अलगद हळुवार शहारलेले ते क्षण,
रंगत जोमाने गप्पा मैफिली
ऐकण्या,जिथे आतुर होतसे मन.
हरवताना प्राचीन कथांच्या दुनियेत,
हळुवार निघून जात असे सुख दुःखाचे क्षण.
हल्ली गप्पा स्वतःशी ,अन एकांत पणातले हे जीवन,
साठवताना दृश्य डोळ्यासमोर या अजूनही
जाण्यास त्या दुनियेत आतुर होतसे मन.
-
कधीतरी माराव्यात गप्पा स्वतःशी,
मोकळे करावे स्वतःला मनाशी..
विचारावेत प्रश्न पडलेले मनाला,
का विचारत राहावे दुसर कोणाला..!
विचाराव त्या मनाला तु समाधानी आहेस का?
मिळेल त्यात खूश राहण खरचं तुला जमतय का?
तु करतोय काय त्यात मन तुझ रमतय का?
सर्व काही करून तुला तुझपण उमगतय का?
काही परिस्थिती प्रश्न भाग पडतात अबोल व्हायला,
वादळात हरवून विचारांत भांबावून जायला..
म्हणून कधीतरी माराव्यात गप्पा स्वतःशी..!-
संयम....
एक दिवस होईल सगळ सुरळीत आणि व्यवस्थित
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...
दुःख होईल वेदना होतील संकटाना चढेल जोर
छाताडावर बसून त्यांच्या आपणच व्हायचं शिरजोर
दुःख वेदना अन् संकटाना ठेवायचं आपल्याच धास्तीत
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...
प्रेम म्हणजे नसतात काटे घ्यायचं थोडं समजुन
झाल्या जखमा...होऊद्यात जायचं त्याना बिलगून
प्रेम काटे अन् जखमांनाही राहूदे त्यांच्याच मस्तीत
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...
कुणीच नसते आपले वैरी वेळच असते थोडी जहरी
संयमाचा होऊन किनारा झेलत राहायचं लहरी
चुकू नये वाट म्हणून राहायचं वेळेच्या सोबतीत
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...
एक दिवस होईल सगळ सुरळीत आणि व्यवस्थित
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...
कवी-श्रीकांत मेडशिंगे...✍🏼-
घे थोडे उशाशी,
कर बाता स्वतःशी.
मिटून डोळ्यात माझ्या,
लाव ओठ ओठाशी.
स्वप्न दिसेल लोचनी,
धाव वाढेल स्पंदनी.
येता मिठीत माझ्या,
सुख लाभेल या मनी.
-