(Shrikant medshinge)
0 Followers · 4 Following

Joined 23 October 2022


Joined 23 October 2022
23 JUN 2023 AT 14:32

संयम....
एक दिवस होईल सगळ सुरळीत आणि व्यवस्थित
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...

दुःख होईल वेदना होतील संकटाना चढेल जोर
छाताडावर बसून त्यांच्या आपणच व्हायचं शिरजोर
दुःख वेदना अन् संकटाना ठेवायचं आपल्याच धास्तीत
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...

प्रेम म्हणजे नसतात काटे घ्यायचं थोडं समजुन
झाल्या जखमा...होऊद्यात जायचं त्याना बिलगून
प्रेम काटे अन् जखमांनाही राहूदे त्यांच्याच मस्तीत
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...

कुणीच नसते आपले वैरी वेळच असते थोडी जहरी
संयमाचा होऊन किनारा झेलत राहायचं लहरी
चुकू नये वाट म्हणून राहायचं वेळेच्या सोबतीत
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...

एक दिवस होईल सगळ सुरळीत आणि व्यवस्थित
स्वतःवरती विश्वास ठेऊन चालत राहायचं शिस्तीत...

कवी-श्रीकांत मेडशिंगे...✍🏼

-


16 APR 2023 AT 0:21

वेगळी शोधू नको रे वाट दुःखा
सोबती माझा खरा रे तूच दुःखा..

वाट ही चालु कसा रे एकटा मी
बघ जरा थांबून माझे सुख दुःखा..

तू जरी सोडून जाशील वाट माझी
सुख कसे बघशील माझे सांग दुःखा..

पेरणी इथे केली जरी तु वेदनेची
बघ बहरली 'प्रेरणेची' बाग दुःखा...

श्रीकांत...✍🏼

-


13 APR 2023 AT 16:03


प्रेम तिच्यावर माझे असते
मनही तिकडे धावत असते

मी हृदयातून साद घालतो
ती शब्दांचा वाद समजते...

'व्यवहारांची दुनियादारी'मनास उमगत नाही..
तेव्हा असते माझ्यासाठी 'कविता'माझी आई..

श्रीकांत...✍️

-


13 APR 2023 AT 12:38

दुःखासोबत संकटाची होते जेव्हा घाई...
तेंव्हा माझ्या कामी येते कागद आणि शाई..

डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू होतात स्तब्ध...
शाई बनून कागदावरती उतरतात जेव्हां शब्द..

वात्सल्याच्या शोधामध्ये कुणीच भेटत नाही..
तेंव्हा असते माझ्यासाठी 'कविता' माझी आई..


श्रीकांत.....✍🏼

-


21 MAR 2023 AT 10:06

पैलवान मी आहे रांगडा
मेहनत करतो शब्दांची
मी शब्दांचा खुराक घेतो
कविता करतो घामाची..

श्रीकांत.......✍️

-


8 JAN 2023 AT 11:44

सृजनाचे बिज मी
नवा माझा श्वास आहे
मातीत रुजली माझी मुळं
मला आभाळाचा ध्यास आहे..
श्रीकांत.....✍️

-


31 DEC 2022 AT 18:13

साल...
साल बीत गया...
किसीका दिल हार गया..
किसीने दिल जीत लिया...
कितने सपने थे दिलों में
एक हात से छूट गया
एक आँख से छूट गया...

हम देखते रहे सालभर
आँखों में आंखें डालकर
सोचा था चलेंगे संभलकर
कोई दरिया में डूब गया
कोई दरिया में ऊब गया....

अब साथ चलने के वादें हैं
हात ना छोड़ने के इरादें हैं
जो हुआ था पिछले साल
सब पीछे छूट गया....

साल बीत गया...
किसीका दिल हार गया
किसीने दिल जीत लिया..
श्रीकांत......✍

-


22 DEC 2022 AT 0:09

काळीज आता माझं नाही
सखे तुझच घर आहे.
तुझ्यासोबत जगण्याची
त्याची भावना अमर आहे.
ओठांवरती आता सखे
तुझ्याच नावाचा सुर आहे.
श्वासांवरती तुझीच सत्ता अन्
डोळ्यात आसवांचा पूर आहे..
श्रीकांत.....✍🏼

-


Seems has not written any more Quotes.

Explore More Writers