तिच्या चेहऱ्यावरचा राग
स्पष्ट तिच्या नजरेतून दिसतं होता
पण तिचा तो राग जणू
नव्या प्रेमाची सांगड घालत होता.-
निःशब्द जरी माझे शब्द,काव्यातून अलगद बोलतात
अंतरातील सुप्त भावना,ओळीच्या गर्भातून खोलतात..-
आज लेखणीला मी म्हटलं
काय लिहावं तूच मला सुचव..
ती म्हणाली जरा डोळे बंद कर
आणि शब्दांना भावनेत भिजव..-
ओळींच्या गर्भातील अर्थ, मनास अलगद स्पर्शून जातात...
गूढता अलवार कळताच, खोल अर्थ देऊन जातात...!!-
तुटलेल्या या हृदयातून पाझरे
साठवलेले ते क्षण तुझे,माझे..
ओघळतांना मला म्हणाले सारे
का? साठवून ठेवले होते ओझे..-
अंतरात साठवलेल्या भावना
ओघळता अश्रूतून शब्द बनती..
लेखणी अलगद टिपून साऱ्यांना
काव्य रुपातून संजीवनी देती..-
मला निवांत क्षण आणि दुःख देणारे अनुभव यातील एक गोष्ट निवडायची असेल तर मी दुःख देणार्या अनुभवाची निवड करेन.
-
काव्याच्या त्या शब्दाशब्दाने मी मोहरुन जाते..
कवितांच्या तुझ्या जगात उगीच स्वतःला शोधत बसते..-
🌹🌹...नेहमी आनंदी राहायचे असेल तर
फक्त आणि फक्त आपल्या कामावर प्रेम करा...अन्
जर अपेक्षा करायची असेल तर स्वतःकडून करा
दूसऱ्याकडून नको..🌹🌹-
...निरोप घेतांना...
सहज नसते ना ग निरोप घेणे
डोळ्यातील अश्रू हसत हसत लपविणे
तुझी ती दारात उभी प्रतिमा डोळ्यात साठविणे
लवकर परत ये हे न सांगताच समजून घेणे
तु दिलेला निरोपासाठी अलिंगन
दुर जातांना वाढलेत ह्रदयाचे स्पंदन
प्रत्येक श्वासागणिक किती ग तुला आठवतो
प्रत्येक गोष्ट तुझी ह्रदयात माझ्या साठवतो
एक परतीचा प्रवास माझा सुरू झाला
पुन्हा भेटीसाठी वाॅच आणि वेटींग चा सिग्नल आला
स्वतःची काळजी घे माझ्या प्रितीच्या फुला..-