Rupali Nannaware  
66 Followers · 11 Following

Joined 22 May 2020


Joined 22 May 2020
29 JAN 2021 AT 13:57

शाळेतील प्रेम...
कळलंच नाही कधी मन जुळलं!
आमचं प्रेम वर्गात सगळ्यांना कळलं!!
कधी आमचं चोरून चोरून पाहणं !
सुट्टी झाली तरी वर्गातच राहणं!!
कारण नसतानाही वही मांगणं!
मनातील प्रेम नजरेन सांगणं!!
शाळेत सरांची भीती कायम असायची!
मात्र ती बघताच छाती माझी फुलायची!!
तो प्रेमळ आमचं संवाद आणि भेटीगाठी!
खूप सुंदर होत्या त्या गोड आठवणी!!
शाळेतील दिवस संपले आम्ही झालोत वेगळे!
प्रत्येकाला जीवनात मिळते का रे सगळे!!
खुप वर्षांनी ती अचानक दिसली!
सगळ्यात सुंदर तीच वाटली!!
जोडीदारासोबत आज ती मला भेटली !
तरी पण ती मला माझीच वाटली!!
विचार केल पण सांगायचं गेलं राहून !
खूप छान वाटलं तिला सुखी पाहून!!
काय उपमा देऊ तिला अप्सरा स्वर्गाची!
की होती एक मुलगी माझ्या वर्गाची !!

-


6 DEC 2021 AT 21:46

ज्ञानाचा असा सागर कधी न पाहिले
अवघा जन्म समाजाला वाहिले
कष्टाचे बीज अंकुरले शिक्षणाचे वटवृक्ष झाले
परीस हे मानवतेचे मानवाला माणूस बनुन गेले
घटनेचे शिल्पकार जीवनाचा ग्रंथ लिहून गेले
मावळला करुणेचा सूर्य
पाखरांना सोनेरी पहाट देहून गेले

-


25 OCT 2021 AT 21:35

बासरी
आतून पोकळ पण होती कुष्णाची!
राधा, मीरा पेक्षाही जास्त प्रितीची !!
वसुंधरा चिंब भिजे!
बासरीचे सुर वाजे!!
यमुनेतीरी रास रचे!
गौळणी संग कृष्ण नाचे!!
मोरपंखी रूप त्याचे!
हरवते भान प्रत्येकाचे !!

-Rupali Nannaware




-


14 SEP 2021 AT 21:58

चाहूल लागली प्रेमाची
अन् मन हरपून गेले...
जीव झाला आता वेडापिसा
तुझ्या विना हे जग नकोसे झाले...

-


10 SEP 2021 AT 20:59

पार्वतीच्या बाळा
पुष्प हारांच्या घालतोस माळा
पायात छणछण वाळा
आगमनाने होते सगळे गोळा
भक्तांना लागते तुझाच लळा
फुलुदे प्रत्येकाच्या अंगणी सुखाचा मळा

-


9 SEP 2021 AT 22:24

आस लागली गणराया तुझ्या दर्शनाची..
तुला मन भरून पाहण्याची..
मोदकाच्या गोड प्रसादाची..
लवकरच उजळणार ती सोनेरी पहाट
बाप्पा तुझ्या आगमनाची...

-


30 AUG 2021 AT 17:51

साद घाली तुझी बासरी
हृदयात बरसतात प्रेम सरी !

मुरलीधर तू गिरिधारी
सप्तसूर पडता कानी
सवंगडी जमती यमुनातीरी !

कृष्णवेडी राधा झाली बावरी
ऐकता कान्हाची मधुर बासरी !

-


9 AUG 2021 AT 16:09

आषाढ संपला,आला श्रावणमास
ऊन, सावलीतील पावसाचा खेळ रंगते खास..
रिमझिम रिमझिम पाऊस धारा
सोबतीला गोडगुलाबी वारा..
धरती हिरवा शालू पांघरली
झाडे,पाने,फुले,सगळी बहरली..
वसुंधरेला पाहुनी मेघांचे प्रेम सप्तरंगात खुलती
मेघधरतीचे प्रेम मग इंद्रधनुष्य होऊन झुलती..
श्रावणातील सगळे सोहळे
ज्यांचे त्यांचे महत्त्व आहे वेगळे..
आला आला श्रावण मास
घेऊनी सन- उत्सव खास..

-


1 AUG 2021 AT 22:50

आपलं जीवन हे अनेक नात्यांनी बहरलेलं असते.
काही नात्यांचं जन्म आपला जन्मासोबत होते.
तर काही नाती नकळत एखाद्या फुलासारखी उमलत जातात..
त्याच नात्याला मैत्री म्हटल जाते...
सध्या इंस्त्रा, फेस बुक वर आपण खुप मित्र ,मैत्रीणी जोडत असतो...
पण तो एक वेगळा भाग झालं.
खरी मैत्री ही एकद्या आंबट गोड फळा सारखी असते. कधी प्रेम , कधी भांडण, कधी चिडवण, तर कधी रागवण पण सरते शेवटी एकच
तुझं माझं जमेना...तुझा वाचून करमेना...
यालाच मैत्री म्हटल जाते.. मैत्री ही ‌कधीच निवडून होत नसते
प्रत्येक व्यक्ती मध्ये त्याचे विशिष्ट गुण असतातच कुणाचे विचार पटतात तर कुणाचे समजून न घेण्यासारखे असतात..
आपण ज्याला निवड म्हणतो ते म्हणजे त्यांच्या विचारांची आपण निवड करतो..
आणि ज्यांचे विचार आवडतात ती व्यक्ती आपणं मैत्री म्हणून आवडते ...आवड आणि निवड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.. एकादी व्यक्ती ही नशिबानेच मिळते आणि ती मैत्री टिकवणे हे आपल्या हातात असते..

-


20 JUL 2021 AT 15:47

हात कमरे वरती कपाळी चंदनचा टिळा
सुंदर रुप शोभे गळी तुळशीच्या माळा!
चंद्रभागेच्या तीरी वसलंय तुझ गाव
भक्तांच्या मनी गुंजतेय रं तुझ नाव !
टाळ मृदंग ही बोले माऊली माऊली
भजनात दंग पंढरपूर नगरी दुमदुमली!
तुका, चोकोबा गुण तुझ रं गाईलं
कधी भंग न होणार अभंग राहील!
तुझ्या दर्शना आधी आहे नामदेव पायरी
करावी एकदा तरी पंढरपूरची वारी !
सोनियाचा पिंपळ आहे ज्ञानोबाच्या दारी
आषाढी, कार्तिकी ला भेटतोय सावळा हरी !

-


Fetching Rupali Nannaware Quotes