QUOTES ON #KNDTV

#kndtv quotes

Trending | Latest
14 JUL 2019 AT 10:24

मावळा राजे मी तुमचा
लिहितो शब्द रोज नवे.....

वाटते विचार जपावे तुमचे
पोहोचवावे सर्वांपाशी....

पाईक बनून रहावं आपला
मुक्ती भेटेल मला तेव्हा...

विचार येतिल आचरणात तुमचे
सार्थक होईल माझ्या या काव्यांचे...

-



साद घाली तुझी बासरी
शांत निजलेल्या त्या राधेला
होती खूण ती भेटण्याची
यमुनातिरी सांज वेळेला...

सुमधुर स्वर तुझ्या बासरीचे
ऐकून उठली दचकून राधा
निघाली लगबगीने यमुनातिरी
जडली तुझ्या प्रीतीची तिला बाधा

येताच यमुनातिरी ती
शोधे तुला होऊन कावरीबावरी
दिसत नव्हता कुठेच तू
ऐकू येत होती फक्त तुझी बासरी

हे मनमोहना....
देत होती हाक अंतरी
ये समोर असा माझ्या
झाले व्याकुळ मी कितीतरी...

-



करावी मी तिच्यावर कविता
अस तिलाही वाटत
कदाचित् अचूक ओळखले तिने
माझ्या मनात जे दाटत...

ऐक प्रिये, मी तुला
बोलण्यापेक्षा तुलाच
ऐकायला मला आवडत
सारख ऐकतच रहाव वाटत...

माहीत नाही कारण
पण तुझ्यातच गुंतून जाव वाटत
लेखणीलाही माझ्या आजकाल
फक्त तुझ्यावरच लिहायला आवडत...

शब्द ही माझे
तुझेच गुण गात आहेत
असुनही माझ्या जवळ
भोवती तुझ्याच ते फिरत आहेत...

-



मैत्रीमध्ये आहे आपल्या
विश्वासाचा धागा
त्या धाग्यात गुंफु
प्रेमाचे फुले
साज चढवू त्याला खरेपणाचा
जेणेकरुन ही मैत्री सदाफुले.... 😊

-


27 JUN 2019 AT 13:09

मी जात असताना निघून,
बघायचे होतेस एकदा थांबवून;
बहाना एक तो फक्त प्रेमाच्या परिक्षेचा,
पण अर्ध्यावर सोडलास सारा खेळ मांडून...

तू शिकला असशील हसायला,
पण मी हसणं विसरले आहे;
जगासाठी शांत झाले मी,
पण स्वतःशीच भांडत बसले आहे...

कु. अक्षरा संतोष ढगे.

-


22 JUN 2019 AT 17:22

सगळ्या नात्यांची सुरूवात 
मैत्री पासुनच होते, 
म्हणूनच कदाचित सगळ्या 
नात्यांमध्ये मैत्री सर्वश्रेष्ठ असते... 
जिथे दुरावा असला तरी मन मात्र 
कायम एकमेकांच्या सोबत असते... 
(खाली वाचा)

-



जगून घे दिवस आजचा
तो कधी परत येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!

तारे नभातले मिटल्यावर डोळे
तमा शिवाय काहीच दिसणे नाही!
कर प्रत्येक क्षण हसरा तुझा
गेलेला क्षण परत येणे नाही!!

आलेल्या संधीचे सोने कर
तो सोनेरी क्षण पुन्हा येणे नाही!
नको जाऊ बुडून स्वार्थात
स्वार्थातून बाहेर कधी पडणे नाही!!

छोट्या छोट्या गोष्टीत हसायला शिक
रडताना कधी हसू ओठी येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!

-



दिसतो फक्त हसरा चेहरा
नाही दिसत त्यामागची सल
नाही मिरवत कधीच मी
माझ्या मनातली हलचल...

जसा आहे तसाच राहतो
नाही करत कुणासमोर उकल
त्यामुळेच कुणाला नाही समजत
माझ्या मनातली हलचल...

असता क्षण माझा दुःखाचा
कोण मला नि का शोधल
मग समजेल तरी कशी
माझ्या मनातली हलचल...

जाणतो मी सर्वांना चांगलाच
उद्या वेळही त्यांना धडा शिकवेल
म्हणुनच प्रत्येक क्षणी जपतो मी
माझ्या मनातली हलचल...

-



घेतले तिला मिठीत मी आज
ऐकवण्या ठोके माझ्या हृदयाचे
नकळत काहीतरी पुटपुटत होती
ओठातून निघत होते तिच्या सूर प्रेमाचे...

असंख्य तार्‍यांच्या साक्षीने
झाले मनोमिलन आज आमचे
सुसाट वेगाच्या वार्‍यानेही
गायिले आमच्या सूर प्रेमाचे...

उधळण किरणांची केली सूर्याने
चेहरे लालबुंद पाहून आमचे
फांद्यातून येणार्‍या कोमल किरणांनी
सजविले आमच्या सूर प्रेमाचे...

दरवळणारा तो गंध फुलांचा
देत होता सुख आयुष्यभराचे
सुगंधाने आपल्या आणखीनच
पसरविले आमच्या सूर प्रेमाचे...

-



वाटे प्रत्येकास आज
यावे आपल्याला स्वतंत्र जगता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

आहोत वेगळे आपण इतरांपेक्षा
स्वतः नि त्यांच्यात नाही समानता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

कळत नकळत रुजत जाते
मनात विचारांची दुर्बलता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

जाणत नाही कोणीही इथे
का होते आपली असमाधानता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता.

-