सोप्प असतं, प्रेम करणं
बायको बनवणं कठीण।
जाती धर्माच्या यादवीत
लग्न करणंही कठीण।-
बायको..
बायको बिच्चारी किती काम करते सुट्टीच्या दिवशी ही तिची धावपळ असते.
जरा आराम कर म्हटलं की म्हणते आराम म्हणजे काय असते.
मुली ही तिला खूप त्रास देतात पण त्याचं ही तिला काहीच वाटत नसते.
मोठी मुलगी नवनवीन पदार्थांची मागणी करत असते
तर छोटी नुसतीच मम्मा, मम्मा करी तिचा पिच्छा पुरवत असते.
आई सुद्धा थोडी मदत करायला जाते तर म्हणे तुम्ही बसा बाजूला मी सर्व आवरते.
खूप अभिमान वाटतो तिचा पण कधी कधी खूप सटकते.
जेव्हा मदत करायला आई आणि मुली जातात त्यांना नाकारते,
नि मला मात्र म्हणते काय नुसतेच बसून आहात थोडी मदत केली तर काय बिघडते.
बायको बिच्चारी खूप काम करते जास्त ताण पडला की माझ्यावर घसरते.-
संघर्ष बाबाकडून शिकावे 🤝
आणि आईकडून संस्कार 🙏
बाकी.. ✌️
चहा, नास्ता,जेवण,धुणीभांडी
बायको आहे शिकवायला..☺️😊
😂😂😂😂😂😂😂😂😂-
चार पाच दिवस झाले,प्रयत्न करतोय,
पण काही सुचतच नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तिला
पण शब्दच मिळत नाही.
प्रेमाने वागते सर्वांशी, सर्वांशी आपुलकीने राहते.
दुखावत नाही मन कुणाचे,इतके छान नाते जपते.
नेहमीच मायाळू आई,
नि प्रेमळ सून म्हणून घरात शोभते.
मनमिळाऊ,अन्नपूर्णा,सर्वगुणसंपन्न
अशा अनेक टोपण नावाने प्रसिद्ध राहते.
करता कुणी स्तुती,मी कुठे काय करते,
मी तर फक्त कर्तव्य निभावते,असेही म्हणते.
अशा ह्या माझ्या सौभाग्यवतीला
तिच्या वाढदिवशी ह्या शुभेच्छा देतो,
लिहायचे होते खूप काही,ह्या वाढदिवशी तुझ्यासाठी,
पण विचारच थांबलेत,लेखणी ही अडकली,
म्हणे शब्द ही कमीच आहेत,
शुभेच्छा देण्या तुझ्यासाठी.
❣️happy birthday❣️बायको❣️-
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून,समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको.
लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
बच्चो को सोडून परत आती घर को
जेवण बनाके फीर जाती है काम को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
काम से आती फीर पढाती बच्चो को,
लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको.
आता मै बोलता हू तू समज ले बायको,
समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको.-
तो दिवस येईल बघ
सर्व समाजापुढे चालत राहू
डोक्यावर माझ्या तो मुकुट असेल
माझ्या नावाची मेहंदी तुझ्या हातावर असेल..
हळद ती उष्टी
तुझ्या अंगाला लागेल
किती गोड लाजशिल ना
जेव्हा मी घोड्यावरुन येईल...
सप्तपदीचे ते वचन तुला देईल
तुझ्यासोबत संसाराची सुरुवात करेल
किती खुश रहाशील माहित नाही मला
पण हो तुझ्यासाठी हा जीव ही अर्पण असेल..
आईवडिलांचा आहे तसा तुझा बनून राहील
तुझ्यासाठी रोज नाही पण
कधी कधी गजरा घेऊन येईल
येईल तो दिवस ही बघ जेव्हा
माझ्या हाताने देवापुढे
मंगळसुत्र तुझ्या गळ्यात मी घालेल..-
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.
स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान,
प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान.
सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा,
नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा.
प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा,
अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा.-