Chinmay Patil   (© काव्यगंध @चिन्मय पाटील)
20 Followers · 16 Following

Joined 13 June 2019


Joined 13 June 2019
27 JAN 2023 AT 12:39

To be independent in life is to be the boss of yourself
An independent person does his every work himself
He is the captain of his life
He knows how to survive
He never depends on anyone emotionally
He is debtless even financially
An independent person is happy and
Contented
He knows this truth that his body is rented
So he takes care of himself physically

-


15 JUL 2022 AT 12:40

आधार देणाऱ्याने आधार असा द्यावा,
की त्याची जाणीवही होऊ नये...
अन् उनिवही राहू नये!

-


22 MAY 2022 AT 14:14

प्रत्येकाला हक्काचा कोपरा हवाच...
तिथे जाऊन विचार न करता
बडबडायला, हसायला, रडायला, आहे नाही ते सगळं बोलून मोकळं व्हायला...
प्रत्येकाला त्या कोपऱ्याचाच आधार असतो...
आपण मग तो कोपराही तसाच शोधतो...
ज्याच्याकडे हक्काने व्यक्त होता येईल...
जो समजून घ्यायचा प्रयत्न करेल...
ज्याला कधी आपला कंटाळा येणार नाही...
जो नेहमी साथ देईल...

हा...
आता तो कोपरा सजीव असेल की निर्जीव हे ज्याच त्यानी ठरवावं...
कसाही असला तरी त्याचा आपल्यावर आणि
आपला त्याच्यावर जीव हवा...

-


22 AUG 2021 AT 7:55

प्रत्येकाच्या आयुष्यात एक बहीण असावी
"तुझ्यासारखी"
तीच मैत्रीण, तीच बहीण अन तीच
"पाठीराखी"
नेहेमी समजून घेणारी एक जिवाभावाची
"सखी"
थोडीशी जगावेगळी, थोडीशी हळवी अन
"माझ्यासारखी"
काळजी करणारी ती, आयुष्यात कधीच न व्यावी
"परकी"

-


28 MAY 2021 AT 22:55

फुलांच्या रंगात फुलपाखरासारखे तु लपते,
दवबिंदू होऊन तणामध्ये तुझे सौंदर्य लपवते,
ताऱ्यांच्या पुंजक्यांमध्ये नेत्र तुला शोधते,
अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते...

सुर्यास्त होताना आकाश तुझ्या रंगाने रंगते,
रात्रीच्या अंधारात तार्‍यांना तु वेगवेगळ्या रंगवते,
वाहत्या पाण्यात प्रतिबिंब तुझे मला सतावते,
अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते...

-


3 APR 2020 AT 8:49

माझ्या राजाचा स्मृतिदिन
छत्रपती शिवाजी महाराज




(Read In Caption )

-


9 MAR 2020 AT 8:26

पौर्णिमेच्या चंद्र खास,
पुरणपोळीचा खमंग वास...
दृष्ट प्रवृत्तिचां सार्‍या अंत आज,
सुंदर रंगाचा, आनंदाचा होळीचा सण आहे आज...

होळीच्या खुप खुप शुभेच्छा...😊

-


16 JAN 2020 AT 12:03

माणसांनी आपला कडू आठवणींचा भुतकाळ विसरून जावा पण त्या भुतकाळाच्या कठीण काळात आपल्याला ज्यांनी मदत केली होती त्यांना विसरू नये... ती नाती तशीच टिकवुन ठेवावी... आणि जर ती नाती टिकवायला जमत नसेल तर ती नाती जोडूच नयेत... आणि हे पण जमत नसेलतर निदान माणुसकी तरी ठेवावी... आणि हे पण जमत नसेल तर मग तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या पात्रतेचे देखिलनाही...

-


26 NOV 2019 AT 1:20

समुद्रमार्गे येऊन त्यांनी
केला होता घातपात,
सरसावले मग वीरपुत्र
पुढे करण्यास दोन हात.
कुठे रक्ताचे पाट तर
कुठे गोळ्यांची बरसात,
तरीही मागे न फिरले
ते शूरवीर वाघ.
दिल मायभूमिसाठी बलिदान,
म्हणूनच आजही दिमाखात उभा
आहे मुंबईतला ताज…
26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली..

-


21 NOV 2019 AT 0:45

आयुष्याच्या शेवटच्या सोहळ्याचा प्रवास

निस्तेज झालेल्या हा देहाला
आज शेवटचं स्नान करतांना पहिलं...
सुगंधित केलेलं निर्मळ पाणी
कुटुंबातील सदस्यांनी चरणावर वाहिले...

हिरवाशालू परिधान करूनी
दक्षिण, उत्तर दिशेस झोपवले...
मखमलीची चादर ओढून
त्यावर फुल, हारांनी सजविले...

प्रियजण अवतीभवती बसून
आठवणीच्या अश्रुत बुडाले होते...
सोबतीच्या गोष्टी एकमेकांस सांगून
आधार सांत्वनीचा देत होते...

गोतावळा जनलोकांचा होता जमला
आपल्या ओळखीच्या माणसात विखुरला...
कुजबुज त्यांची मनात होती चालली
अश्या अचानक का ह्या सोडून गेल्या...

हसता खेळतांना त्यांना पाहिले
जो तो आपल्या मुखातून सांगत होता...
कालच आम्ही त्यांना भेटून गेलो
आणि आज बातमी आली जगात नव्हत्या...

शेवटची ठरलेली वेळ जवळ येताच
आरती करून खांद्यावर उचलले...
येता ठिकाण सिंधुताईना राखेत करण्याचे
रचलेल्या चितेवर ठेऊन अग्नी देऊन अनंतात विलीन केले...

-


Fetching Chinmay Patil Quotes