☘️🍁☘️ सांजधारा ☘️🍁☘️
कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगावं ...
कारण, एक छोटीशी स्माईल सुद्धा खुप काही करण्याचं बळ देते ...!!!
☘️🍁☘️ ☘️🍁☘️-
भाव हृदयाचे जाणून मना मनाला जोडणारी
मराठी माणसाच्या रक्तात खोलवर रुजणारी
ज्ञानोबा तुकोबा नामदेव जनी
यांच्या लेखणीतून वाहणारी
पहाटे वासुदेवाच्या भुपाळीतून
लोकांच्या घरा घरात पोहचणारी
छत्रपतींच्या कणखर तलवारीतून स्वराज्य घडवणारी
शिवरायांच्या राज्यकारभारात मानाचा स्थान मिळवणारी
इतिहासातील शूरवीरांच्या गाथा सांगणारी
संस्कृत ग्रंथाचा अर्थ सामान्य जनतेपर्यंत पोहचवणारी
चौदा विद्या चौसष्ट कलांनी समृद्ध असणारी
संस्कृती परंपरा यांना प्रेमाने जपणारी
महाराष्ट्राच्या कणा कणात नांदणारी
मातीचा स्वाभिमान बाळगणारी
अशी हि माय मराठी जीवाला जीव लावणारी
प्रत्येकांच्या मनात आपलेपणा जागविणारी
बोलतो मराठी
ऐकतो मराठी
लिहितो मराठी
वाचतो मराठी
करतो वंदन तुजला
आमुची माय मराठी
आमुची माय मराठी.....-
"आनंद निकेतन"
खेळता खेळता शिकू या
शिकता शिकता खेळूया!
मजे मजे चे खेळ खेळू
खेळता खेळता पुस्तक चाळू
निरीक्षण करता करता
गप्पा गोष्टी करता करता
शिक्षण घेऊ हसता खेळता
नको ओझे दप्तराचे
खेळ करुया प्रयोगांचे
अवघड नाही काही आता
सोप्या सोप्या पध्दतीने गणिते ही सोडवूया आता
मातृ भाषेतच अभ्यास करुया
शिक्षण घेऊन मोठे होऊया
मित्र मैत्रिणी बनवूया
आनंदाने भविष्य आपले घडवूया
ताई-दादाच्या सुचनेचे काटेकोर पालन करुया
शिस्तीने अन् समजुतीने घर (निकेतन), शहर, राज्य, देश आपुले आनंदी बनवूया.
धन्यवाद
कवी - क.दि.रेगे-
भाषा ही आपली प्रथम ओळख असते...
तिच आपण सर्वत्र मिरवत असतो...
अन् त्यात माझी "माय मराठी"
शब्दांनी भरलेला सागर आहे...
अमृताहुनी गोड माय मराठी माझी..!
🚩मराठी_भाषा_गौरव_दिन🚩-
लिंबाच्या कडूपणात समाजातील
कडूपणा निघून जावो
गुळातील गोडवा सर्वांच्या मनात बसावा,
तुमच्या यशाची गुढी
आसमंतात उंच ऊभी राहो...
आणि येणाऱ्या वर्षात
सर्वांना सोन्याच्या खरेदीसाठी
खिश्यात चार पैकं राहोत
याच शुभेच्छा...
#गुढीपाडवा🚩
#मराठी_नववर्षाभिनंदन🚩🚩
-