हिशोब का हवा तुला कधीच रात्र संपली,
तुझ्या सहीत राहिलो अजून चांदण्यात मी...
-
दाटली संध्याछाया श्यामल
नभी हासला चंद्र धवल,
फुलले तुझ्या डोळ्यांत सखे
कोटी कोटी ब्रह्मकमल
@किशोर-
आता कुठे जरासे मळभ हटले,
आता कुठे जरासे हायसे वाटले,
दाटले होते कधीचे उरात माझ्या
चिंब पापण्यांना अलगद मिटले...
@किशोर-
पैलतीरी सांजेच्या
आपली भेट होईल,
तुझा हात हाती
तेव्हा मी घेईल...
पकड बोटांची घट्ट
आवळेल बोटांना,
आगळीच धुंदी असेल
तुझ्या गोड बातांनां...
डोळ्यात पाहता तुझ्या
माझाच मी न राहतो,
तुझ्या प्रवाहात सखे
तुझ्यासह वाहतो...
@किशोर-
फक्त सुर्यच मावळत नाही,
मावळतात तुझ्या आठवणीही...
आणि मग खेळ सुरू होतो
सावल्यांचा, तुझ्या आभासांचा...
मीच भरकटत जातो कधी कधी,
तू नेहमीच सोबत असतेस
कधी प्रकाश, कधी सावली बनून...
@किशोर-
वेळीच लावावी पट्टी
जखम चिघळण्या आधी,
कुलूप लावावं हृदयाला
कोणी पोखरण्या आधी...
@किशोर-
तुझी चूक कोणती सारा कसूर माझा,
तुझं गीत उत्तमच स्वर बेसूर माझा...
बांध दुःखाचा व्यापला मला जरी,
नेईल वाहून त्यास अश्रूंचा पूर माझा...
ग्रहण लागणार नव्हतेच मला कधी,
शोधतो तरी हरवला कुठे नूर माझा...
ओढ संपलीच आहे, प्रेम ही संपेलच,
तरी होतोच आहे जीव आतूर माझा...
वारा घेऊन येतो गंध तुझा अजूनही,
अन भिनतो रक्तात श्वास फितूर माझा...
डोळ्यांतला श्रावण आवरू कसा मी
मनसोक्त नाचतोय मन मयूर माझा...
युक्ती थोपवण्याची सांग जाता जाता
उठलेला मनातला धुंद काहूर माझा...
@किशोर भूमकर-
थोडं जगलोय, अजून थोडं
जगणं बाकी आहे,
मी तुझा झालोय कधीचा,
तू माझी होणं बाकी आहे...
@किशोर-
तुझ्या आठवणीत जगायला
पडेल आयुष्य अपुरे....
आपल्या प्रेमासाठी प्रिये
सात जन्म ही अधुरे....
@किशोर-
दव तुझ्या ओठांवरले,
हलकेच मी टिपावे,
मग शहारूनी मिठीत
माझ्या तू शिरावे...
@किशोर-