लिहिताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझं च नाव सांडल
अन् काही अक्षरांत का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं .-
पानी से तस्वीर
कहा बनती है,
ख्वाबो के तकदीर
कहा बनती है,
किसी भी रिश्ते को
सच्चे दिल से निभाओ,
ये जिंदगी फिर
वापस कहा मिलती है
काैन किस से
चहाकर दूर होता है,
हर कोई अपने
हलातों से मजबूर होता है,
हम तो बस
इतना जानते है...
हर रिश्ता "मोती" और
हर दोस्त "कोहिनूर" होता है!-
बिना फूल के कभी मेहक नहीं आती
बिना पानी के कभी प्यास नहीं भुजती
बिना बादलोंके कभी बरसात नहीं होती
वैसे ही बिना दोस्तोंके कभी जिंदगी नहीं होती
-
मैत्री म्हणजे विधात्याने रचलेली रचना छान
मैत्री म्हणजे आयुष्याचे सोनेरी पान...
मैत्री म्हणजे अतूट दृढ विश्वास
मैत्री म्हणजे जगण्याला जरुरी असा श्वास...
मैत्री म्हणजे हक्काचा विसावा
मैत्री म्हणजे मायेचा ओलावा...
मैत्री म्हणजे निराशेत आशा
मैत्री म्हणजे सुखाची परिभाषा...
मैत्री म्हणजे जखमेवरील फुंकर
मैत्री म्हणजे व्यापलेले भव्य अंबर...
मैत्री म्हणजे ग्रीष्मात पावसाची भुरभुर
मैत्री म्हणजे मनाला लागलेली हुरहूर...
मैत्री म्हणजे सोन्यासारखी झगमग
मैत्री म्हणजे जीवाला होणारी तगमग...
मैत्री म्हणजे धुक्यातून दिसणारी वाट
मैत्री म्हणजे प्रसन्न हसरी पहाट...
मैत्री म्हणजे सुवासिक अत्तराची शिंपण
मैत्री म्हणजे प्रेमळ शब्दांची गुंफण...
मैत्री म्हणजे रामायण गीता कुराण
मैत्री म्हणजे रामरक्षा आणि अजान...
मैत्री म्हणजे ईद ख्रिसमस दिवाळी
मैत्री म्हणजे सकाळी गायलेली भूपाळी...
मैत्री म्हणजे कथा आणि कविता
मैत्री म्हणजे अवखळ वाहणारी सरिता...
मैत्री.....खूप काही ...शब्दांच्यापलीकडलं एक भाव
मैत्री म्हणजे एक दुसऱ्याकडे जाण्याचे हक्काचे गाव....
-
शाळेपासून आता पर्यंतअजुनही लहानच असणारी ती
माझ्या प्रत्येक उणीवा घेवून चालणारी
चुकले की आधार द्यायला उभी असणारी
माझी प्रत्येक गोष्ट माहीत असणारी
आजपण काही प्रोब्लेम झाला की
अर्धया रात्री हक्कानी फोन करणारी
गॉसिप्स असो किंवा सुख दुख शेअर करण असो
माझ्या प्रत्येक यशात अपयशात
माझ्या सोबतअसणारी
मला पुर्णपणे मि जशी आहेतशी स्वीकारनारी
माझ्यातल्या कमजोरीला ताकद बनवनारी
माझ्यासाठी नेहमीप्रमाणे असणारी मैत्री
माझ्याशेवटच्या श्वासा पर्यंत
मला सोबत हवी असणारी
अशी निरागस तुझी माझी मैत्री-
स्वार्थाचा विसर पडावा इतकं मैत्रीच्या नात्यात गुंताव
मैत्री हा छंद जडावा अन् विश्वासाच्या नात्यात बुडाव
कधी भेट न झाली तर मनांनी एकमेकांकडे पळत सुटाव
पुढे मागे न करता दोघांनीही सुख दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या सोबत चालावं-
।।श्री।।
मित्र असावा कृष्णासारखा,
कुरूक्षेत्री जो सारथ्य करेल
मित्र असावा पाण्यासारखा,
स्वच्छ..अन् पारदर्शी असेल
मित्र असावा आरशासारखा,
गुण..अवगुण जो व्यक्त करेल
मित्र असावा सूर्यासारखा,
आयुष्य जो प्रकाशीत करेल
मित्र असावा मनासारखा,
विश्वासाने जो सारं ऐकेल
मित्र असावा श्वासांसारखा,
मृत्यूपर्यंत जो साथ करेल
मित्र असावा आत्म्यासारखा,
अंतरंगातही जो पसरेल !
या सारखा मित्र असेल तर अशा लाख अडचणींवर मात करायला कोणीही सिद्ध असेल...फक्त मैत्रीमध्ये निस्सीम विश्वास असावा, अंध नाही, जाविवेतून निर्माण झालेला विश्वास ज्यासाठी मैत्रीचा खरा कस लागतो.. विश्वास नसेल तर मैत्री पक्षाने सोडलेल्या घरट्यासारखी दिसते...भकास !
©कृष्णार्पण❤️
-
ईश्वर से जो जो माँगा वो सब कुछ मिल गया
फिर भी रब का रेहम देख मुझ पे
तेरे जैसा दोस्त बिन मांगे ही मिल गया
-
तुझ्यासोबत मी असेन नसेन तु अशीच हसत जा
माझ्या कवितेच्या प्रत्येक ओळीत तुच दिसत जा
एवढी कशी ग समजुतदार रागावतच नाहीस कधी
कधीतरी मी समजवावं म्हणून तरी तु रूसत जा-