My city is collection of those people's who started their day with cup of tea & ends with watching KBC and TV shows
-
आवडतं मला सतत तुझा विचार करणं
साधं आरशा समोर जरी उभा मी तरी,
तुझ्यासाठी मी माझ्याशीच भांडणं !-
आवडेल मला नक्षी होणं तुझ्या साडीची
मी बोलेल छान दिसतेस खूप तर,
जाणवेलच ना घालमेल तुझ्या हृदयाची !-
तुझं असं रोखुन पाहणं
मला तुझा नाद लावून जातं
तुझे नजरेचे वार झेलून हृदय
पार घायाळ, तुझ्या अधीन होतं !-
तुझी आठवण जरी आली ना तरी मन कसं कावरंबावर होतं, अन् नकळत त्या जुन्या क्षणात भिजून जातं. मग एकेक आठवणी हळूहळू जाग्या होतात. शाळेच्या आठवणींची रम्य पहाट उजळू लागते. आणि घंटेच्या ध्वनीचे पडसाद कानी पडतात, अन् पावलं तिकडे वळायला लागतात.
"ज्ञानदायी माऊली गे हो सदा यशवंत तू
इंद्रचाफा लाजविते ज्ञानशोभा येथली"
प्रार्थना ऐकुन मन अगदी मंत्रमुग्ध होतं, आणि दिवसभराची एक नवी उभारी,नवी ऊर्जा मनात वास्तव्यास राहते.
ते मैदानातील मर्दानी खेळ ही आठवतात, आणि मैत्रिणींसोबत केलेली चवदार भेळही आठवते. मास्तरीन बाईंचा धाकही आठवतो आणि बड्या सरांची छमछम लागणारी छडी आठवते. तुझ्यापासून प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकलोय, मग तो आवडणारा मराठीचा,खेळाचा तास असो किंवा न आवडणार बीजगणित ,भूमितीचा तास किंवा जीवनात यशस्वी होण्यासाठी घेतलेला ध्यास असो. एक गोष्ट आहे तिची नेहमी भीती वाटायची ती म्हणजे 'परीक्षा'कारण त्यावेळी ती आम्हाला वाटायची शिक्षा. तुझ्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे,त्यामुळे इतकंच म्हणेन की,
" मित्रमैत्रिणींचा होता दाट असा सहवास
चंपाचमेलीचा होता येथे पवित्र सुवास
नवनवीन गोष्टींची रचत होती रोजच रास
शाळेसाठी जगलो होतो प्रत्येक श्वास अन् श्वास......."
-©माधवी-
क्षणांतच तुझ्या आयुष्यातून
मला वजा करतांना
तु थोडं थांबायचं होतं
बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य
पण मिठीत घेऊन
जरासं तरी सांत्वन करायचं होतं !-
Hey! This is Salim from TEAM SONU SHARMA. I'm working a part time business with *MR.SONU SHARMA SIR*.. I want some Dedicating and Hardworking business partners from different area in all over World.
🕵️♂️
It's WITHOUT any INVESTMENT, you can also start it as a part time or full time without disturbing your current job/study.
Only If you are Interested Then Fill this Form
Please only "Interested" & "Serious" person Fill This Form.💯👍🔥🕵️♂️😍-
✨अहमदनगर ✨
प्राचीन काळापासून प्रचलित असलेलं
आणि सीना नदीच्या तीरावर वसलेलं
महाराष्ट्रातील मोठा व उन्नत जिल्हा म्हणून ओळख असलेलं
साखर उद्योगामुळे आशिया खंडात नावाजलेलं
अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थळांन्नी नटलेलं
संस्कृती बरोबरच परंपरेची जाणीव असलेलं
असं आहे आमचं अहमदनगर....-