जो खरं बोलतो आणि मनापासून, मनातलं बोलतो., त्याला राग लवकर येतो
आणि लोक त्याला अहंकारी समजतात.,
पण तो रागात का बोलला, हे मात्र कुणी सांगत नाही
का ..?? तर
त्यांचा खोटेपणा उघड होईल ना ..
प्रत्येकाला फक्त आपलीच खरी बाजू दाखवायची
असते, ती असेल किंवा नसेल तरीही
आणि दुसऱ्याची खरी बाजू खोटी दाखवायची असते.
ती खोटीच असेल तर ठीक आहे, पण नसेल तर का..??
#खोटीप्रतिमा
-
दिखावा मातृदिनाचा...
हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय.
मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी,
आईचा स्वार्थापोटी वापर झालाय.
मातृदिनाचे औचित्य साधून,
काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.
"आय लव यू 'आई'" लिहीत,
कित्येक सोशल साईट वर शेअर ही केले.
त्याच्याच घरातून आज मात्र,
काय करतेस?नुसतीच मध्ये मध्ये तडपडतेस,
गप्प गुमान बस तिथे,असे आवाज आले.-
खोटेच बोलणे खोटेच बहाणे
इथे सारे खोटीच संभाषणे
इथले सगळे अवघड राहणे
खोट्यासंग खोटेच इथले जगणे
-
उबग... लोकांच्या
मोठेपणाचा येत नाही
पण खोटेपणाचा मात्र येतो..😆
रश्मि-
एखाद्याला थंडी वाजत असेल तेव्हा जर आपण त्या व्यक्तीवर उबदार पांघरून घातलं तर कदाचित पुढे जाऊन ती व्यक्ती आजारी पडणार नाही...
पण जर एखाद्याच्या चुकांवर तसेच खोटेपणावर आपण सतत पांघरून घालत असेल तर ती व्यक्ती आजारी नक्कीच पडणार नाही पण तोंडावर नक्कीच पडेल ती ही तुम्हाला घेऊन....
-
शाळेत सत्याचे धडे शिकून
जर आपण आपल्या घरच्यांना खोटं बोलण्यासाठी प्रेरित करत असू,
किंवा त्यांच्या खोटेपणावर पांघरून घालत असू तर मग तुमच्या शिक्षणाची किंमत शून्यच...
-
विश्वासाच्या परीक्षेत नापास होणारी व्यक्ती
सत्य लपवून खोटं बोलण्याचा लाख प्रयत्न करते
पण कधीना कधी ती दुसऱ्याच्या
विश्वासघाताला नक्कीच बळी पडत असते
ज्या वेळी पाश्चातापाची वेळ येते त्यावेळी
केलेल्या खोटारडे पणाचा विचार करत बसते-
#खोटेपणा
जगण्यामध्ये आजकाल खोटेपणा मुरत चाललाय,
मनात लोकांच्या रितेपणा भरत चाललाय...
दगडाच्या देवाकडून काय अपेक्षा करावी,
माणसातला माणूसच जेव्हा विरत चाललाय...
जिंकण्याची जिद्द असलेले गेले कुठे,
इथे जो तो आपलीच स्वप्ने हारत चाललाय...
करावी यशाची शिखरे सर, स्वबळावर,
इतरांच्या प्रगतीवर का जीव जळत चाललाय...?
पोकळ मनाचीच झालीत माणसे सारी,
असा कसा त्यांचा आत्मा मरत चाललाय...-
प्रत्येकासोबत खरं वागून स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा....
जे खोटे वागतात त्यांच्यासोबत पण खोटेच वागत चला....-
काही लोकं पावलोपावली जाणवून देत असतात की त्यांचं आपल्याबरोबरचं नातं किती "खोटं" आहे....
-