईच्या उदरी वाढला जरी,नाळ पित्याच्या कष्टाशी जोडली आहे.
सोसल्या आईने असंख्य वेदना,हिंमत पित्याचीच तिला भेटली आहे.

भूक लागलीय हा शब्द निघण्याआधी,ताट समोर ठेवणारी ती आईच आहे.
कोरडं पडल्या घशाला मनवत,आगीत होरपळळी भूक विझवली आहे

माता पित्याचे अगणित ऋण,सातच कडव्यात मांडणं कठीण आहे.
जिवंतपणीच घ्या त्यांची काळजी,माझ्यामते हाच खरा काकस्पर्श आहे.

-


16 JUN 2019 AT 7:38

बाबा काय बोलू रे
मी तुझ्यावर आता
या शब्दकोशातीलही शब्द संपून जातीत
आता लिहिता लिहिता
माझी माय जरी माझं हृदय असली ना
तू त्या हृदयाला जिवंत ठेवणारा श्वास आहेस रे
माझ्या माय ची माया दिसते रे सगळयांना
पन तुझी त्यामागची काळजी कोणालाच नाही दिसत..
बाबा तू आहेस तर सगळं आहे,
नाही तर हे सगळं नश्वर आहे..

-