पौर्णिमेचा चंद्र तू, रात्र मी तुझी
काळया नभात ला राजा तू, राणी मी तुझी
तुझ्या शितल किरणात
साजरी रे माझी कोजागिरी
नभातले जग तुझे, परि असेल वेगळे
या राणीचे जग मात्र, तुझ्यातच रे रमले
किरणांची तुझी शुभ्र अशी काया
रूप तुझे जगावेगळे,
भुलवी मज हे सर्वथा
जेव्हा नयन जाती तुझ्याकडे
-