QUOTES ON #सावित्रीबाई

#सावित्रीबाई quotes

Trending | Latest
3 JAN 2022 AT 10:53

3 जनवरी सावित्रीबाई फुले का जन्मदिन है सावित्रीबाई फुले एक भारतीय समाज सुधारक, शिक्षाविद और महाराष्ट्र की कवियत्री थीं। उन्हें भारत की पहली महिला शिक्षिका माना जाता है। अपने पति, ज्योतिराव फुले के साथ, उन्होंने भारत में महिलाओं के अधिकारों को बेहतर बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। उन्हें भारतीय नारीवाद की जननी माना जाता है।
({@~my words~@})

-





......स्वप्ना मधुकर बोरसे ✍️

-



सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

-



सासू सुनांच्या मालिका पाहून
रडत बसते प्रत्येक घरची माई l
जिने तिच्या पिढ्यांचे अश्रू पुसले
तिला मात्र विसरून ती जाई l
प्रेक्षकांअभावी बंद पडावी सावित्री
यासारखं दुर्दैव ते नाही ll
©® Sanket

-


10 MAR 2022 AT 14:26

सावित्री च्या पुन्याईने
आज आपली ही शान
घरादारातले थोडे का होईना
द्यायला लागलेत मान
तिचीचं ही कृपा सारी
तिचिच ही सारी खुमारी
तिने सहन केला नसता तेव्हा अपमान
तर आज आपल्यालाही खाली घालावी लागली असती मान
सावित्री बाईंना विनम्र अभिवादन
💐💐💐💐💐💐💐💐💐

-



झेलूनिया अंगावरती
शेणामातीची घाण l
दिले विद्येचे ज्ञान
लेकी कराया सज्ञान ll

©® Sanket

-



सोसूनिया अंगावरती दगड अन् धोंडे l
रोविले तिने स्त्री शिक्षणाचे झेंडे ll

©® Sanket

-



......स्ञियांचे सबलीकरण....
कधी काळी आम्ही स्ञिया निरक्षर होतो
पारतंत्र्यात जिवन जगत होतो
गुलामगिरित पुरूष आम्हा ठेवत
चुल आणी मुलं या पलीकडे आम्हा ज्ञात नव्हते
पुरूष प्रधान संस्कृती समाजाचा दरारा
म्हणून आम्ही वंचीत होतो
चार भिंतींच्या पलीकडे काय घडतंय
डोळे झाकून बघत होतो
तुरूंगातील कैद्याप्रमाणे जिवन आमच्या स्ञियांचे
शिक्षणापासून वंचित अज्ञान होतो
अन्याय सहन करत करत
कित्येक स्त्रिया बळी पडल्या
दिवस बदलले प्रकाशाची ज्योत नवी आशा
नवी किरण नवी उमेद घेऊन आली
स्त्री साक्षर बनवण्याचा निर्धार सावित्रीने घेतला
समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला
अज्ञान आता दुर झाले आम्ही सज्ञान झालोत
अंधारातून प्रकाशाची ज्योत, नवी किरण घेऊन आली
पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून
आम्ही क्षितीज गाठलं ,आम्ही अता निरीक्षर नाही
कुणाचे आम्ही गुलाम नाहित
कुणाच्या पायातील पायताण नाहीत
आम्ही आता निरक्षर नाही , साक्षर आहोत..
🙏...सावित्रीबाई फुले यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 🙏
शुभांगी बोरसे (पिंगळे)✍️
मुल्हेर बागलाण नाशिक

-



किती भोगले किती सोसले
तरीही तिने शिकवले l
स्त्री शिक्षणाचे धडे पुढे
तिच्या साऱ्या लेकिंनी गिरवले ll

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
स्मृतीदिनानिमित्ताने
ll विनम्र अभिवादन ll

-


3 JAN 2021 AT 13:30

अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले,
चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले.
त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

-