उंच बांबू काठी सामर्थ्याची
सुंदर साडी जरीकाठी वैभवाची
चढवला कलश त्यावर यशाचा
शोभून दिसे पुष्पहार मांगल्याचा
आरोग्य संपदा जपे पाने कडूलिंबाची
शुभ संकेत देई डहाळी आंब्याची
सर्वत्र पसरे गोडवा साखरगाठीचा
रांगोळीत दिसे रंग नवचैतन्याचा
स्थैर्य पाटावर मग उभी राही गुढी समृद्धीची
मनी दाटे आशा आकांक्षा नव्या संकल्पांची-
कधी कधी शब्दांतून व्यक्त होणंही चांगलं असतं...✍️
उंच बांबू काठी सामर्थ्याची
सुंदर साडी जरीकाठी वैभवाची
चढवला कलश त्यावर यशाचा
शोभून दिसे पुष्पहार मांगल्याचा
आरोग्य संपदा जपे पाने कडूलिंबाची
शुभ संकेत देई डहाळी आंब्याची
सर्वत्र पसरे गोडवा साखरगाठीचा
रांगोळीत दिसे रंग नवचैतन्याचा
स्थैर्य पाटावर मग उभी राही गुढी समृद्धीची
मनी दाटे आशा आकांक्षा नव्या संकल्पांची-
सदैव असावा ध्यानात त्याग शंभु राजांचा,
शुर पराक्रमी अजिंक्य छावा शिवरायांचा!-
छिन्न झाले शरीर पण
तोंडून आवाज नाही फुटला
डोळेही न झुकवता हसत तो
अखेरच्या श्वासापर्यंत लढला
सार काही जिंकूनही
औरंगजेब मात्र हरला
सोडले प्राण राजाने
पण धर्म नाही सोडला
मृत्यूलाही हरवून राजाने
हिंदवी स्वराज्य राखला
शुरवीर पराक्रमी रयतेचा
धाकला धनी अजरामर झाला-
पकडला होतास हात माझा
पाऊल पहिलं टाकताना
चंद्रही आणलास उश्याशी माझ्या
कुशीत तुझ्या निजताना
मन तुझंही तृप्त झालं असेल
घास मला भरवताना
अंगाई तुच झालीस बघ
मला शांत करताना
तुझीही झाली असेल दमछाक
माझे छोटे छोटे हट्ट पुरवताना
दिसते तुझीच छवी मला
आरशात स्वतःला पहाताना
डोळे तुलाच शोधतात नेहमी
पाय घरात टाकताना
येईल मनात दाटून आठवणी उद्या
ह्या घराचा उंबरा ओलांडताना-
तोच रोजचा कंटाळवाणा दिवस
तेच वारंवार त्रास देणारे विचार
उत्तरं माहीती असूनही न सुटणारे प्रश्न
पुढे कसं होणार याची लागलेली काळजी
रात्र रात्रभर न येणारी झोप
हेच चालु आहे सध्या तरी आयुष्यात
ओठांवर हसू अन् डोळ्यांत पाणी
निघत आहेत असेच दिवसं......-
उंच बांबू काठी सामर्थ्याची
सुंदर साडी जरीकाठी वैभवाची
चढवला कलश त्यावर यशाचा
शोभून दिसे पुष्पहार मांगल्याचा
आरोग्य संपदा जपे पाने कडूलिंबाची
शुभ संकेत देई डहाळी आंब्याची
सर्वत्र पसरे गोडवा साखरगाठीचा
रांगोळीत दिसे रंग नवचैतन्याचा
स्थैर्य पाटावर मग उभी राही गुढी समृद्धीची
मनी दाटे आशा आकांक्षा नव्या संकल्पांची-
स्वःताच्या अडचणींना बाजूला ठेवून
लेकरांच्या गरजा पूर्ण करणारी
ती एक आई असते
बाबांच्या आत दडलेल्या
आई ला समोर आणणारी
बाबांची लाडकी
ती एक मुलगी असते
आईच्या मायेनं आपल्या लहान
भावंडांना जपणारी
ती एक बहीण असते
स्वःताच घर सोडून
नवीन ठिकाणी आपलं
नव विश्व निर्माण करणारी
ती एक पत्नी असते
कधी आई तर कधी बहिण
कधी पत्नी तर कधी मैत्रीण
एका वेळी अशा अनेक
भुमिका निभावणारी
ती एक स्त्री असते...-
कितीही कठीण असलं तरी
स्वतःच्या विचारांशी स्वतःलाच लढावं लागतं-
युगो युगोंसे चलती आ रही
इनकी प्रेमकहाणी
शिव स्वामी है कैलाश के
गौरी उनकी कुलस्वामिनी-