प्रिय प्रेयसी,
खूप काही बोलायचं असतं, मनात साठवलेल सांगायचं राहून जातं...
तु ना एवढं प्रेम करत, त्यापुढे माझं प्रेम दिसेनास होऊन जातं...
तु जेव्हा मला भेटत, आपलं भेटणं अपूर्णच राहून जातं...
सांगेन तुला भेटून फक्त, जे नेहमीच तुझ्याबद्दल सांगायचं राहून जातं...-
ही आहे गोष्ट एका शाळेची,
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याची...
शिकवण्यासाठी पलीकडच्या या विश्वात काहीतरी शिकण्याची,
अबोल असणारी चिमुकली आणि त्यांचा शब्द बनण्याची...
आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्याचं विश्व रंगेबिरंगी करण्याची,
विश्वा पलिकडल्या निरभ्र आकाशात स्वच्छंद उडण्याला बळ देण्याची...
कधी छडीच्या माराने तर कधी प्रेमळ भाषेत शिक्षा करण्याची,
वेदना होतात गुरुजनांनाही शिक्षा होते कुणास व्याकुळ होतात मन गुरुजनांची...
वेळ येईल जेव्हा या ज्ञानरुपी शाळेचा निरोप घेण्याची,
जन्म जरी माझा घरी झाला पण वाढ माझी इथेच झाली आणि शिकवण मला इथेच मिळाली माणूस म्हणून जगण्याची...-
किसीं और को बडा करने में तुमने बेहद पुराना साथ भुला दिया...
जिस बात हमे गुरुर था तुमने तो हमारा गुरूर ही छिन लिया...-
तू खरचं आहे की नाही कधी कधी अस वाटतं मला,
माझं प्रेम, माझी तळमळ का कळेना तुला...
बोलायचं तर सोडून दिलंच असत जर काही वाटलं नसत मला,
टाळायचे तुझे बहाणे आणि क्षणोक्षणी चा अबोला...
कधितरी देशील वेळ घेशिल समजून मला,
याच आशेने रोज बोलाव आणि मग कधीतरी कळेलच तुला...-
तू असताना जीवनाला नवा रंग आला,
तू पहिला पाऊस घेऊन आली
आणि या मातीला सुगंध आला...
तू असताना जीवनात नवा बहर आला,
तू श्रावण घेऊन आली
आणि हा वृक्ष बहरून आला...
तू असताना जीवनात अंधारल्या रात्रीस प्रकाश मिळाला,
तू चांदणे बनूनी आली,
आणि तो चंद्र तुझा झाला...
तू असताना जीवनास नवा मार्ग मिळाला,
तू सावली बनून सोबत आली
आणि जीवनाचा प्रवास सुरू झाला...
-
निगहों में हमे छुपा लेना,
दिल में हमे संभालकर रखं देना
कही कोई दिल निगहें चुरा ना ले जाये...
दस्तक तो कई आयी इस दिल पर,
कोशिशे भी बोहोत हुई, रेहना पडा हमे संभलकर,
जो दिलहीं आप हो संभाले,भला कैसे कोई ले जाये...-
काहीशी नाराज आहेस की कोणाशी बोलणं होतंय येव्हाना,
आता तर तुझी नजर मला बघत नाही, की नजर चूकवते मी दिसताना...
तुला आठवण येत नाही का कधी माझी, की त्रास झालाय माझा आठवणींना...
कधी माझं नाव पण येते का तुझ्या ओठी, की भार होतोय माझ्या नावाचा तुझ्या शब्दांना...
आता तर तुझ्याबद्दल बोलणं पण होऊ देत नाही, विषयच बदलून टाकायचा तुझा निघताना,
जीव तर माझाही कासावीस होतोच, पण तुलाही त्रास होतो का मी नसताना...
- Pankaj Kamble-
असेल मी नसेल मी,
तरी असेल आठवणी माझ्या,
हरलो नाही मी तुझ्यात,
फक्त हरलो पुढे तुझ्या....-
मी रोज नव्याने तुला पाहतो,
मी तुझ्यात स्वतःला शोधत राहतो...
तू असशी दूर जरी जवळी तुलाच शोधतो,
मज वेड तुझे, स्वतःला तुझ्यातच हरवून बसतो...
तुझा अबोला मला छळून जातो,
मी असा मग एकटा पडून जातो...
न कळे मज काय मी करावे,
मग मीच माघार घेऊन जातो...
तुला मी कळू देणार नाही माझे प्रेम,
इतक्या सहज समजावे का तुला माझे प्रेम,
शब्दात कसे सांगावे तुझ्यावरचे प्रेम
हे माझे असेच तुझ्या समजण्या पलीकडचे प्रेम...-