....आद्य-आराधना.....
वंदन करुनिया "गणेशाला",
शुभारंभ करूया आपल्या नवजिवनाला....
प्रथम पूजनाचा आहे या "प्रथमेशास" मान,
फक्त मंदिरात च नव्हें, सर्वांच्या हृदयात या "मनोमयाचे" स्थान...
सर्व संकटे दूर पळून जाई,
"विघ्नहर्ता" जेव्हा धावून येई....
अवघे विश्व याच्या प्रेमाने खूप खूप भारावलेले,
या "रुद्राशाचे" विश्व तर माता-पित्यामध्ये सामावलेले...
मोठे उदर सांभाळत देई नेहमी साथ हा "लंबोदराय",
असा आहे अनोखा माझा हा "गणाधिशाय"...!!
-
शब्दांची जादू अशी की कोणीही मंत्रमुग्ध व्हावे.
शब्... read more
वसंताच्या पालवी समान,
आपुली साथ सदा बहरावी...
प्राजक्ताच्या मंद-धुंद सुगंधासारखी,
आपुली मैत्री नेहमी दरवळावी..!!
सरींच्या लपंडावाने रंगतो,
मनमोहिनी सोहळा श्रावनसरींचा...
मैत्रीच्या अनामिक चाहुलीने मात्र,
विसर पडतो सर्व ताण नि त्रासाचा..!!
पार केले तू अनेक संकटांतूनी मला,
सोबत तुझी-माझी सदा अशीच रहावी...
मार्ग जसा तो तेजस्वी ध्रुवतारा,
त्या शीतल चंद्रास नेहमी दाखवी..!!
मैत्रीचा एक दिवसच नाही तर,
संपूर्ण आयुष्याचे दिवस कमी पडतील...
अर्थ मांडण्या आपुल्या अनोख्य बंधाचा,
शब्दकोशातील शब्द देखील अपुरे येतील..!!-
किसे पता था...
इस खुबसुरत कोहरे की चाह में,
हम अपना चांद खो बैठेंगे!!-
आयुष्याच्या अनाकलनीय निसरड्या वाटेवर,
वळणे अनेक चकविणारी भेटतील...
सांशकतेच्या अभेद्य भयाण वादळात,
वाटेवरूनी पाऊले अवचितचं कदाचित निसटतील...
आधार देण्या तेव्हा "मैत्रीचा हात" तो,
नकळतचं हाती आपुल्या येईल...
भरधाव धावणाऱ्या काळाचा प्रवाह ओलांडण्यास,
जाणिवांचा पूल हा मात्र भक्कम उभा राहील...!!-
कवेत घेतलेल्या आभाळाला,
सांडावं तरी कसं...?
आधार दिलेल्या घरट्याला,
मोडावं तरी कसं...?
वाहत्या या भाव-झऱ्याला,
थांबवावं तरी कसं...?
अवखळ या मनाला,
आवरावं तरी कसं...?-
पिंजारलेले कुरळे केस अन,
नयनसागराचा अथांग तो डोह...
त्यात मनसोक्त डुंबण्याचा,
आवरेना मला आता हा मोह...!!
काळजाचा ठाव घेताच तुझी नजर,
पडते गालावर सुंदर खळी...
वेड्या मना समजावते मग मी,
एका शब्दाने घेतोस तू कित्येकांचे बळी...!!
तुलाच अनुरुप तुझ्या मधाळ हास्याने,
होते माझी ती सोनेरी सकाळ...
तुझ्या स्वप्नांमध्ये रमता-रमता,
चाहूल देते ती रम्य संध्याकाळ...!!
अनभिज्ञ या प्रवासाला,
अनोळखी आहे आपुली वाट...
चंद्र-चांदण्यांमध्ये तुला शोधता शोधता,
अवचितचं येते ती प्रसन्न पहाट...!!-
नभापरी माझी रात्र,
तुझ्या येण्याने उजळली...
आठवणीतील ती संध्याकाळ,
अवचितचं जणू मावळली...
तुझ्या सोबतीने सारी,
गुपिते मी सांडली...
काळजाचे घाव भरुनी तुझ्यासवे,
नवी कोरी पाटी माझी...मी नव्याने मांडली...!!-
फक्त कोजागिरीचं नाही तर,
तुझ्यामुळे होते प्रत्येक रात्र खास..
रोजचीच आहे ही नजरभेट आपुली
तरी वाटे मज तू सदा वेगळाच की,
असतो माझा तो एक भास...??-
पिवळ्या फुलांनी सजली दारे,
सर्वत्र विजयाचे जणू संचारले वारे..!!
नवदुर्गांच्या आशीर्वादाने करूया आता,
विकृत मनोवृत्तीरुपी महिषासुराचा संहार...
करूया सुरक्षित आपल्या जीवनाला,
तेव्हाच तर येईल सृष्टीला खरा बहार...
करूया नाश दशतोंडी मनोविकारांचा,
तेव्हाच होईल खरा विजय...
करुनि प्रहार अंधश्रद्धेच्या अमृतावर,
झुगारुया बंधने होईल दुष्टांचा पराजय...
संपवूया अज्ञातवास, धारूया नवा अवतार,
करूया सीमाऊल्लेंघन आता प्रगतीचे...
करण्या सुरक्षित आपल्या सैरंध्रीला,
काढुया अस्त्र-शस्त्र आता शिक्षणाचे...
घेऊया प्रण आज, देऊया वचन एकमेकांस,
अन करूया पूजन शस्त्रांचे आला आहे दसरा...
ग्रहण करूया ज्ञान, होऊया सर्वजण आत्मनिर्भर,
लक्ष्यात ठेवूया धडा फक्त, बाकी सर्व विसरा...
...🏹विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🏹...-
काळ्या पाषाणालाही तेव्हा प्रेमाचा पाझर फुटावा...
घाव घालणारा घण जेव्हा "गुलाब" असावा...!!-