आपण केलेला पसारा हा आपणच आवरायचा असतो,
मग तो पसारा घरचा असो किंवा आयुष्याचा...😐🙂-
वेळ बदलायला वेळ लागत नाही,
पण नशीब बदलायला नशीब लागतं हे मात्र खरं...🤞🏻😐-
सोड आज ते रुसवे आणि घे एकदा मिठीत,
.
.
.
नाहीतर ह्याच असतील माझ्या आठवणी आणि मी असेन उद्या मातीत ❤️
-
' प्रेम ' चार भिंतीत सगळ्यांनाच मिळतं...🙂
पण चार चौघात आदर स्वरूपात मिळायला भाग्य लागतं ❤️🙌🏻-
मैत्री च रूपांतर प्रेमात झाले तेव्हा,
वय वर्ष माझं सोळा होता जेव्हा...
तू सांभाळून घेतलंस,
तू सावरून घेतलंस,
प्रत्येक गोष्टीत अवडलास तू मला...
पण आता कसं सांगू तुला,
की तू गमावलय मला...
तुझी माझी भेट ती, एक जणू सोहळा होता,
आता मात्र ह्याच भेटी मध्ये एक दुरावा आला होता,
कारण त्याच माझं मला ही समजलं नव्हता,
वेड मन माझं तेव्हा फक्त तुझ्यात गुंतल होतं...
आपल्यातल्या दुराव्याच कारण ही तेव्हा तूच होतास,
वेळ नाही मला असं सतत तू म्हणत होतास,
आता मात्र वेळ खूप आहे,
पण तितकंच अंतर तुझ्या माझ्यात आहे...
ते अंतर आता बहुतेक तसचं राहणार,
काळजी घे बाबा स्वतःची अस मी आता नाही बोलणार.
सौंदर्य पाहून तू रस्ता तुझा विसरलास,
पण आता खर सांगू हा खेळ तू खरंच हरलास...
एक thank you तुला...🙏
आज वर जो काय वेळ दिलास तू मला.
पण कसं सांगू तुला,
आता तू गमावला आहेस मला...-
आज दीड वर्षा नंतर समोर आम्ही आलो,
डोळ्यात एकमेकांच्या पाहता आठवणीत रमून गेलो.
काही क्षण दोघे ही शांत होतो,
योगायोग तरी बघा, आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी भेटलो.
दोघांना हि खूप काही बोलायचं होतं,
सुरुवात कशी कुठून करायची हे मात्र कळत नव्हतं.
पुन्हा एकदा पुढाकार त्यानेच घेतला,
कशी आहेस बरी आहेस ना हा प्रश्न मला विचारलं.
मी ही हो म्हणत उत्तर त्याला दिलं,
बोलताना त्याच्याशी मला ही खूप भरून आलं.
बोल अगं आता काहीतरी तो मला म्हणाला,
चुरु चुरू बोलणारी आज गप्प कशी हा विचार तो करत राहिला.
तासभर त्याची तक्रार मी त्याच्याकडेच करत होते,
काय कसं घडलं हे ऐकत मी ही त्याला बिलगले होते.
शेवटी डोळे पुसले आणि त्याला रागात म्हटलं ,
तुला जायचं होतं तू गेलास पण आता माझं काय.
त्यावर तो ही हसत म्हणाला ,
पळून तुला मी ही घेऊन गेलो असतो पण मग तुझ्या आई बाबांचं काय... ❤️-
माणसं घरातली असो किंवा बाहेरची...
प्रत्येकाला आनंदात ठेवणं हे फक्त तुमच्या स्वभावात असू शकतं, हातात नाही...😊😉❤️-
मान्य आहे मला , चुकलं माझं थोडं,
हवं होतं उत्तर प्रश्नाचं , पण त्यालाच आता पडलंय कोडं...
हो महितीय मला खूप उशीर केला मी, खूप घेतला मी वेळ,
माझ्याच हातून माझ्या आयुष्याचा मांडला मी इथे खेळ...
माहित नाही मला काय आहे , तुझ्या आयुष्यात माझं महत्त्व ,
वाटतं आता उगाच व्यक्त झाले मी, आणि संपलं माझं अस्तित्व...-
Dear girls,
प्रत्येक वेळी मुलांनीच पुढाकार घ्यावा असं गरजेचं नसतं...😊
कधी कधी मुलींनी सुद्धा पुढाकार घेऊन प्रेम व्यक्त करावं म्हणते मी 😉
काय भरोसा तो तुमच्या व्यक्त होण्याची वाट बघत असेल... 🤷🏻♀️🙂❤️-
ह्या वेळीस काहीतरी वेगळं घडत होतं,
पाऊस आजही तोच होता पण सोबत मात्र कुणीतरी नव्हतं...
ओंजळभर जग माझं , त्यात आभाळा इतकं तुझं प्रेम होतं.
आजही पाऊस आणि मी तसेच तिथेच आहोत,
पण, तुझं अस्तित्व मात्र नव्हतं.
तितक्यात तो पाऊस म्हणाला अगं सोडून दे ते विचार , विसर त्या आठवणी...
मी ही म्हणाले अरे वेड्या ,
ह्याच आभाळाखाली विश्व मांडलं होतं मी माझं ,
म्हणून आहे मी त्याची आयुष्यभराची ऋणी...
सोबत नसलो आज म्हणून काय होतंय,
त्याच्याच आठवणीत आजही माझं मन रमतय...
माहित नाही मला काय आहे नियतीच्या मनात,
आजही तोच आहे माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात ....
त्या पावसाने मला शेवटचा प्रश्न केला,
किती दिवस त्याची अशी तू वाट बघत बसणार.
मी ही हसत उत्तर दिलं त्या पावसाला..
जोवर तुझं अस्तित्व ह्या जगात आहे तोवर त्याच्या आठवणीत मी हसणार...-