रंग मेरा सबसे अलग था राधिका मुझमें बसीं थी
श्याम भीड़ में क्यों खो गये पास मैं तेरे खड़ी थी।
तेरी प्रीत की अब चुनर ओढ़े एक बार फिर तुमसे मिलूँगी।
बांसुरी तेरे अधरों की बनकर तेरे साथ मैं हरदम रहूंगी।
प्रधुम्न प्रकाश शुक्ला
-
हळुवार झुळुक तुझ्या प्रेमाची
गुज तुझे सांगुन गेली...
भावना तरल माझ्या प्रितीची
प्रेम रंगी रंगुन गेली...-
जगाच्या रंगपेटीमध्ये
रंगांचा भरमार सारा
व्यक्ती तितक्या प्रकृती
अन पसाराच पसारा
जुळवून घेताना एकमेकांशी
उडे किती भंबेरा
मिळूनी सर्व नांदती एकत्र
हे चित्र आज विरळा
तरी सुद्धा सहजिवनाचाच
असे खेळ हा सारा
मिसळुया रंगात रंग
मिळेल आनंद आगळा
रंगुनी रंगात सार्या
असावा रंग माझा वेगळा
-
रंग माझा वेगळा,
गंध माझा वेगळा..
कस्तुरीसम प्रेमाचा,
सुगंध ही माझा वेगळा..-
रंगात रंगुनी माझ्या,
सखे तू ही रंगून गेली..
तुझ्या प्रेमाची झुळूक सखे,
मनाला हळुवार स्पर्शून गेली..!-
वेगळा बिगळा काई नई...
🙄😏😓😐😶😣
.
.
.
.
.
सगळ्यांचा हाय तसाच हाय माया बी ..!!
😂🤣😋🤗😆😚😝😄-
कुणी भगव्यासाठी..
कुणी निळ्यासाठी..
कुणी हिरव्यासाठी नडला.
जो सगळ्यांनमध्ये एक आहे
रक्ताचा रंग तो कुणाला का नाही कळला...
-
रंगात रंगुनी तुझ्या
गंधात गंध मिसळला
कस्तुरी सम प्रेमाचा
सुगंध मनी दरवळला...-
जातीयतेच्या नावाखाली
गाव सारा जाळला......
फुत्कारणार्या ज्वाळा 🌋
सांगती
रंग माझा वेगळा.....
-
रंग माझा वेगळा
निखळ प्रेमाच्या
शब्दांमध्ये मिळणारा
आशयांच्या अंबरांना
मनामध्ये सामावनारा-