धनाचा अभाव जरी, तरी नांदली रमाई
दीन दुबळ्यांची माय, दीन दलितांची आई
अख्ख्या आयुष्यात, नाही केली तक्रार
निखऱ्यातही फुललेली, घेतली नाही माघार
रमाईची खरी पुण्याई, प्रज्ञा सूर्याची सावली
कधी पुटपुटली नाही, वादळात ही माऊली
स्वाभिमानी रमाई, सांभाळला प्रेमाने संसार
लाल कुंकू कपाळी, शोभून दिसें फार
पटक्याचं लुगडं नेसून, भिमाची बघण्या नवलाई
सहकार्याची मूर्ती होती,... त्यागमूर्ती रमाई.....-
"भिमराज होते दिव्याच्या समान, परी त्या दिव्याची रमा वात होती"
माता रमाई यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन...! 💐💐-
नाही गेली अज्ञाबाहेर
ना कधी आठवला माहेर
नाही केली आशा सोन्याची
चिंता करी सदा धन्याची
हसत मुखाने गाडी
ओढली संसाराची
रमाई झाली स्फूर्ती
ज्योती भिमराव आंबेकरांची
त्यागमुर्ती माता रमाई यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
-
माय माऊली, जिने पर्वा न
आपल्या लेकरांची केली
माझ्या बाबांची ती सावली,
जिने समाजासाठी आपली
लेकरं त्यागली समाजाच्या उद्धारासाठी जिने आपले संसारची पर्वा ना केली
अशी ती बाबांची रामू
आणि आमची रमाई माऊली
#रमाई_जयंती-
"कधी फिटणार नाही असे उपकार तुझे माँ रमा,
असेल पुन्हा आयुष्य तर तुझ्या पोटीचं यावे जन्मा."
-
तुझ्या कर्तृत्वाने झेप मी घेऊ शकलो,
तुझ्या श्रमाने बळ मी कमवू शकलो,
तुझीच होती कळ मी झळ सोसू शकलो,
न्यायाच्या त्या युद्धात तू होतीस रमा,
म्हणूनच मी रण जिंकू शकलो।।-