आठवणींचं चांदणं ती रात्र अवसेची
अंतरंगात या आठवणींचा शहारा
स्वप्ननगरीत माझ्या बरसणाऱ्या धारा
पुन्हा एकदा खुलु दे... पुन्हा एकदा वर्षु दे...
क्षणभरात या लुप्त आठावणींचा
आठवणींची चाहूल तो ही कवडसा
मनातलं काहूर पुन्हा एकदा
पुन्हा एकदा स्पर्शु दे... अलगद उजळू दे...
{In hindi ➡ read caption}-
मनातल्या विचारांचा,
गुंफलेल्या भावनांचा,
आठवण आभास देते, स्पर्श नाही...
सौख्याच्या मोहोराचा,
दुःखाच्या संगमाचा,
आठवण आभास देते, स्पर्श नाही...
अविस्मरणीय क्षणांचा,
दाटलेल्या भूतकाळाचा,
आठवण आभास देते, स्पर्श नाही...
अल्लड हास्याचा,
आठवलेल्या आठवणींचा,
आठवण आभास देते, स्पर्श नाही...-
सांजवेळी येणारी तुझी स्वप्नं
रात्री डोळ्यांना ओलावून जातात
आठवणींच्या कवेत तुझ्या
मनासही वेडावून जातात...
अलगद सारे क्षण मग
नजरे समोर येतात
पहिल्या भेटीची आठवण
हळूच करुन जातात....
भेटायला आता आतुर होते मन
परत गाठ आपली पडेल का रे पण?
-
तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...
आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं...
मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..??
का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता..,
पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते... ?
का तुझी आठवण नको असताना येतच राहते..!!-
ये अशी प्रिये तू जवळी गं माझ्या....
वाहतो दशदिशांना हा धुंद वारा
मनाच्या त्या अधीर भावना
संगे पावसाच्या रोमांचकारी धारा
तुझा स्पर्श मुका भाळवी मनाला
साथ तुझी अधुऱ्या स्वप्नांना क्षणाक्षणांना
आधार घेतो मी रुक्ष तरुंचा
साद घालतो नद्या-दऱ्या पर्वतांना
चित्कार हा अवघा आसमंत गाजविणारा
मन माझे सुन्न विषण्ण करणारा
अंगिकारच जणू दुःख-विरहांचा
आर्जव माझा कळकळीचा
या नर्कयातना मज आता सहवेना
सहवास तुझा हवाहवासा
निद्रिस्त कल्पनांना जाणिवेचा
ये अशी प्रिये तू जवळी गं माझ्या....
- अमोल गडे.
-
तुझी आठवण येते
किती मास, किती साल
डोळे तरसले, जीव कावला
दोन थेंब देऊन जा
पावसा पावसा येऊन जा
(पूर्ण कविता caption मध्ये)-
हो आजही तुझी आठवण येते...
जेव्हा पावसाच्या सरी हळुवार पणे खाली येतात
तुझ्या बरोबर हातात हात घालून चालणे आठवते
आजही कधी कधी मी गर्दीत हरवतो वाट बघतो तू येऊन मला रस्ता दाखवशील,
एक वेळ होती जेव्हा एकटा राहून पण एकटे पणा वाटत नव्हता पण आता तर माणसात राहून पण एकटे पणा जाणवतो
हो मला आजही आठवते की कश्या प्रकारे गरबा खेळताना आपली ताटातूट झाली अन् तुझ्या चेहऱ्यावर भीती दाटून आली होती
मी मागे उभा राहून मजा बघत होतो पण आज मला त्यामागचं कारण समजतंय
आपण गेलो होतो त्या सगळ्या जागा आता निर्जीव वाटतात flyover वरचे ते गाण्याचे बोल पण आता ऐकू येत नाही.....
हो आजही मला तुझी आठवण येते....-
हसरा चेहरा हरवला कुठेतरी
तुझ्या शेवटच्या भेटीत
विरहाच्या मिठीत
शेवट ते शोधू कुठे..?
सावराव मनाला कसतरी
जीव तुझ्यावर
आस तुझीच
आठवण मात्र जाई ना..!
म्हटलं विसराव कसतरी
पण त्याच क्षणी
आठवण पुन्हा तुझीच
जीव तुझ्याविना रहि ना..!-
कधी,कोणाची,कशी येईल,काही सांगता येत नाही,
ती चांगलीही असू शकते किंवा वाईटही असू शकते,
कधीही कोणाची आठवण आली की ,
आपण आपल्या विचार मंथनात रमून जातो,
जाणता अजाणता पुन्हा पुन्हा तेच ते आठवत राहातो,
मग कदाचित काही वेळेस आपल्याला त्याचा त्रास देखील होतो,
ठरवूनही ती आठवण विसरता येत नाही,
आठवणी नेहमीच विशेष असतात,
काही वेळेस आपण हसलेले दिवस आठवून
आपल्या डोळ्यात पाणी येते,
तर काही वेळेस आपण रडलेले दिवस आठवून आपल्याला हसू येते,
तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्ताच मनापासून भेटा,
त्यांना नेहमी निरोप देताना आनंदाने निरोप द्या,
कदाचित उद्या तुम्ही किंवा ती व्यक्ती नसेल पण
तुमच्या चांगल्या आठवणी तुमच्या बरोबर नेहमीच असतील,
आणि लक्षात ठेवा,आठवण आभास देते,स्पर्श नाही.....-
आठवण तुझी, हृदयाच्या एका कोपऱ्यात साठलेली
रडता-रडता हसवणारी तर कधी हसता हसता
डोळ्यांमधून पाऊस पाडणारी...
आठवण तुझी, रस्त्यावर त्या घर करून बसलेली
एकट असताना साथ देणारी तर कधी गर्दीत एकट
सोडून जाणारी..
आठवण तुझी, चांदण्याच्या त्या प्रकाश्यात बहरणारी
कधी निशांत झोपयला लावणारी तर कधी रात्र भर
अंधारात जगावणारी...
आठवण तुझी, हवेच्या एका थंड झोक्या सारखी
मनाला अलगत स्पर्श करून परत स्वप्नांच्या गावात
घेऊन जाणारी...-