रोजनिशी लिहता लिहता,
शब्दांशी झाली घट्ट मैत्री.
भावनांना मांडता येते शब्दात,
अगदी सहजपणे याची,
पटली होती पक्की खात्री.
शब्दांच्या दुनियेतला,
मी एक सामान्य यात्री.
कल्पना, वाचन अणि अनुभवाने,
रचतो मी कविता, कथा,
कधी दिवसा तर कधी मध्यरात्री.
प्रेमात पडतील कथा कवितेच्या,
अनेकांच्या सुंदर पुत्र पुत्री.
शपथ घेतली मी अनं माझ्या लेखणीने,
प्रेम, कर्तव्य, धर्म, सत्य,
पसरवण्याचे महाशिवरात्री.-
त्याला रातराणी
मला प्राजक्त आवडायचा
तो रात्री गंध साठवायचा
मी पहाटे सडा वेचायचा
त्याला ओंजळ
मला मूठ आवडायची
तो रात्री अश्रूं साठवायचा
मी पहाटे थेंब पुसायचा
त्याला चंद्र
मला सुर्य आवडायचा
तो रात्री प्रकाश साठवायचा
मी पहाटे कवडसा शोधायचा
-©शब्दपौर्णिमा...✍️-
आज एका ठिकाणी जवळच्या ओळखीच्या लग्नाला गेले होते..
तेंव्हां एक विचार मनात आला...
असं का बरं प्रत्येक लग्नात होतंच..
की, नवरदेव बिचारा गेटवर आला..
"तरी नवरीचे काहीतरी राहिलेलेच असते.."
अन् बिचारे "काका" घसा दुखेपर्यंत पुकारतंच असतात,
नवरीच्या मामाने नवरीला लवकर घेऊन येणे...
( याचं खरं कारण नवरीचा मेकअप...😎😂 )-
!! शब्द, अर्थ, प्रेम, द्वेष !!
शब्द अडीच अक्षरं
अर्थ अडीच अक्षरं
प्रेम अडीच अक्षरं
द्वेष अडीच अक्षरं
कुणी "शब्दांवर प्रेम " करतं...
कुणी "अर्थांचा द्वेष " करतं...-
जर मला इच्छा प्राप्तीचं अनोखं वरदान लाभलं.. जर मला खरचं अशी शक्ती, अशी तेजता, अशी दिव्यता, अशी वेळ, अशी घटना, अशी अनमोल संधी किंवा असा आशिर्वाद मला मिळाला तर.! ( अजून नाही मिळाला बरं का...मी सांगेन ) मी आधी अन्याय या शब्दाचा म्हणजेच या लादलेल्या कृतीचा समूळ नाश करील... कारण या अन्याय नावाच्या प्रकाराने माणूस माणसांवर जबरदस्तीने स्वतःच्या इच्छा लादतं आहेत...
स्वातंत्र्य गमावून माणूस माणसांच्या दबावाखाली आयुष्य जगत आहे.. जे हक्काचे स्वातंत्र्य जगण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे.. आणि अन्याय हे या स्वातंत्र्याला लागलेलं ग्रहण आहे..
त्याचा सर्वनाश करेल मी...
जर का, मला इच्छा प्राप्तीचं वरदान मिळालं तर...-
आयुष्य.. देवाने, वेळेने आणि निसर्गाने सगळ्यांना समान दिले आहे... हे त्रिवार सत्य आहे. पण... नेमका खडा पडतो कुठे ? देव तर चुकणार नाही... वेळ ही आव्हानात्मक भूमिका बजावत असते, तीही अन्याय करणार नाही...आणि निसर्ग तो तर आपल्यालाच निर्भिड बनवतो, आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी.. मग तो ही भेदभाव करणार नाही...
हे सगळे तर जगायला बळ आणि लढाईला प्रोत्साहन देतात!!
मग नक्की चुकतो कोण..? का.. कोणा.. कोणाच्याच आयुष्यात हे भोग आहेत.. सर्वांच्या आयुष्यात का नाहीत मग हेचं भोग..? जर प्रत्येक जीव सारखाच आहे, तर मग काहींच्याच वाट्याला का मातृत्व नसावं..?
त्यालाही बाबा हे शब्द स्वतःच्या मुलाच्या तोंडून ऐकायचे आहेत... त्यानेच का बाबा शब्दाला मुकावं..?-
ती वाट... तू सोबत
ती घाट... तू पर्वत
ती साडी... तू शर्ट
ती मुलगी... तू कार्ट
ती जेमिनी... तू मुरली
ती शेंग... तू कारली
ती माती... तू गंध
ती उदबत्ती... तू सुगंध
ती बॉबी... तू मारी
ती उपाशी... तू आहारी
कसं का असेना...
पण जमवायचं गड्या ! !😎
-©शब्दपौर्णिमा...✍️-
माझ्या मनात काही प्रश्न कायमच उत्तरासाठी धडपडतात..
मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा माझा प्रयत्न सुरू असतो...
की, "क्षणांना वेळ किंवा वेळेला क्षण नाव कोणी दिलं असेल"
किंवा कसं पडलं असेल..?
पण.. मनातील काही विचारांना आणि डोक्यातील प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळतंच नाहीत.. हे खरं..!
काय असेल या नावामागचे गूढ, संकेत किंवा पार्श्वभुमी..! की, गेलेल्या क्षणांना भूतकाळाचं का म्हणायचं..? चालू क्षणांना वर्तमानचं का म्हणायचं..? आणि येणाऱ्या क्षणांना भविष्यकाळचं का म्हणायचं...???
अजूनही निरूत्तरितच आहेत हे स्वतःला पडलेले असाधारण प्रश्न.............?-
१०-०१-२०२४
रोजनिशीत ... आपल्या दैनंदिन जीवनातील घटनांची नोंद ठेवता ठेवता, काही कटू गोड क्षण, काही गुलाबी क्षणांची उजळणी ही आपणं करतो.
आपणं ही "रोजनिशी" समाज माध्यमावर लिहितो आहोत हे लक्षात घ्यावं. वैयक्तिक आयुष्यातील कोणतेही संदर्भ चुकूनही नमूद होणार नाहीत ह्याची काळजी सर्वांनीच घ्यावी. सावधगिरी बाळगावी. ह्या उपरांत आणखी काही सांगायची गरज आहे कां ??
मी माझं मत मांडलं......असो-
दि. २ ५ ...० १ ...२ ० २ ४.
एक दिवस अधिक मिळावा जगण्यासाठी
मिळत नाही
एक श्वास अधिक लाभावा जिवलगासाठी
लाभत नाही
एक शब्द अधिक मिळावा कळण्यासाठी
मिळत नाही
एक संदर्भ अधिक लाभावा आठवणींसाठी
लाभत नाही
एक दुरावा लवकर संपावा भेटीसाठी
मिळत नाही
एक ओलावा कायम रहावा कवितेसाठी
प्रश्नच नाही.
-