विठ्ठल नामाचा गजर करूनी,
जप करूया आपण मुखासी.
साद घालीतो विठू माऊली,
कैवारी कानडा तो उभा विटेवरी.
ठाई ठाई वसे ज्याचा रंग,
तोच विटेवरी उभा पांडुरंग.
तुळशीच्या पानातून येई त्याचा सुगंध,
त्या पानातही दिसे मला पांडुरंग.
नित्यमनी माझ्या तुझाच ध्यास असावा,
विठू तुझ्या कारणे,माझा प्रत्येक श्वास असावा.
पांडुरंग कैवारी,विठ्ठलाची गोडी.
जशी साजूक तुपाची,विठु रखुमाई ची जोडी.
भावनी दाटला, विठ्ठल मनी जाहला.
मन मंदिरात कानडा,तो विटेवरी थांबला.
उघडताच डोळे,समोर तुम्ही दिसावे.
तुमच्याशिवाय या जगात,माझं काही अस्तित्व नसावे.
राहो आमच्यावरी,नेहमी तुमची सावली.
तुम्हीच आमची आता,जननी.. माय माऊली.
(आश्र्वु, रुक्मिणी, प्राजू, शुभ.)
-
पंढरीचा रस्ता,
वारकऱ्यांची शान,
हातात टाळ,
ओठी विठ्ठलाचे गान।
डोंगर, रान, वारा गातो
“ राम कृष्ण हरी”,
संतांच्या चरणी मिळतो
जीवाला ठाव।
रुक्मिणीसमोर डोळे
भरून येतात रे,
वारीतच खऱ्या विठ्ठलाचं
दर्शन घडते रे।-
विठू नामाच्या गजरात
अवघा अंतरंग भिजला...
वारकऱ्यांचा मेळात नाचतांना
🚩 मला पांडुरंग दिसला 🚩-
वारी निघाली पंढरी
विठुरायाच्या दर्शनी,
हाती घेवूनी मृदुंग आणि टाळ
मुखी जपती हरिनाम।
त्या पंढरपुराची शोभा-न्यारी
वसले आहे चंद्रभागेच्या किनारी,
कमरेवरती हात ठेवूनी
उभा आहे विटेवरी-वैकुंठ बिहारी।।
आषाढ़ी एकादशीला जमतात सारे वारकरी
हरिनामाच्या या गजरात मग्न होतात नर-नारी,
बघुन सारे दृष्य मन होते प्रसन्न
जणु स्वर्गच उतरला धरतीवर।।।
'कवी-हर्ष'
insta@kavi_hrsh-
जब कुछ ना हो तो
धैर्य की परीक्षा होती हैं
और जब सब कुछ होता है
तो व्यवहार की परीक्षा होती है ।।
When nothing happens
then patience is tested and when everything happens then behavior is tested.-
पांडुरंग
भाळी चंदनाचा टिळा
तुळशी माळ गळा,
नित्य आम्हा लागला
पांडुरंगाचाच लळा...-
बस इस क़दर ख़ुदा बंदे से फिर बड़ा हो गया..
बंदे ने गुस्से में उसे पत्थर दे मारा,
वो मुस्कुराया और उस पत्थर पर खड़ा हो गया !
#करन हैदराबादी-
वारी
तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं
भक्तजन आले तुझ्या दरबारी
ज्ञानोबा-तुकाराम गात
काय तो तुझा तो भक्तीमय सोहळा
नयनी लाभे तो आनंदमय जिव्हाळा
डोंगरदऱ्या ओलांडती, नाही त्याचा कंटाळा
वारकरी तृप्त होऊन जाता
पाहता तुझ्या अंगणी सोहळा
टाळ, मृदुंग मुखी हरिनामाचा घोष
जात,पात, धर्म नाही राहत इथे हा दोष
पाऊल पाऊल चालते पंढरीची वाटेवर
हृदयात विठ्ठल ,ओठी नाम जपावर
चंद्रभागेच्या किनाऱ्यावर उभा तो विठोबा
हात कमरेवर ठेऊनी
पाहे आपल्या लाडक्या भक्तांना
ही वारी फक्त यात्रा नाही
ही ओळख आत्म्याची,वाट भक्तीची
आणि भेट परमात्म्याची🙏-
वारी
वारी पंढरीची
वैष्णवांचा मेळा,
मुखी हरी नाम
भाळी चंदन टिळा...
-