जेव्हा दिसे तू मज नयनी,
स्वराज्याचा आभास होई या मना..
कसे सांभाळू मी मज,
सारे कळून जाई या जना.
सगळे आहोत आम्ही,
तुझ्याच सोबत..
मज हाती देशील का,
शिवबा तुझा हात.
या सह्याद्रीत करावे तू,
मुक्त संचार वाट.
हाच असणार शिवबा,
तुझा आता थाट.
वाट धरुनी एक,
चालता हो तू या राना.
निर्भिड होऊनी मग,
कर तू स्वराज्याची स्थापना.
(Shubham Deøkar)-
डॉ .ए पीे जे अब्दुल कलाम सर स्मृतीदिन .
अतिसामान्य ते सामान्य असा कलाम सर यांचा प्रवास .
विद्यार्थी आणि आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम .
दुरदृष्टी असलेल एक महान व्यक्तिमत्त्व .
कलाम सर
🙏🙏🙏🙏🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भावपूर्ण आदरांजली .-
शिक्षणाची ती प्रणेती होती
विद्येची ती जननी होती
तिच खरी सरस्वती होती...
रूढी आणि परंपरा मोडत
स्वतः दुःखात जगत
समाजात शिक्षणाची
कव्याफुलवली..
अशा महान नारी
पहिल्या शिक्षिका
सावित्रीबाई फुले
यांचा आज
स्मृतिदिन...
🙏🙏🙏🙏🙏
-
कित्येक हाल अपेष्टा सहन करुनी, कष्ट करुनी,
तुम्ही शिकविले माझ्या भिमरायांना.....
कसं विसरु मी बा रामजी तुमच्याच इच्छेनुसार,
गुलामगिरीतून मुक्त केले लोकांना.......
तुम्ही या पुन्हा जन्माला बा रामजी,
तुमची गरज आहे आम्हाला...
बा रामजी तुम्ही आले पुन्हा जन्माला तर,
येतील भिमराय पुन्हा जन्माला.......
रामजी मालोजी सपकाळ(आंबेडकर) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन-
कोंबडीच्या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्लू !
कोंबडी म्हणाली,पिल्लूबाळ,
सांग तुला हवे काय?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्लू म्हणाले,आई
दुसरे नको काही,
छोट्याश्या कपमध्ये चहा भरून दे,
मला एका अंड्याचे आम्लेट करून दे !
_ मंगेश पाडगावकर.-
आज आभाळ ही भरून आलंय...
त्याला ही माहित आहे आजच्या दिवशी तो सुद्धा पोरका झाला होता...😪-